गोल्फमधील मेडल हुकलं तरी ते मिळवण्याचं स्वप्न भारताने अदितीच्या भरवश्यावर पाहिलं होतं….

अदिती ३ वर्षाची होती तेंव्हापासून तिची ऐकण्याची क्षमता कमी झाली, तिला नीट ऐकू यायचं नाही.. त्यामुळे क्लासमेट्सने तिची थट्टा उडवणे सुरु केले त्यामुळे ती एकटी पडायची, पण याच एकटेपणाला तिने आपलेसे केले. आणि शांततेत खेळल्या जाणाऱ्या गोल्फशी तिची मैत्री झाली. अदिती अशोक !

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अदिती अशोक या खेळाडूनं भारताकडून दमदार खेळी करत या खेळ प्रकारात भारताला पदकाच्या जवळ नेलं होतं. पण अदिती टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. ती चौथ्या क्रमांकावर होती. आणि नेली कोरडाने या स्पर्धेत गोल्फ मिळवले आहे.

आज जरी अदितीकडून मेडल हुकलं, पण काही दुःख नाही. कारण तिच्याचमुळे भारत देश गोल्फ पाहू लागला !

या संपूर्ण सामन्यादरम्यान अदितीने कडवी झुंज दिली आणि चौथ्या फेरीतही ती दुसऱ्या क्रमांकावर, कधीकधी तिसऱ्या क्रमांकावर येत राहिली. पण शेवटी अदिती मागे पडली. त्याने -१५ गुण मिळवले. त्याचवेळी इनामी आणि लिडिया यांनी -१६ गुण मिळवून बरोबरी साधली. आता दोघेही रौप्य आणि कांस्यपदकासाठी प्लेऑफमध्ये जातील. तर नेली कोरडाने -१७ गुण मिळवून सुवर्णपदकावर कब्जा मिळवला आहे.

अदितीचे हे पहिले ऑलिम्पिक नाहीये.

अदिती अशोकची हे पहिले ऑलिम्पिक नाही तर याधी देखील २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने  भारताचे प्रतिनिधित्व केले होते. गोल्फ कोर्सवर पाऊल ठेवल्यापासूनच अदिती अशोकने इतिहास घडवला होता.

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी ऑलिम्पिक गोल्फ कोर्समध्ये प्रवेश करणारी पुरुष आणि महिला दोन्ही प्रकारातील सर्वात तरुण गोल्फर म्हणजे अदिती ! त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फरही बनली.

ती या खेळाकडे कशी वळली ?

अदिती ५ वर्षांची होती तेंव्हा ती तिच्या कुटुंबासोबत बंगलोरमधील एका हॉटेल मध्ये जेवायला गेली असता त्याच हॉटेल च्या समोर, कर्नाटक गोल्फ असोसिएशनचा कोर्स होता ते पाहून तिचे वडील अशोक गुदलमणि अदितीला घेऊन इथे गोल्फ खेळायला आत गेले.  लोकांना हा खेळ खेळतांना पाहून अशोक यांनी देखील आपल्या मुलीला तोच खेळ शिकवायला सुरुवात केली.

आणि मग अशोक हे दंगल मधल्या ‘हानिकारक बापू’ सारखे अदितीसाठी एक कडक शिस्तीचे प्रशिक्षक बनले. 

वयाच्या अवघ्या साडेपाच वर्षांच्या वयात वयाच्या अदितीला गोल्फ क्लब दिला. सकाळ-दुपार-संध्याकाळ गोल्फ-गोल्फ-गोल्फ-सायकल अशी ट्रेनिंग सुरू झाली आणि या बाप-लेकीच्या जोडीने फक्त ३ वर्षांत आपली पहिली स्पर्धा जिंकली, जेव्हा अदिती ९ वर्षांची होती आणि वयाच्या १२ व्या वर्षी अदिती टीम इंडियाची सदस्य झाली.

आणि टीम इंडियासाठी खेळायला लागली अदितीने गोल्फ कोर्सवर जो काही पराक्रम केला आहे, तो तिने खूप कमी वयात केला आहे.

तिच्या यशात मोठा वाटा असलेले तिचे वडील काही गोल्फर नाहीत.

अदितीचे वडील गोल्फर नाहीत, ते सामान वाहून नेण्यासाठी, प्रशिक्षक आणि गोल्फ कोर्सचा सल्ला घेण्यासाठी कॅडी म्हणून काम करायचे. कॅडी त्याच्या गोल्फरचे नाव असलेली जर्सी घालतो.

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये, तिचे वडील तिच्यासाठी कॅडी करत होते. तर त्याच्या पाच वर्षांनंतर, तिची आई टोकियो ऑलिम्पिकमध्ये अदितीच्या आईने कॅडी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. जेव्हा अदिती ऑलिम्पिक खेळण्यासाठी रिओला पोहोचली तेव्हा अशोक सांगतात कि,,’मी अक्षरशः रडलो. लहानपणी आपण सर्वांचे ऑलिम्पिकला जाण्याचे स्वप्न असते. अदितीने मला इथे आणले आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी तिचा ऋणी आहे”.

गोल्फ कसा खेळला जातो हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता लागली होती. अदिती ऑलिम्पिकमध्ये पदक कमवू शकली नाही पण गोल्फच्या जगात ‘नेक्स्ट बिग नेम’ बनली आहे, केवळ भारतातच नाही तर जागतिक गोल्फ सीनमध्ये तिचं नाव आवर्जून घेतलं जातं.

गोल्फ सारख्या हायप्रोफाईल खेळात भारताची ताकद असलेली अदिती ऑलिम्पिकमधील सर्वात तरुण खेळाडू आहे हे भारतासाठी अभिमानास्पद आहे !

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.