खास दारु प्यायला गोव्याला जाणाऱ्या भिडूंनो, आता तिथल्या बाटलीच्या म्यूजियमला पण व्हिजिट करा.

रोटी के बिना इन्सान चार हफ्ते जी सकता है, पाणी के बिना चार दिन, और हवा के बिना शायद चार मिनट, लेकिन उम्मीद के बिना इन्सान चार सेकंद भी नहीं जी सकता..और जो ये पढ रहा है उनकी उम्मीद है, नशा…

मनें दारु..आणि दारू मनसोक्त प्यायची असेल तर डोक्यात येत गोवा.

पण आता गोव्याला फक्त दारू प्यायला न जाता भिडूंनो आता तिथल्या बाटलीच्या म्यूजियमला पण व्हिजिट करा.

होय तर, गोव्यात आता दारूचं म्युझियम सुरु झालय मित्रांनो. विचार करा दारुचं म्युझियम होण्याइतपत दारु प्राचीन आहे. आणि प्राचीन वस्तूंचं आपल्या सारख्या लोकांना महत्व आहे.

तर गोव्याला कोण नाही ओळखत. अगदी पोर्तुगाल, ब्राझील आणि पश्चिमेकडील रोममधून सुद्धा लोक इथं दारूचा आस्वाद घेण्यासाठी येतात. भारतातल हे केवढंस गोवा नेहमीच या वेगळ्या ओळखीमुळे देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे विशेष केंद्र राहिलयं.

समुद्रकिनारी असलेल्या गोव्याची आणखी एक खास ओळख आहे आणि ती म्हणजे दारू ‘फेणी’. सामान्यातला सामान्य गोवेकर दुपारच्या जेवणाआधी या फेणीचा एक पेग मारणार हे ठरलेलंच असत. अशा या दारुचा जीवन प्रवास सांगण्यासाठी संग्रहालय तयार केलं गेलं आहे. अशाप्रकारचे देशातील पहिलेच अल्कोहोल संग्रहालय आहे.

संग्रहालयच नाव काय तर ‘ऑल अबाऊट अल्कोहोल’

गोवन स्थानिक व्यावसायिक नंदन कुडचडकर यांनी गोव्याच्या कंडोलिम गावात हे संग्रहालय सुरु केलंय. कुडचडकर यांनी संग्रहालयाला ‘ऑल अबाऊट अल्कोहोल’ असे नाव दिलयं. या अल्कोहोल संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे काजूपासून बनवलेली दारु साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलाकृती मर्तबान जार इथं तुम्हाला पाहायला मिळेल.

हे मर्तबान चिनी मातीपासून बनलेल्या गोलाकार भांड्याचा हा एक प्रकार आहे. बऱ्याच शतकांपासून वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक काचेच्या भांड्यात दारु फर्मन्ट केली जाते.

फेणी बद्दल माहित नसेल तर मग हे वाचाच !

फेणी हे गोव्याचं पारंपारिक मद्य आहे. फेणी हे नाव ‘फेणा’ या संस्कृत शब्दातून आलाय. गोव्यात फेणी पिण्याची परंपरा सुमारे ५०० वर्षे जुनी आहे. असे म्हटले जाते की इतर अल्कोहोलप्रमाणे फेणी प्यायल्याने हँगओव्हर होत नाही. ही दारु काजूच्या फळापासून तयार केला जातो.

यामध्ये कोणतेही सेंद्रिय किंवा कृत्रिम पदार्थ वापरले जात नाहीत. २०१६ मध्ये गोवा सरकारने त्याला हेरिटेज ड्रिंकचा दर्जा देण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. म्हणजे आता गोव्याला जाणारच असाल आणि फेणी पिली नसेल तर ती पण पिऊन या.

आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नंदन कुडचडकर म्हणतात,

संग्रहालय तयार करण्यामागे आमचा एकच उद्देश आहे. आम्हाला गोव्याच्या सांस्कृतिक वारशाची कथा, विशेषत: फेणीची सुरुवात आणि ब्राझील ते गोवा या मद्याशी संबंधित प्रवासाची कहाणी लोकांना सांगायची आहे.

भिडूनो तुमच्या माहितीसाठी, गोव्यातल पहिलं काजूचं झाड पोर्तुगीजांनी १७०० मध्ये ब्राझीलमधून आणलं होतं. ब्राझील आणि गोवा या दोन्ही देशांमध्ये ल्युसोफोनियन कलोनियलचा प्रभाव आहे.  जेव्हा ब्राझीलमधून आणलेले काजूचे रोप गोव्याच्या भूमीवर तग धरुन राहिले. तेव्हा काजू खाऊन फेणी सुद्धा तयार करण्यात आली.

म्हणजे हे कस झालंय माहिती का, पोर्तुगीजांनी दारु बरोबर चकण्याची सुद्धा सोय केली. त्यामुळे पोर्तुगीजांचे मानावे तितके आभार थोडेच आहेत. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.