याहू बंद पडलं ते गुगल मुळं नाही, तर स्वत:च्या कर्मामुळं…!!!

कॅब बुक करायची आहे, चांगलं हॉटेल शोधायचं आहे, चांगले कपडे कुठं मिळतात हे पाहायचं असेल तर दरवेळी आपण मदत घेतो ती गुगलची. सगळं काही गुगलवर सर्च केल्या शिवाय पर्यायच नाही.

 गुगल शिवाय आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. 

मात्र त्यापूर्वी सुद्धा एक सर्च इंजिन होत. गुगलला सुद्धा त्याची मदत घ्यावी लागली होती. एकेकाळी सर्वाधिक व्हिजिट असणारी वेब साईट होती. मात्र, आज असं झालं की, या कंपनीचे नाव सुद्धा गायब झाले आहे.      

या कंपनीचे नाव म्हणजे याहू.

९० च्या काळात इंटरनेट अगदी नवीनच होत. १९९४ मध्ये दोन मित्र जेरी यांग आणि डेव्हिड फिलो एकत्र इंटरनेट वापराचे. यावेळी एखादी वेबसाईट शोधणं अवघड काम होत. एक वेब साईट शोधायला तास-तास लागायचे. यामुळे यांग आणि फिलो यांना सर्च करायचा कंटाळा यायचा.

त्यामुळे यांग आणि फेलो यांनी रोज लागणाऱ्या वेबसाईटची लिस्ट तयार केली. तसेच वेगवेगळ्या विषयाची कॅटेगरी बनवली. शोधतांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ही लिस्ट तयार केली होती. त्यामुळे त्यांना हव्या त्या वेबसाईट भेट देतांना अडचण येत नव्हती. याला त्यांनी वेबसाईटला डिरेक्टरी असे नाव दिले. यामुळे वेबसाईट सर्च करणे सोपे झाले होते. जेरी अँड डेविड्स गाईड टू वर्ल्ड वाईड वेब असे दिले. 

वेबसाईट शोधायला सोपं जावं म्हणून या दोन मित्रांनी डिरेक्टरी तयार केली होती. त्याचा व्यासायिक उपयोग करावा असा कुठलाही हेतू या दोघांचा नव्हता.     

१९९४ मध्ये नेटस्केप कंपनीने नेटस्केप नेव्हीगेटर नावाचे ब्राऊजर सुरु केले होते. हे ब्राऊजर खूप लोकं वापरू लागले होते. नेटस्केपने आपल्या ब्राऊजर मध्ये डिरेक्टरीची लिंक कोपऱ्यात द्यायला सुरुवात केली. असं झालं की, डिरेक्टरीवर लोकांची उडी पडू लागली. 

एकीकडे सर्च करणारे आणि दुसरीकडे आमची वेबसाईट डिरेक्टरी ऍड करा म्हणून गर्दी करू लागले. यामुळे यांग आणि फेलो यांना डिरेक्टरी सांभाळणे अवघड झाले. यामुळे त्यांनी काही जणांना सोबत घेतले. गरजेसाठी सुरु केलेली गोष्ट व्यवसायात रूपांतरित झाली. त्याला याहू असे नाव देण्यात आले. 

यानंतर सगळ्या कंपन्यांनी याहूवर ऍड दाखविण्यासाठी पैसे द्यायला सुरुवात केली. याहूकडे चांगलाच डेटा जमा झाला होता. कोण कुठल्या वेबसाईटला कशासाठी भेट देत याची माहिती जमा झाली होती. या माहितीच्या आधारे  याहूने आपले प्रॉडक्ट बाजारात आणले. 

इतर लोक चॅट रूमवर जात होते ते पाहून याहूने चॅट रूम सुरु केलं. त्यानंतर फाईल शेअरिंग, शॉपिंग, गेम्स अशी सर्व्हिस सुरु केले. ६ वर्षात म्हणजेच २००० साला पर्यंत याहूच्या वेबसाईट वर ४०० प्रॉडक्ट झाले होते. आणि कंपनीचे व्हॅल्यूशन १२८ बिलियन डॉलर पेक्षा जास्त झाली होती. 

तर दुसरीकडे २००५ मध्ये इतर कंपन्या बाजारात आल्या होत्या आणि याहू आपल्या मर्जी प्रमाणे काम करत होती. गुगल अल्गोरिदमचा वापर करून जाहिरात दाखवत होते तर याहू मॅन्युअली जाहिरात दाखवत. म्हणजे त्यांना हव्या त्याच जाहिराती आपल्याला दिसत. तुम्ही काय सर्च करता हे यावरून जाहिराती नसायच्या. 

गुगल अल्गोरिदमचा करत असल्याने सर्च केल्यानंतर लोकांना प्रॉपर रिजल्ट मिळत होता. यामुळे याहू पेक्षा गुगल वापरणं लोकांना चांगले वाटायचे. यामुळे याहू वापरणारे गुगलचा वापर करू लागले. याहू ने गुगल सोबत एक करार केला आणि तोच त्यांना मारक ठरला. 

याहू आपल्या होम पेजवर गुगल सर्चच ऑप्शन दिलं होत. याहूने यासंदर्भात एक विचार केला होता. लाखो युजर गुगल वर येतील आणि आपल्याला त्यातून चांगले पैसे मिळतील. मात्र, याहू वरून गुगल वापरणाऱ्यांनी कधीच पुन्हा याहू वापरल नाही. यामुळे याहू वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली.  

यानंतर याहूने गुगल आपल्या वेबसाईटवरून हटविले आणि अल्गोरिदम वापर सुरु केला.  तुम्ही जे सर्च करत होता त्याच संदर्भातील जाहिराती तुम्हाला दिसत होत्या. त्यामुळे कंपन्या सुद्धा गुगल वळू लागल्या होत्या. यामुळे याहू परत गुगलकडे गेले आणि कंपनी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. १ बिलियन डॉलर मध्ये ही डील ठरली होती. मात्र, याहूकडून ही डील रद्द करण्यात आली.

२००६ मध्ये मार्क झुकरबर्ग यांच्यावर इन्व्हेस्टर आणि संचालक मंडळाचा दबाव वाढू लागला होता. त्यामुळे त्यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आणि ही कंपनी याहूला विकण्यात येणार होती. फेसबुक ने १ बिलियन मध्ये कंपनी विकत देण्याचे मान्य केले होते. मात्र याहूने फेसबुक ८५० मिलियन देता येतील एवढेच देता येतील असे सांगितले. यामुळे ही डील सुद्धा बारगळली. 

जर याहूने गुगल आणि फेसबुकची डील मान्य केली असती तर आज चित्र वेगळे राहिले असते. गुगल, याहू आणि फेसबुक हे एकाच मालकाचे झाले असते. मात्र, पुढे जाऊन या कंपन्या किती मोठ्या होऊ शकतात याचा अंदाज याहूला बांधता न आल्याने आज वेगळी परिस्थिती आहे.

मुळात याहूने ६ वर्षात ५ CEO बदलले. 

यातील एकाही CEO कडे व्हिजन नव्हते. तसेच याहूकडून या ६ वर्षात २४ वेळा मिशन स्टेटमेंट बदलेले होते. याहूने अनेक गोष्टी केल्या पण वापरणाऱ्यांना काय हवं हेच दिल नाही. यामुळे त्यांचे ९० टक्के प्रॉडक्ट फेल गेले. त्यांच्या मेसेंजर व्हाट्सअप ने बिट केलं, त्यांचा मेलला बिट केलं जी मेल ने.   

याहू गुगल मुळे नाही तर आपल्या निर्णयामुळे मागे पडलं. 

एकवेळ याहुची व्हॅल्यू १२८ बिलियन डॉलरची होती त्या कंपनीला व्हेरिझॉन ४.४६ बिलियन डॉलरला विकत घेतली. 

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.