कॅनडात शिकायला गेलेल्या गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालाची हत्या घडवून आणली होती…

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची  भर दिवसा मे महिन्यात ३० गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवालच्या खुनाचा मास्टर माईंड हा गोल्डी ब्रार असल्याचे तपासात समजले होते. त्याने कॅनडात बसून मुसेवाला याचा हत्येचा कट रचला होता. त्याला भारतात परत आणण्यासाठी पंजाब पोलीस, सीबीआय सारख्या तपास यंत्रणा करत होते.

हे चालू असताना अजून एका प्रकरणात गोल्डी ब्रारचं नाव आलं आहे. गोल्डी ब्रारनेच आता सलमान खानाला धमकी दिल्याचं पुढं आलं आहे. या आधी देखील लॉरेन्स बिष्णोई याने गोडी ब्रारनेच मुसेवालाची हत्या केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे कॅनडात राहुन भारतात कारवाया करणारा गोल्डी ब्रार पुन्हा चर्चेत आलं आहे.

पंजाब मधील गोल्डी ब्रार हा कॅनडात कसा गेला? हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

गोल्डी ब्रारच खरं नाव हे सतविंदर सिंह होत. त्याने ते नंतर बदलून घतले. त्यांचा जन्म पंजाब मधील मुक्तसर साहिब येथे  १९९४ मध्ये झाला. शिक्षणात तो हुशार नव्हता. शाळेत सुद्धा सहकाऱ्यांशी भांडण करत असे. चाल ढकल करत त्याने BA ची पदवी मिळवली.

या काळात त्याचा क्राईम जगतात प्रवेश झाला होता. गोल्डी ब्रार पंजाब पोलिसांच्या A प्लस कॅडेगिरी मधील आहे. पंजाब पोलिसांकडे गोल्डीचे ५ फोटो आहे आणि या सगळ्या फोटोत तो वेग वेगळा दिसतो. त्यामुळे एक लक्षात येत की गोल्डी हा नेहमी आपला चेहरा बदलत असतो. त्यामुळे त्याला पकडणे हे सोपं काम नव्हतं.

गोल्डी वर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, बळजबरी असा शकडो केसेस त्यांच्या अंगावर आहेत. त्यातील ४ केस मध्ये त्याची सुखरूप सुटका झाली. यानंतर त्याने भारत सोडण्याचा निर्णय घेतला. तो २०१७ ला  कॅनडाला शिक्षण घेण्यासाठी गेला. त्याला स्टुडंट व्हिजा मिळाला होता. अशा प्रकारे तो भारत सोडून कॅनडाला  गेला.

यानंतर तो कॅनडा मधून पंजाब मधील गुन्हेगार लॉरेन्स भिष्णोईच्या गॅंगसाठी काम करू लागला.

लॉरेन्स भिष्णोईच्या सगळ्यात जवळचा म्हणून त्याला ओळखलं जात. मुसेवाला प्रकरणात पंजाब पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. १८५० पानी असणाऱ्या या चार्जशीट मध्ये त्यात गोल्डीने लॉरेन्स भिष्णोई, जग्गू भगवानपुरीया यांच्या सोबत मिळवून त्याने सिद्धूची हत्या केली. तसेच त्याला मुसेवालाच्या हत्येचा मास्टर माईंड म्हटले आहे. २८ मे ला मुसेवाला याची पंजाब सरकारने सुरक्षा काढून घेतली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २९ तारखेला त्याची  गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती.

गोल्डी ब्रार ने मुसेवालाच्या खुनाचा कट रचला, मारेकऱ्यांना पैसे दिले, त्यांना कार मिळवून दिली, फोन, सिम कार्ड याची सगळी व्यवस्था करून दिली होती. सिंगल ऍपच्या आधारे गोल्डी मारेकऱ्यांशी बोलत होता. 

गोल्डी ब्रार ने मागच्या वर्षी खून झालेल्या अकाली दलाचा युवा नेता विक्की मुद्दुखेराच्या बदला घेण्यासाठी मुसेवालाची हत्या करण्यात आल्याचे सांगितलं जातं.  गोल्डी सिद्धू मुसेवाला बरोबरच डेरा सच्चा सौदाच्या सदस्य असणाऱ्या एका महिलेची हत्या घडवून आणला होता. तसेच त्यापूर्वी काँग्रेस नेते गुरलाल सिंह पहलवान यांची हत्या केल्या प्रकरणी अटक वॉरंट काढला आहे. मात्र तो कॅनडात बसून असल्याने त्याच्या पर्यंत पोलिसांना पकडता आलेले नाहीत.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.