भिडू तुझा गोव्याचा प्लॅन ठरेल पण आता तिथं TITO’S नसनाराय…!

हा भिडू तू एकटाच नाहीए ज्याचा गोवा प्लॅन कॅन्सल झालाय…! दरवेळी तू प्लॅन करतो आणि ऐन टायमाला पोरांनी कल्टी दिल्यावर तू घरीच थांबतोस. तुझ्या प्लॅनपेक्षा जबरी गोष्ट घडलीय गोव्याचा प्रसिद्ध असलेला टिटो क्लब विकला गेलाय. टिटो क्लबचा मालक असलेल्या रिकार्डो जोसेफ डिसुझाने आपल्या फेसबुकवरून हि माहिती दिलीय.

इतका नाव कमावलेला टिटो क्लब विकण्याची वेळ आली याचं कारण सुद्धा तसंचय गोव्यातल्या काही स्थानिक लोकांनी आणि काही सरकारी अधिकाऱ्यांनी छळ केल्याचं आणि वारंवार त्रास देण्याच्या कारणावरून रिकार्डो जोसेफ डिसुझाने हा टिटो क्लब विकून टाकला आहे. आधी आपण क्लब हा नक्की काय विषय आहे ते बघूया म्हणजे गोव्याला जायच्या अगोदर तुझ्या ध्यानात हे सगळं राहिलं पाहिजे. 

पार्टी करण्यासाठी गोवा हे बेस्ट ठिकाण मानलं जातं. प्रत्येकाला थीम पार्टी आवडतेच. गोव्यामध्ये पार्टी करण्यासाठी एक फेमस क्लब आहे तो म्हणजे टिटो क्लब. नाईटक्लब म्हणजे टिटो इतकं परफेक्ट सेगमेंट गोव्यामध्ये सेट झालंय.

टिटोज क्लब हा गोव्यातील सगळ्यात जुन्या क्लबपैकी आणि लोकप्रिय क्लबपैकी एक मानला जातो. १९७१ मध्ये भारतातून आपापल्या प्रांतात परतण्यासाठी आनंदोत्सव म्हणून हा टिटोज क्लब ओळखला जायचा. आज तो लेन या नावाने ओळखला जातो. लाईटींचा झगमगाट, लाऊड म्युझिक, इंटरनॅशनल लेव्हलचे डीजे, लाईव्ह ऍक्टस आणि देशीविदेशी नृत्य प्रकार अशा सगळ्या गोष्टींसाठी टिटोज क्लब ओळखले जातात.

गोव्यामध्ये हे टिटोज क्लब अभिमान बाळगण्याचं कारण मानलं जात कारण त्यातून रोजगार आणि विदेशी पर्यटकांची संख्या वाढीस लागते. उत्तर गोव्यात एका मोठ्या मैदानात हे टिटोज क्लब बांधले गेले आहेत. यात ओपन एअर रेस्टोरंट, कॅफे मॅम्बो बॉलिवूड डिस्कोथेक अशा पाहण्याच्या जागा आहेत.

क्लब टिटोज हे आठवडाभर जरी सुरु असले तरी इथं एक वेगळा पॅटर्न आहे. विकेंडला या भागामध्ये पार्टी प्रेमी आणि संगीत प्रेमी लोकांची गर्दी वाढू लागते. शुक्रवारी आणि शनिवारी टिटोज क्लब हे पूर्णतः व्यावसायिक पार्टीसाठी आरक्षित असतात. रविवारी मात्र पारंपरिक नृत्य, पोर्तुगीज कॉरिडेन्हो किंवा गोवा डेकनी, फायर जंगलींग आणि फायर लिम्बो ऍक्टस असे विदेशी देशी मिश्रित डान्स सादर केले जातात.

पोर्तुगीज, लॅटिन आणि बॉलिवूडच्या जुन्या रेट्रो गाण्यांवर हा क्लब पहाटेपर्यंत चालतो त्यात सगळे लोकं सहभागी होतात. टिटोज क्लबचे कॅलेंडर आहे त्याप्रमाणे सगळं नियोजन चालतं. शनिवारी बॉलिवूड संगीत आणि व्यावसायिक नाईट्स जातात. गाणी म्हणणे, रेट्रो नाईट, सिंगल नाईट अशा अनेक गोष्टी टिटोजच्या कॅलेंडर नुसार चालतात. 

खाण्यापिण्याची इथं अजिबात हयगय नाही. टिटोज क्लबच्या मेन्यूमध्ये कॉन्टिनेन्टल, अमेरीकन, ओरिएण्टल आणि भारतीय जेवणातल्या व्हरायटी असतात. एकदा का तुम्ही क्लब मध्ये शिरले कि तिथे फक्त तुम्हाला तुमच्या दारूचा खर्च तुम्हालाच करावा लागतो. जेवण हे टिटोजकडून तुम्हाला देण्यात येतं. एकूणच फूड अँड ड्रिंक्स लव्हर लोकांसाठी हे ठिकाण स्वर्ग आहे.

टिटोज क्लब हे भारतातल्या नाईट लाईफ कल्चरचे मॉडर्न रूप मानले जाते. कारण इथं पारंपरिक गोष्टी आणि मॉडर्न गोष्टी यांचा समतोल राखून नियोजन केलं जातं. परदेशातून येणाऱ्या लोकांना इंडियन कल्चरची माहिती व्हावी आणि इंडियन लोकांना परदेशी कल्चर माहिती व्हावं हि यामागची थेरी आहे.

पण गोव्याला एकाअर्थी नाईटलाईफ स्पॉटची ओळख मिळवून देणारा टिटोज क्लब विकला गेला आहे. गोव्याच्या नाईटलाईफ स्पॉटची फक्त भारतातच नाही तर जगभरात सुद्धा टिटोज क्लबचे चाहते आहेत. पण आता हे सगळं संपलय. टीटोजच्या मालकाने पुन्हा कधी गोव्यात येणार नसल्याचं जाहीर केलंय.    

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.