GOT ट्रेलर पाहिला, आत्ता आमचे अंदाज वाचा.

परवा रात्री नऊ वाजता भारताती निम्मी लोकं एअर स्ट्राईकचे पुरावे मागत होते. राहिलेली निम्मी लोक हे पुरावे गोळा करण्यात गुंतलेले. आत्ता यातनं राहिलेले काही नग होते रात्रीस खेळ चाले सारख्या सिरीयल पाहून शुन्यात नजर लावून होते. सारखी सारखी बोटं मोबाईलकडं चाललेली. आणि अचानक चमत्कार झाला. पुरावे मागणाऱ्यातले निम्मे, पुरावे देणाऱ्यातले निम्मे आणि रात्रीस खेळ चाले पाहणाऱ्यातला एखादा दूसरा गायब झाला.

निम्याच्या वरती जग फक्त एकाच गोष्टीची चर्चा करु लागलं. ती गोष्ट होती आपला GOT चा ट्रेलर. गेम ऑफ थ्रोन्स च्या 8 व्या सिजनचा ट्रेलर आला भक्तगणांचा राडा राडा चालू झाला. ट्रेलर बघितला आणि आत्ता बोललं पाहीजे, चर्चा झाली पाहीजे असा सुर लागला. म्हणूनच हि ट्रेलकवरची खास चर्चा,

“बोलभिडूच्या कार्यकर्त्यांसाठी”. 

1) आर्या स्टार्क. 

got 1

ट्रेलर च्या सुरवातीलाच जखमी झालेली आर्या स्टार्क कोणापासून तरी आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसते. आर्या स्टार्क चा इतिहास बघता ती कुठल्या जिवंत माणसाला तरी अशी घाबरून पळणार नाही. मग आर्मी ऑफ डेड मधल्या एखादा विट्स तिच्या मागे लागला आहे का? ती खरच घाबरली आहे का, जो कोणी तिच्या मागावर आहे त्याला ती ट्रॅप मध्ये अडकवत आहे.

कारण याआधी देखील सहाव्या सीजन मध्ये आर्याने ‘द वेफ’ ला मारायला असाच ट्रॅप लावला होता. ट्रेलर मध्ये आर्या च्या हातात ड्रॅगन ग्लास पण दिसत आहे त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही कि तिच्या मागावर असलेल्या विट्स ला ती या ड्रॅगन ग्लास ने संपवू शकते. ‘Many-Faced-God’ ने आर्याला दिलेलं वरदान बघता शेवटी नाईट किंग ला मारण्याची जास्त शक्यता आर्याकडूनच आहे.

२) गोल्डन कंपनी.

got 2

GOT चा सातवा सीजन संपतानाच आपल्याला अंदाज आला होता सर्सी लॅनिस्टर वेस्टरॉस ची राणी बनण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते. जेमी लॅनिस्टर च्या विरोधाला न जुमानता देखील तिने युरोन ग्रेजॉय ला एसोस मधल्या ‘गोल्डन कंपनी ‘ बरोबर आपल्यासोबत लढण्यासाठी बोलणी करायला पाठवले होते. ‘गोल्डन कंपनी’ हि सेलस्वार्ड म्हणजेच पैशाच्या बदल्यात कोणाकडूनही आणि कोणाविरुद्धही लढू शकणारी सर्वात मोठी फौज आहे.

या ट्रेलर मध्ये युरोन ग्रेजॉय कुठे दिसत नसला तरी त्याच्या जहाजातून येणारी ‘गोल्डन कंपनीची’ फौज दिसत आहे. म्हणजेच आता गोल्डन कंपनी सर्सी च्या बाजूने लढणार हे स्पष्ट आहे. संपूर्ण वेस्टरॉस एकत्र येऊन नाईट किंग विरुद्ध लढत असताना, सर्सी तिचं एवढं मोठं सैन्य घेऊन इतरांना मदत करणार का वेस्टरॉस ची राणी होण्याच्या हट्टापायी आपल्याच लोकांबरोबर युद्ध करणार हे बघणं इंटरेस्टिंग आहे.

३)आर्मी ऑफ डेड. 

got 3

GOT च्या पहिल्या एपिसोड पासून ज्यांच्या येण्याची भिती घातली जात आहे ती नाईट किंग ची ‘आर्मी ऑफ डेड’ शेवटी विंटरफेल मध्ये आलेली ट्रेलर मध्ये दिसत आहे. असं म्हणतात कि आतापर्यंतच्या टिव्ही आणि सिनेमा च्या इतिहासातील सर्वात मोठ युद्ध जे तब्ब्ल ११ आठवडे शूट केलं जात होत ते ‘बॅटल ऑफ विंटरफेल’ आर्मी ऑफ डेड आणि वेस्टरॉस मधल्या सैन्यामध्ये होणार आहे.

पण GOT फॅन्स ना अशा टेक्निकल गोष्टीत कोणताही इंटरेस्ट नाही. प्रश्न असा आहे कि या युद्धात जिंकणार कोण किंवा कोण जिवंत राहणार? GOT चे आपले प्रसिद्ध लेखक जॉर्ज आर. आर. मार्टिन यांचा स्वभाव बघता भरपूर फॅन्स ना या युद्धात आपल्या फेव्हरेट कॅरॅक्टर्स ना मरताना बघायला लागणार आहे हे नक्की.

४. डेनेरस टारगारियन आणि जॉन स्नो. 

got 4

जनतेच्या मनातील वेस्टरॉस चे राजा-राणी  डेनेरस टारगारियन आणि जॉन स्नो ट्रेलर मध्ये चिंतेत दिसत आहेत पण हि चिंता नाईट किंग ची नसून त्या दोघांना एकमेकांसोबत असलेलं त्यांच नातं समजल्यानंतरची आहे असं वाटत आहे. हे दोघेही विंटरफेल च्या क्रिप्ट मध्ये दिसत आहेत आणि त्यांच्या मागे लियाना स्टार्क म्हणजेच जॉन स्नो च्या आईची समाधी दिसत आहे.

याचा अर्थ असा आहे का, ब्रॅन स्टार्क ने जॉन स्नो ला त्याच्या खऱ्या आईबद्दल सांगितले आहे? त्याला डेनेरस बरोबर असणार आपलं नातं समजलं आहे का? आणि जर समजलं असेल तर पुढे त्यांचं नातं कोणत्या दिशेने जाणार?

५. जेमी लॅनिस्टर. 

got 5

GOT मधलं ‘व्हिलन टर्न्ड हिरो’ कॅरॅक्टर कुठलं असेल तर जेमी लॅनिस्टर च. आता जेमी हिरो जरी नसला तरी पहिल्या ५ सीजन मध्ये जेमी बद्दल असणारा सगळं द्वेष आता सहानुभूतीत बदलला आहे. पण छोट्या ब्रॅन ला त्याने टॉवर वरून ढकलून देणं कोणीही विसरलेल नाही. ट्रेलर मध्ये जेमी आता वेस्टरॉस च्या सैन्याबरोबर लढताना दिसत आहे, मग या दरम्यान जेमी आणि ब्रॅन ची भेट झाली आहे का? जर झाली असेल तर जेमी ला भेटल्यानंतर ब्रॅन ची प्रतिक्रिया काय असेल? जेमी मुळे आपल्याला कायमच अपंगत्व आलं म्हणून तो त्याच्यावर चिडेल का या अपंगत्वामुळेच त्याच्या  थर्ड आय रेव्हन मध्ये झालेल्या रूपांतराबद्दल आभार मानेल?

आर्या, सानसा आणि जॉन ला जेंव्हा समजेल कि आपल्या लहान भावाची हि अवस्था जेमी मुळे झाली आहे त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया काय असेल? ट्रेलर मधल्या जेमी लॅनिस्टर च्या विंटरफेल मधील प्रवेशाने खूप प्रश्न निर्माण झाले आहेत ज्याची उत्तरे आता फॅन्स आपापल्या परीने शोधत बसणार आहेत.

GOT च्या सातव्या सीजन चा पीक पॉईंट कोणता असेल तर,

got 6

नाईट किंग ने ग्रेट वॉल च्या ईस्टवॅच वर केलेला हल्ला. डेड आर्मी मध्ये सामील झालेल्या व्हीसेरीयॉन ड्रॅगन च्या मदतीने नाईट किंग ने ग्रेट वॉल ला पहिलं भगदाड पाडलं आहे. पण यावेळी ईस्टवॅच वर टॉरमंड आणि बेरीक डोन्डारियन हे दोघेही होते. व्हीसेरीयॉन च्या हल्यातून हे दोघे वाचतात का या प्रश्नाचं उत्तर ट्रेलर मधून मिळालंच आहे. आपली जळती तलवार घेतलेला बेरीक डोन्डारियन आणि त्याच्या बरोबर टॉरमंड दोघेही लढायला तयार बघून फॅन्स च्या जीवात जीव आला आहे.

ट्रेलर मधला अजून एक फील गुड सिन आहे,

got 7

तो म्हणजे गेंड्री ला ड्रॅगन ग्लास पासून हत्यारे बनवताना बघणे. व्हाईट वॉकर फक्त ड्रॅगन ग्लासनेच मारू शकतात ज्याची वेस्टरॉस च्या सैन्याकडे कमतरता होती. पण सॅम च्या मदतीने जॉन स्नो ड्रॅगनस्टोन वर या ग्लास चा संपूर्ण डोंगर हुडकून काढतो. आता या ट्रेलर मध्ये गेंड्री ड्रॅगन ग्लास पासून हत्यारे बनवताना दिसत आहे. वेस्टरॉसचं जिवंत माणसांच सैन्य डेड आर्मी बरोबर जिंकेल का नाही हा पुढचा प्रश्न आहे पण आता कमीत कमी त्यांच्याकडे व्हाईट वॉकर बरोबर लढण्यासाठी हत्यारे तर आहेत.

‘बॅटल ऑफ विंटरफेल’ आठव्या सीजन च्या तिसऱ्या एपिसोड मध्ये होणार आहे, आणि या ट्रेलर मध्ये जास्तीत जास्त भाग तिसऱ्या एपिसोड पर्यंतचाच दिसत आहे. एकूण सहा एपिसोड असणाऱ्या या सीजन मधील बऱ्याच गोष्टी या ट्रेलर मधून सध्या तरी आपल्या समोर आल्या नाहीत पण ट्रेलर बघता संपूर्ण सीजन मध्ये राडा असणार आहे हे मात्र नक्की. 

*लेख कॉपी केला तर ड्रॅगनच्या तोंडाखाली देण्यात येईल, गप्प गुमानं लिंक शेअर करायची. 

हे ही वाचा. 

1 Comment
  1. चिराग says

    टेलीब्रॅण्डच्या जाहिराती ह्या लेखापेक्षा कमी विनोदी असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.