कोल्हापुरात जाताय ? हे मार्ग वाहतुकीसाठी बंद

कोल्हापुरात पावसाची संततधार सुरु असून पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर (NH4) सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास नदीचं पाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर आल्याने वाहतूक बंद झाली आहे. सद्यस्थितीत महामार्गावरून ५ ते ६ फूट पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबली आहे.

सांगली-कोल्हापूर बायपास मार्गासह जिल्हा व राज्य ८ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त गावात आता साहित्याची बांधाबांध सुरू आहे.

शिरोली MIDC हद्दीतील पुणे – बेंगलोर NH-4 हायवे लगत असणाऱ्या सांगली फाटा, कोल्हापूरकडे जाणारा सर्विस रोड, बेंगलोर पुणेकडून शिरोलीकडे जाणाऱ्या सर्विस रोडवर 3-4 फूट पाणी असल्याने बंद करण्यात आले आहेत.

सांगली फाटा ते इचलकरंजी सांगलीकडे जाणाऱ्या शिरोली जुन्या नाक्याजवळ मार्बल लाईन येथे रोडवर पाणी आल्याने सदरचा रस्ता बंद असून एकेरी वाहतूक सुरू आहे.

हनुमान नगर शिये -कसबा बावड्याकडे जाणारा रस्ता शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शिये नाका बंद. हनुमान नगर येथे बॅरिकेटिंग लावून बावड्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.

शिये-भुये, निगव्याकडे जाणारा मेन रोड, आडवा ओढा येथे रोडवर तीन ते चार फूट पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.

उदगांव-जयसिंगपूर रेल्वे स्टेशनरस्ता बंद

बंद असणारे मार्ग

पंचगंगा नदीच्या पाण्यामुळे नांदणी-शिरढोण, नांदणी-धरणगुत्ती व नांदणी-कुरुंदवाड मार्ग, हेरवाड-अब्दुललाट, शिरढोण-कुरुंदवाड, कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग, मलकापूर ते रत्नागिरी मार्गावर येल्लूरजवळ पाणी, बर्कीजवळ पुलावर पाणी, मालेवाडी-सोंडोली येथील पूल, उखळू, खेडे, सोंडोलीकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी, कडवी पुलावर पाणी, मलकापूर ते शिरगाव मार्ग बंद, करंजफेण, माळापुढे, पेंढाखळे वाहतूक थांबवली, करुंगळे ते निळे व कडवे ते निळे मार्ग बंद, निलजी, ऐनापूर बंधार्‍यावर पाणी; वाहतूक बंद, मालेवाडी ते सोंडोली रस्त्यावर पाणी, गगनबावडा मार्गावर किरवे येथे पाणी; वाहतूक बंद, कसबा बीड-महेदरम्यानचा पूल पाण्याखाली, गारगोटी-गडहिंग्लज रस्ता वाहतुकीसाठी बंद, मुरगूड ते कुरणी हा बंधरा पाण्याखाली,, निढोरीमार्गे कागल या रस्त्यावरून वाहतूक सुरू, सुरुपली ते मळगे बंधारा पाण्याखाली, बस्तवडे ते आणूर बंधार्‍यावर पाणी, कोवाडे, नांगनूर, निलजी, ऐनापूर या बंधार्‍यांवर पाणी, महे ते बीड मार्गावर पाणी; वाहतूक बंद

पर्यायी मार्ग आहेत. पण बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.