कॅप्टन वरुणसिंग यांनी एकदा जीव धोक्यात घालून हजारो लोकांचे प्राण वाचवले होते.

भारताच्या इतिहासात ८ डिसेंबर २०२१ हा काळा दिवस उजाडला होता. याच दिवशी दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे आयएएफ हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर आणि १४ पैकी १३  त्यात बसलेल्या सदस्यांचा मृत्यू झाला होता. त्यात आपण आपले लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनाही गमावलं. 

पण अपघातानंतर स्थानिक लोकांनी बरीच मदतकार्य केल्यामुळे त्यातल्या एका सदस्याचा जीव वाचला होता ते म्हणजे,  ग्रुप कॅप्टन वरुण सिंग ! त्या दिवशीपासून ते आपल्या मृत्युला झुंज देत होते पण आज अखेर त्यांची हि झुंज थांबली आणि त्यांनी आपल्याला निरोप दिला. 

तामिळनाडूतील उटीजवळ कुन्नूर येथे भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर बचाव पथकाने जनरल बिपिन रावत आणि ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यासह दोन जण जिवंत असल्याचा दावा बचाव पथकाच्या सदस्याने केला होता.

एनसी मुरली, एक वरिष्ठ फायरमनने माध्यमांना बोलताना सांगितले होते कि,  “आम्ही दोन लोकांना जिवंत वाचवले. एक होते सीडीएस रावत. आम्ही त्याला बाहेर काढताच त्यांनी संरक्षण कर्मचाऱ्यांशी खालच्या आवाजात हिंदीत बोलत आपले नाव सांगितले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, जनरल रावत यांच्या शरीराच्या खालच्या भागात गंभीर जखमा झाल्या होत्या. 

बिपीन रावत यांच्यासहित आणखी जीव वाचला होता ते म्हणजे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचा…

पण या दुर्दैवी अपघातावेळेस ज्या गावकऱ्यांनी बचाव कार्यात मदत केली त्याबद्दल या गावकऱ्यांना भारतीय लष्कराने आभार मानले होते. लष्कराच्या मदत कार्यात हे गावकरी ‘देवांसारखे’ धावून आले होते. 

लष्कराने माध्यमांना सांगितलं होतं की, “त्या गावातल्या अनेकांनी मदत केली. गावकऱ्यांच्या मदतीशिवाय १४ जणांना वेळेत रुग्णालयात पोहोचवता आले नसते. याच गावकऱ्यांमुले हवाई दलाचे एकमेव अधिकारी जिवंत वाचले होते ते म्हणजे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग”.  

या मदतीची जाण ठेवून लष्कराने या गावालाच दत्तक घेतले आहे. 

याचवेळेस हि घोषणा करत लेफ्टनंट जनरल यांनी तामिळनाडू सरकार, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि विविध विभागांच्या सचिवांचे बचावकार्यात केलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले होते. 

जनरल ऑफिसर कमांडिंग हेडक्वार्टर दक्षिण भारत, लेफ्टनंट जनरल ए. अरुण यांनी माध्यमांना सांगितले होते की, गावकऱ्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी गावात सभा व कार्यक्रमांसाठी शेड बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे,  दक्षिण भारताच्या लष्कराच्या मुख्यालयाने हे गाव दत्तक घेण्याची घोषणा केली आणि सोबतच लष्कराने त्या गावात ब्लँकेट, रेशन साहित्य आणि सौर दिवे वाटप करायची घोषणा केली होती. 

दुर्दैवाने ग्रुप कॅप्टन वरुण सिंग आपल्यात आज नाहीत !

एक वर्षापूर्वी वरुण सिंह उड्डाण करत असलेल्या एका लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या सिस्टीमध्ये बिघाड झाला होता, परिणामी त्यांनी एअरक्राफ्ट वरील नियंत्रण पूर्णपणे गमावले होते. मात्र, मोठ्या धाडसाने  त्यांनी विमान उतरवण्यात यश मिळवले होते. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते.

त्यावेळेस काय घडलं होतं ?

विमान सुमारे १० हजार फूट उंचीवर असताना उड्डाणाची फ्लाइट कंट्रोल सिस्टम खराब झाली. पायलटला आपला जीव वाचवण्यासाठी विमानातून उडी मारण्याशिवाय पर्याय नव्हता, परंतु या स्थितीत विमान वस्तीवर जर पडलं तर शेकडो किंवा हजारो लोकांचा त्यात जीव जाऊ शकतो.  या संकटाच्या वेळी विंग कमांडर वरुण सिंग यांनी आपला जीव पणाला लावला पण विमान सुरक्षित ठिकाणी उतरले.

त्यांच्या या धैर्यासाठी त्यांना प्रतिष्ठित शौर्य चक्र पुरस्कार देण्यात आला होता. भोपाळच्या या सुपुत्राला शौर्य चक्र मिळाल्याने शहरवासीयांसहितच संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान होता आणि असणार आहे..

आज त्यांच्या बलिदानाला भारत कधीही विसरू शकत नाही !

 

WebTitle : Group Captain Varun Singh Update: Group Captain Varun  Singh passes away

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.