भाजपची गोव्यातली स्ट्रॅटेजी म्हणजे, इतर पक्षांच्या फुटलेल्या मतांवर जिंकून यायचं.

जशी जशी गोवा विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तश्या तश्या अनेक राजकीय घडामोडी राज्यात पाहायला मिळत आहेत. 

गोव्याचे राजकीय गणित थोडं किचकटच झालं म्हणायला लागेल. त्यात राज्याच्या राजकारणात तृणमूल आणि आप’ने आपली मजबूत एंट्री केल्यानंतर आता कॉंग्रेसच म्हणण आहे कि, युती झाली तरी अन नाही झाली तरी राज्यात केवळ काँग्रेसच येणार….पण २०२२ च्या निवडणुकीत २०१७ ची पुनरावृत्ती करू. तसेच राज्यात सर्वाधिक मताधिक्क्यांनी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार पुन्हा निवडून आणू, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला आहे….त्यामुळे आता गोवा निवडणूकीचं रिंगण ‘गोवा प्लॅन’ एवढंच इंटरेस्टिंग ठरणारं आहे…

थेट गोव्यात काय चाललंय ते बघू….. 

गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे, भारतीय जनता पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सारख्या पक्षांनी राज्यात धोरणात्मकदृष्ट्या प्रयत्न चालू केले आहेत. 

त्यात आता भाजपच्या आमदारांचं वेगळंच काहीतरी चालूये…… भाजपच्या आमदारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी तिकिट मिळवीत म्हणून प्रयत्न चालू केले आहेत. भाजपच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे किमान १० नेते सध्या आपल्या मुलांना किंवा पत्नीला तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

गोव्याच्या राजकारणात प्रवेशासाठी भाजपचे नेते या पक्षांवर निशाणा साधत असले तरी त्यामुळे विरोधी मतांचे विभाजन होऊन भाजपलाच फायदा होईल, असे सत्ताधारी पक्षाच्या रणनीतीकारांचे मत आहे.

राजकीय रणनीतीकारांचा असा दावा आहे की,  बहुपक्षीय लढतीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला गोव्यात सत्ता टिकवून ठेवता येईल. तर आघाडीला आपल्या आपल्या पक्षांतील उमेदवारांचे  मतभेद आणि तिकीटाच्या दावेदारांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या सगळ्यांच्या भांडण्यामध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपलाच फायदा होईल, असे सत्ताधारी पक्षाच्या रणनीतीकारांचे मत आहे.

पण असंही नाहीये कि भाजपला आयताच फायदा होईल, भाजपला देखील या निवडणुकीत स्वबळावर तिकीटाच्या दावेदारांना सांभाळणे एक मोठं आव्हान असणार आहे. त्यातल्या त्यात उत्तर गोव्यातील मतांचे विभाजन रोखण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत युती करणे हा एक मोठा प्रश्न आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑक्टोबरमध्ये जेंव्हा गोव्याचा दौरा केला होता तेंव्हा त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना स्पष्टपणे सांगितले होते की, विरोधी उमेदवारांचे मते जितकी फुटतील तितकं पक्षाला निवडणुका जिंकणे सोपे जाईल.

त्यामुळे, आपली युती मजबूत करत करत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी सारख्या पक्षांशी युती करणाऱ्या काँग्रेसच्या प्रयत्नांवरही भाजप लक्ष ठेवून आहे. हे तर स्पष्ट आहे कि,दक्षिण गोवा जो कॅथलिकबहुल आहे तो भाजपविरोधी आहे त्यामुळे या वर्गाची मते टीएमसी आणि आप यांसारख्या पक्षांमध्ये विभागली जातील आणि हीच बाब त्यांच्यासाठी दिलासा देणारी आहे. पण तरी याचा फायदा सत्ताधारी पक्षालाच होणार आहे.

कारण सरकार स्थापन करण्यासाठी भाजप छोट्या पक्षांशी युती करतो. याची परिणीती २०१७ च्या विधानसभा निवडणुकीला आलेली. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४०  सदस्यीय विधानसभेत केवळ १३ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस दक्षिण गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता आणि कॅथोलिक लोकांच्या मोठ्या प्रमाणातल्या पाठिंब्यावर १७ जागा जिंकल्या होत्या. दोन्ही पक्षांना बहुमत नव्हते तरी देखील कॉंग्रेसच्या हाती सत्ता येता येता राहिली आणि भाजपने  छोट्या पक्षांशी युती केली अन सरकार स्थापन केले होते. 

पण आत्ता बहुमत घेऊ शकणारी कॉंग्रेस लेचीपेची झाली म्हणायला लागेल कारण गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजीन्हो फेलेरो यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. आणि त्यात गोव्यात एंट्री केलेल्या  टीएमसीची ताकद फेलेरो यांच्यामुळे आणखीनच वाढली. यामुळे आता असं होणार कि,  टीएमसी काँग्रेसची व्होट बँक खराब करेल. कॉंग्रेस गटाला मिळणारी मते आता टीएमसीला मिळतील मात्र  भाजपची मते कमी होणार नाही. 

कारण टीएमसी आणि कॉंग्रेस पक्षांमुळे भाजपविरोधी मते विभागली जातील. 

आणि सर्वात महत्वाचा मानला जाणारा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजेच दक्षिण गोव्यात टीएमसीच्या एंट्रीमुळे अल्पसंख्याक मते फुटतील..काही कॉंग्रेस तर काही आप तर काही टीएमसीला जातील. त्यामुळे भाजप फारच उत्साहित आहे.

२०१७ च्या निवडणुकीत AAP ने ३६ जागांवर निवडणूक लढवली पण एकही जागा मिळवली नव्हती. गोव्यातील प्रत्येक विजेच्या खांबावर फक्त झेंडे लावून मते मिळत नाहीत. गोव्यात सर्वांचे स्वागत. अशी गोव्याची जनता आप वर टीका करत असे आत्ताही असचं काही वातावरण गोव्यात आहे असं भाजप च्या नेत्यांच म्हणन आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत १७ जागा जिंकणार्‍या काँग्रेसकडे आता फक्त पाच आमदार उरले आहेत.

उमेदवार निवडीबाबत भाजप याची वाट बघतोय कि, तिकीट वाटपापर्यंत कोण किती आणि कोणते पक्ष बदलतो. हे सगळं चित्र डिसेंबरअखेर स्पष्ट होईल. भाजप तर फुल ऑन तयार असल्याचं सांगतायेत. भाजपच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे गोवा निवडणुकीच्या बाबतीतचा  A, B आणि C सर्व प्लॅन तयार आहेत. कोणी पक्ष सोडल्यास त्याच्या जागी कोणाला तिकीट मिळणार हे देखील पक्षाने आधीच ठरवले आहे.  

राज्याच्या लोकसंख्येमध्ये हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम हे अनुक्रमे ६६, २६ आणि ८.३३ टक्के आहेत. भाजपच्या २७ आमदारांपैकी १५  कॅथलिक आहेत. त्यापैकी दक्षिण गोव्यात विजयी झालेले काँग्रेसचे आठ माजी आमदार आहेत. पण अलीकडेच वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करण्यात आल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना भारतभेटीचे निमंत्रण दिल्याने, दक्षिण गोव्यातील निवडणुकीवर त्याचा परिणाम चांगला पडेल अशी भाजपला आशा आहे.

“ कारण पंतप्रधानांच्या पोपसोबत झालेल्या भेटीमुळे गोव्यातल्या कॅथलिक समाजात चांगले संकेत गेलेत आणि  कॅथलिक समाजाचा भाजपवरील विश्वास वाढलाय असा अंदाज आहे. आणि याचाच फायदा भाजपला होईल. आणि शिवाय भाजपविरोधी असलेली काही मते टीएमसी कमी करेल, या सर्व गोष्टी भाजपच्या बाजूने जातायेत. आता निवडणुकांच्या निकालावरूनच सर्व अंदाज स्पष्ट होईल. 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.