शेळ्यांसाठीची बॅंक : या मराठी माणसाच्या भन्नाट आयड्यामुळे लाखोंचा संसार उभारलाय..

लोक सारखी गुजराती माणसं कशी उद्योग धंद्यात हुशार असतात, त्यांना कोणत्याही गोष्टीत व्यवसाय दिसतो अशी आरती म्हणत असतात. त्याच्या जोडीला उदाहरण म्हणून अंबानीं सगळ्यांची उदाहरण चिटकवतात. पण आपला मराठी माणूस सुद्धा कोणत्याही गोष्टी व्यवसाय बघू शकतो, हे कोणी छातीठोक पणे सांगताना दिसत नाही.

आता लोकांच्या या दाव्याला फाट्यावर मारायचं काम केलं आहे ते अकोल्यातील एका मराठमोळ्या माणसानं.

त्यानं लाखाचा नाही तर कोटींचा व्यवसाय बघितला, ते पण ‘शेळी’ या मुक्या प्राण्यामध्ये. त्यानं त्यासाठी स्वतःची थेट बँक पण सुरु केली.

येस्स, बरोबर वाचलं. बँक.

अकोला जिल्ह्यातील सांगवी मोहाडी गावात नरेश देशमुख यांनी ‘गोट बँक ऑफ करखेडा’ ची स्थापना केली आहे. 

आता या बँकेचं काम काय तर, शेळी कर्जांनं द्यायची आणि व्याज, कर्जफेड म्हणून सुद्धा शेळीचं परत द्यायची. यातून स्वतःच पण उत्पन्न वाढवायचं आणि बँकेचं पण.

आता कसं ते जरा विस्कटून सांगतो.

गावातल्या माणसांनी, गरीब महिलांनी या बँकेत १ हजार १०० रुपये भरून रजिस्ट्रेशन करायचं. बचत गट असेल तर काम अगदीच सोप्प. रजिस्ट्रेशन केल्यावर ११ हजार रुपयांपर्यन्त पडणारी उस्मानाबादी जातीची एक शेळी इथं तुम्हाला कर्ज म्हणून १ हजार १०० रुपयात दिली जाते.

यानंतर त्या संबंधित कर्जदारानं ४० महिन्यांपर्यंत त्या शेळीचे पालनपोषण करायचं. या ४० महिन्याच्या काळात शेळीचे किमान ६ वेत होतात. म्हणजे कमीत कमी १२ पिल्लं. यातल्या ४ वेतातील एक पिल्लू या गोट बँकेकडे परत द्यावं लागतं.

त्यानंतरची होत राहणारी सर्व पिल्ले आणि ती बकरी ही त्या कर्जदाराच्या मालकीची होतेत. साधारण २७ ते २८ शेळ्या शिल्लक राहतात. एवढा साधा सोप्पं व्यवहार. या दरम्यान दोघांच्यात करार होतो, शेळीचा विमा पण काढला जातो, जेणेकरून शेळीला काय झालं तर आर्थिक नुकसान होऊ नये.

अशी झाली होती गोट बँकेची सुरुवात…

एकदा नरेश देशमुख यांच्या सहज लक्षात आलं की, गावातल्या काही शेत मजुरांची घर आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही स्वतःची शेती असलेल्यांपेक्षा चांगली आहे. ते मुलांना चांगलं शिक्षण देत होते. धुमधडाक्यात लग्न लावून द्यायचे.

आता याच्या मागचं कारणं काय असेल हे शोधायला त्यांनी आपल्या लेव्हलवर जरा अभ्यास सुरु केला. यात त्यांना त्या शेतमजुरांच्या घरी शेळी असल्याचं लक्षात आलं.

झालं, आता इथपासून त्यांच्या डोक्यात विचार चालू झाले. शेळी पालनावर अभ्यास सुरु केला. अर्थशास्त्राचे पोस्ट ग्रॅज्युएट असल्यामुळे आईनस्टाइनच कंपाऊंडिंगच सूत्र डोक्यात फिरू लागलं. किलोभर बियाण्यावर जसं टन भर धान्य येत तसं दोन शेळ्यांवर सुरु केलेला व्यवसाय ४. ६, ८ शेळ्यांवर जातो, म्हणजेच शेळीमध्ये सुपर कंपाऊंडिंग असल्याचं लक्षात आलं.

त्यामुळे यातच काही तरी करायचं हे फायनल झालं होत. पण काही तरी म्हणजे काय?

त्याच वेळी शेळी पालन करणाऱ्यांना येणाऱ्या अडचणीचा पण अभ्यास करायचे. एक अडचण मोठी लक्षात आली ती म्हणजे शेळ्यांची संख्या वाढल्यावर ती ठेवण्यासाठी जागेची अडचण निर्माण व्हायची. मग ते वरच्या शेळ्या विकून टाकायचे. तशीच अडचण स्थलांतरित मजुरांना येत होती. स्थलांतर करताना ते शेळ्या विकून पुढं जायचे. हे विकण्यामुळे त्यांना कम्पाउंडिंग फायदा होतं नव्हता.

आता हि अडचणच देशमुख यांनी संधी म्हणून बघितली आणि जुलै २०१८ मध्ये ‘गोट बँक ऑफ करखेडा’ची स्थापना केली. पेटंट पण घेतलं.

आता प्रश्न कोट्यवधींच्या उलाढालीचा.

इथं त्यांनी ठेवायला जागा नसलेल्या, स्थलांतरित मजुरांच्या शेळ्या घेऊन त्यांना कर्जाच्या स्वरूपात द्यायला चालू केलं. सुरुवातीला ४० लाख रुपये गुंतवून म्हणून १ शेळी १ हजार १०० रुपयांना या हिशोबाने ३४० शेळ्या कर्ज म्हणून वाटल्या गेल्या. ४० महिन्यांमध्ये ४ शेळ्या परत करण्याचे करार केले गेले.

देशमुख यातील एक उदाहरण सांगतात, त्या महिलेला १ शेळी दिली गेली. काही दिवसातच तिला १ पिल्लू झालं. त्यानं २ पिल्लं दिली. त्यातील आणखी एका पिल्लाला जन्म दिला. ९ महिन्याच्या आताच १ शेळीच्या ५ शेळ्या झाल्या.

देशमुख सांगतात अशा ४० महिन्यात ४ शेळ्यांची पिल्लं परत करून त्यांच्याकडे कमीत कमी २७-२८ शेळ्या होतात.

आता लावा हिशोब. एक शेळी १० हजार × २७ शेळी = २ लाख ७० हजार रुपये.

१ हजार १०० रुपये गुंतवून साइड बिझनेस म्हणून ४० महिन्यात २.५ ते ३ लाख रुपयांपर्यंत गणित जात.

आता देशमुख यांचा फायदा काय होतो तर, अजून ४० महिने पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी वाटलेल्या आणि परत आलेल्या लहान शेळ्या अशी मिळून संख्या जवळपास ८०० आहे. परत येणाऱ्या शेळ्या ते रीइन्वेस्ट्मेन्ट म्हणून वापरतात. इथं पुन्हा हिशोब लावायचा झाला तर,

एक शेळी ७ हजारांपासून १० हजार रुपयांची × लहान, मोठ्या ८०० शेळ्या 

त्यांचा या गोट बँकेसोबत काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात ‘मआविम’ने सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता बचत गटातील अधिक महिला या बँकेचा लाभ घेऊ शकत आहेत.

त्यामुळे भावानो मराठी माणूस पण कोणत्याही गोष्टीत व्यवसाय बघू शकतो आणि अगदी यशस्वी पणे तो उभा पण करू शकतो. यात काहीच वाद नाही.

हे हि वाच भिडू.  

5 Comments
  1. Kiran says

    Suprerb business stories

  2. Hanmantrao Ganesh Pawar says

    फोन नंबर टाका

  3. Moti Shinde says

    Super compounding

  4. Jibhau amolak ahire says

    सर
    शीरोल जाती ची शेली पालण केले चालेल का

  5. Machindra Adhe says

    Machindra adhe

Leave A Reply

Your email address will not be published.