गोदावरीताईंच्या आंदोलनामुळे आदिवासी शेतकऱ्यांची सातबाऱ्यावर नावे लागू लागली

आदिवासी समाज शहराच्या धूर गर्दीतून आजही स्वत:ला वेगळं ठेवतो. आता त्याला कारणही आहेत म्हणा, म्हणजे जरी स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष झाली असतील. तरी आदिवासी समाजाबाबत लोकांचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही , त्यामुळेच हा समाज आजही एका कोपर्‍यात ढकलला जातो. आताचं चित्र जरा बदलयं म्हणा.

पण आपण काही वर्ष मागे डोकावून जर पाहिलं तर हा आदिवासी समाज जणू काही वाळीत टाकल्यासारखा होता. सततचे होणारे अन्याय सहन करण्याशिवाय जणू दूसरा पर्याय नव्हता.

पण याचं लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढा उभारण्यासाठी एक स्वातंत्र्य सेनानी पुढे आल्या, त्या म्हणजे गोदावरीताई परुळेकर. शामराव परुळेकर हे एक स्वातंत्र्यसैनिक तर होतेच पण यात त्यांच्या पत्नी गोदावरी ताईंनीसुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका साकारली.

स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि लेखिका अशी त्यांची ओळख. आपल्या पतीसोबत मिळून त्यांनी वारली आदिवासी समाजासाठी जे केलं त्यामुळे हा समाज पुढे यायला मदत आली.

१९४२ नंतर बंदिवासातून बाहेर पडल्यावर कॉ. शामराव आणि गोदावरी ताईंनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काम करायचं ठरवले. शामरावांनी शेतकरी प्रश्नाचा सखोल अभ्यास केला होता. शेतकरी राजकीयदृष्ट्या जागृत झाल्याशिवाय, शेतकऱ्यांची लढाऊ संघटना उभारल्याशिवाय समाजवादी क्रांती अशक्य आहे. ही त्यांची ठाम व अचूक भूमिका होती. त्यामुळे या दोघांनी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कामास सुरुवात करायच ठरवलं.

त्यानूसार महाराष्ट्र प्रांतिक किसान सभेच्या अधिवेशनाचा प्रचार ठाणे जिल्ह्यातील तालुक्यामध्ये करावा असे निश्चित झाले. त्यावेळी आदिवासी वस्तीच्या तलासरी, डहाणू या भागांत हे दाम्पत्य पोहोचलं. तेथील आदिवासींचे ते मुकेकंगाल, परस्वाधीन, गुलामीचे जिणं त्यांनी पहिलं, आणि ह्यातून या लोकांसाठी कां करायचं त्यांनी ठरवले.

समान विचार घेऊन स्वतंत्र पद्धतीने लोकसंघटन करणाऱ्या गोदावरीताईंचे कार्य केवळ शामरावांना साथ देण्यापुरते मर्यादित नाही. पतीच्या समाजकारणामध्ये स्वतःची वेगळी वाट निर्माण करणे ही त्यांची खासीयत.

यावरून एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो.

आदिवासी लोकांसोबत काम करत असताना एकदा गोदावरी यांनी काही आदिवासी मुलांना कोंड्याची भाकरी आणि मिठाचा खडा चघळताना पाहिलं,
डोळ्यांत पाणी उभं राहिलं. त्यानंतर त्यांनी स्वता: जेवताना कोंड्याची भाकरी खाऊन पाहावी म्हणून घेतली होती. पण उघडी बाघडी, कामट्याच्या कुडात ठेवलेली ती भाकरी खाताना गोदावरी ताई कित्येकदा विचारात पडल्या. पण ताईनी भाकरी निखाऱ्यावर उलटीपालटी करून भाजली आणि खाल्ली.

एका ठिकाणी या घटनेचा उच्चार करताना गोदावरी ताई सांगतात. भाकरीत क्वचित भाताची तुसे तशीच होती. ती तोंडाला लागत होती. मनात विचार आला, आतड्याला कोठे लागून काही होणार तर नाही ना?

गोदावरीताईंनी जेव्हा भाकरी खाल्ली. तेव्हा वारली आदिवासी समाजाच्या डोळ्यांत पाणी चमकलं. रोजची कोंड्याच्या भाकरीशी गाठ असलेल्या वारल्यांची ती भावना अंतःकरणाचा ठाव घेणारी होती.

पुढे त्यांनी आदिवासी आपले हक्क मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले, आंदोलन केले. आणि याचं परिणामी आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला. कित्येक वर्षांची गुलामाची सुरू असलेली पद्धत मोडीत निघाली. जमीनीचे सात-बारा उतारे आदिवासींच्या नावावर होऊ लागले. शिक्षण-आरोग्यापासून कित्येक विषयांवर आदिवासींचे प्रश्न सुटण्यास मदत झाली.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.