सोन्याचा मास्क बनवणाऱ्या काकांची बातमी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये छापून आलेय

वाह् वाह् क्या बात हैं.

आज सकाळी एक अनपेक्षित धक्का बसला. म्हणजे तसा तो गेल्या आठवड्यातच बसायला पायजे होता. पण आपली माती आपली माणसं पक्की ठावूक असल्याने विशेष काही वाटलं नाही. पण आजचा धक्का विशेष होता.

कारण पुण्यात ज्या माणसाने कोरोनाकाळात उपयोगात यावा म्हणून सोन्याचा मास्क तयार केला होता त्याची बातमी चक्क साऊथ चायना पोस्टवर झळकली होती. आत्ता यात विशेष काय तर भावांनो हा मराठी माणूस जगात व्हायरल झालाय. कळतय का जगात चा अर्थ. इथं बाणेरमधल्या माणसाला पिंपरीत कोणी विचारत नाही आणि काका जगात व्हायरल होवून बसलेत. हाय का नाद…! 

तर आत्ता आपण डिटेल्स प्रकरण समजून घेवूया. 

शंकर कुऱ्हाडे अस या काकांच नाव आहे. पुण्यातल्या अनेक मान्यवर व्यक्तींसारखाच त्यांना सोन्याचा नाद आहे. यापूर्वी किलोकिलोत ब्रेटलेट, पाची बोटात अंगठ्या वगैरे घालून ते आपला आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करतच होते. आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते काम काय करतात. तर पुण्यात इंडस्ट्रियल शेड उभा करण्याचा त्यांचा बिझनेस आहे.

सोन्याचा मास्क बनवण्याची आयड्या त्यांना एकाने चांदीचा मास्क बनवल्याची बातमी ऐकून आली. त्यानंतर त्यांनी ऑर्डर दिली आणि आठ दिवसांच्या प्रयत्नाने ६ तोळ्यांचा हा मास्क बनून तयार झाला. विशेष म्हणजे हा मास्क टिकवून ठेवण्यासाठी पाच रुपयेच्या चार इलेस्टिकच्या पट्ट्या उपयोगात आणण्यात आल्या.

साऊथ चायना पोस्टमध्ये मास्कची किंमत ४ हजार डॉलर म्हणजे साधारण २ लाख ८० हजार रुपये इतकी सांगण्यात आली आहे. 

इथपर्यन्त तर आपल्याला माहितीच आहे. पण मज्जेची गोष्ट म्हणजे जागतिक पातळीवर काका व्हायरल झाल्यानंतर जग काय म्हणतय याचा घेतलेला आढावा. कारण जग काय म्हणलं हे आपल्याकडं छोट्या-छोट्या गोष्टीत देखील सिरीयसली घेतलं जातं. तेव्हा आत्ता खरच जग म्हणायला लागलय तर दूर्लक्ष का करा.

म्हणून इथल्या वेचक कमेंट आम्ही तुमच्यासाठी घेवून आलोय. 

एकजण म्हणतोय, आमचा भ्रमनिरास झाला. या माणसाने सोन्याचे इलेस्टिक का लावले नाहीत. दूसऱ्याचं म्हणणं आहे की, कोरोनामुळे यांना काहीच होणार नाही पण एखादा माणूस सोन्यासाठी याचा जीव घेवू शकतो. तिसऱ्याचं म्हणणं आहे की मुळात हा सोन्याचा मास्क नाहीच, तर ही सोन्याची वाटी आहे. चौथा म्हणतोय, त्याचा पैसा आहे तो काय पण करेल. तुम्ही का टेन्शन घेताय. तर पाचवा म्हणतोय, याच पैशात त्याने मास्क घेतले असते आणि गरिबांना वाटले असते तर कितीजणांचा जीव वाचवण्याच पुण्य पदरात पडलं असतं.

तर काही अभ्यासक या मास्कमुळे काहीच फायदा होणार नाही अस म्हणतात, त्यांना बोलभिडूचं उत्तर आहे. अरे भावांनो काहीच फायदा कसा होणार नाय म्हणता,

एका मास्कवर काका आज साऊथ चायना मार्निंग पोस्टमध्ये झळकलेत. उद्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये झळकतील. त्यानंतर मऱ्हाटीचे संपादक कॉपी पेस्ट करून आपल्या पेपरात संपादकिय लिहतीय फिरून ते पुन्हा महाराष्ट्रात व्हायरल होतील.

असो तर खालील कमेंट वाचा आणि लिंकवर जावून द्विगूणीत आनंद घ्या. 

Screenshot 2020 07 06 at 11.32.33 AM Screenshot 2020 07 06 at 11.32.47 AM Screenshot 2020 07 06 at 11.32.56 AM

लिंक : https://www.facebook.com/355665009819/posts/10158544478669820/

Leave A Reply

Your email address will not be published.