गुगल पे आणि पेटीएमचं मार्केट डाऊन करून फोन पे आज सगळ्यात जास्त उलाढाल करतंय..

जेव्हापासून भारतात ऑनलाईन पैसे पाठवण्याची सोय आली आहे तेव्हापासून रस्त्यात आधीसारखे पैसे सापडण्याचं प्रमाण फारच कमी झालंय. जोक बाजूला ठेवू पण ऑनलाईन मनी ट्रान्सफरचं फॅड आल्यापासून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम या ऍप दिसतात. पण या ऑनलाईन ऍप मध्ये सुद्धा मोठी स्पर्धा होती.

गुगल पे आणि पेटीएमला मागे टाकत फोन पे ने आपली सत्ता ऑनलाईन मनी ट्रान्सफरच्या फॉरमॅटवर गाजवली आहे. युपीआय [ UPI ] ट्रान्झॅक्शन मध्ये ४४ % मार्केट फोन पे चं आहे. पण हि फोन पे ऍप बनवली कोणी, तिचा फाउंडर कोण आहे आणि तिचा व्यापार कसा चालतो याची डिटेल माहिती आपण बघूया. 

२०१५ मध्ये फोन पे ची सुरवात झाली होती. फोन पे ला बनवलं ते म्हणजे समीर निगम, बरझिन इंजिनीर आणि राहुल चारी या तिघांनी पण मेन कन्सेप्ट हि समीर निगम यांची होती. हे तिघेही अगोदर फ्लिपकार्टचे एम्प्लॉईज होते.

फ्लिपकार्टमधे काम करत असताना या तिघांच्या हे लक्षात आलं कि टेक्नॉंलॉजीची जितकी क्षमता आहे त्यानुसार त्याचा वापर हा पेमेंट क्षेत्रात झालेला नाही. यावर मग त्यांनी पेमेंट सेक्ट्रमध्येच काम करायचा विचार केला.

थोडीफार शोधाशोध केल्यानंतर त्यांच्या एक लक्षात आलं कि आजच्या काळात स्मार्टफोनची किंमत हि कमी कमी होत जाणार आहे. भविष्यात इंटरनेटसुद्धा भारतात चांगल्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी UPI म्हणजे UNIFIED PAYMENT INTERFACE भारतात आल्यावर आरबीआय सोबत काही व्यवहार झाला. यातच जन्म झाला फोन पे चा.

UPI ट्रान्झॅक्शन करणारा फोन पे पहिलीच ऍप ठरला. याअगोदर जे वॉल्लेट वाले ऍप होते त्याला वापरण्यासाठी अगोदर बँकेत पैसे जमा करायला जावं लागायचं, तिथून वॉलेट मध्ये पैसे ट्रान्सफर करावे लागायचे आणि तिथून पुढे ते वापरता यायचे. यावर उपाय म्हणून फोन पे ने UPI च्या मदतीने हि पद्धत सोपी केली आणि जास्तीचे परिश्रम टाळण्यास मदत केली. 

फोन पे सुरु झाल्यावर काही दिवसांनी लगेचच फ्लिपकार्टने ते विकत घेतलं. २०१७ पर्यंत १० मिलियन लोकांनी फोन पे ऍप डाउनलोड केलेलं होतं. डिमॉनेटायझेशनच्या काळात फोन पेला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला. ऑनलाईन शॉपिंगमध्ये गेटवे म्हणून फक्त फोन पे चाच पर्याय सुरवातीला होता. जेव्हा जेव्हा ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपण काही खरेदी करू तेव्हा फक्त पेमेंट ऑप्शन हा फोन पे होता.

ऑनलाईन शॉपिंगमधून फोन पे ला मार्जिन मिळतं. ऍपवर दिसणाऱ्या जाहिरातीतूनसुद्धा त्यांची आर्थिक उलाढाल चालते. फोन पे वरून लाईटबील, रिचार्ज करता येत आणि यावर बऱ्याच गोष्टी एक्स्प्लोर करता येतात. सोबतच म्युच्युअल फंड, विमा, आणि सोने खरेदी करण्याची सुद्धा सोया यावर उपलब्ध आहे. जेव्हा फोन पे वरून आपण ट्रान्झॅक्शन करतो त्यातूनसुद्धा फोन पे ला फायदा होतो. 

अनेक प्रकारातून फोन पे आपली आर्थिक उलाढाल घडवत असते. ११ भाषांमध्ये फोन पे आपली सर्व्हिस देते. २१.८० करोड लोकं आज घडीला फोन पे वापरतात. गुगल पे आणि पेटीएम या दोन ऍप फोन पे च्या मोठ्या स्पर्धक मानल्या जातात. करोडोंमध्ये आज फोन पे उलाढाल करते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.