तुमच्या पब्जीचा पण पप्पा म्हणजे आमचा GTA व्हाईस सिटी..!

जगभरात पबजीने जो धुमाकूळ घातला होता त्याला काय तोड नाही पण भारतात त्याचा वापर इतका झाला कि शेवटी पबजी बॅन करण्यात आला. विनर विनर चिकन डिनर, जय पबजी म्हणणारे लेकरं गेमचाच गेम झाला म्हणून धाय मोकलून रडू लागले इतका भयानक प्रचार, प्रसार पबजीचा झाला होता.

पण असाच एक गेम आला होता मागच्या २० वर्षांपूर्वी ज्याने पिढी पोसली तो म्हणजे जिटे वाईस सिटी GTA VICE CITY  [ आपल्या भाषेत जीटेवायसीटी ]. या गेममुळे खऱ्या अर्थाने गेमिंग सेक्शनला सोन्याचे दिवस आले.

पण जीटेवायसीटी कसा तयार झाला, हा गेम अजूनही तितकीच क्रेझ टिकवून आहे जितकी लॉन्चिंगच्या वेळी होती, सगळ्यात मेन म्हणजे हा गेम कोणी तयार केला याचा सगळा आढावा आपण जाणून घेऊ. भारतात नव्हे तर जगभरात या गेमसोबत प्रत्येकाची ओळख असते म्हणजे असतेच.

जीटेवायसीटी ज्यावेळी मार्केटमध्ये आलेला नव्हता तेव्हा गेमिंग वैगरे हे प्रकार फार तुरळक प्रमाणात होते. ग्रँड थेफ्ट ऑटो अर्थात जीटे लाँच झाल्यावर गेमिंग सेक्शनमध्ये मोठी क्रांती घडली. कारण हा गेम लहान मुलांसाठी बनवला गेला पण बारके पोरं राहिलॆ बाजूला हा गेम मोठ्या लोकांमध्ये भलताच लोकप्रिय झाला. 

२००२ साली रॉकस्टार नॉर्थमध्ये तयार करण्यात आला आणि रॉकस्टार गेम्सतर्फे तो पब्लिश करण्यात आला. जीटीए हा मुळात ऍक्शन, ऍडव्हेंचर असलेला व्हिडिओ गेम आहे.

DMA DESIGN कंपनीने त्याला डेव्हलप केलं होतं. डेव्हिड जॉन्स, रसल के , स्टीव्ह हॅमंड आणि मिकी डेल यांनी मिळून हि कंपनी आणि गेम तयार केला पण याचा लीड डेव्हिड जॉन्स होता.

४ एप्रिल १९९५ रोजी GTA बनवायला सुरवात झाली. या गेमच अगोदर नाव हे रेस अँड चेस असं ठेवण्यात आलं होतं पण नंतर ग्रँड थेफ्ट ऑटो करण्यात आलं. ऑक्टोबर १९९७ मध्ये युरोप आणि नॉर्थ अमेरिकेत MSDOS आणि मायक्रोसॉफ्ट विंडो साठी हा गेम रिलीज करण्यात आला. पण कंपनीच्या अपेक्षेवर या गेमने पाणी फेरल आणि मार्केटमध्ये सपाटून हा गेम पडला.

पुढे हा गेम ग्रेमलिन इंटरॅक्टिव्ह कंपनीच्या ताब्यात गेला आणि १९९९ मध्ये ग्रँड थेफ्ट ऑटो २ या नव्या रूपात तो आला आणि एमएस विंडो, ड्रीमकास्ट आणि प्लेस्टेशनवर तो रिलीज झाला. पण परत तसच घडलं आणि पुन्हा गेम फेल झाला. पुढे हा गेम टेक टू इंटरॅक्टिव्हला विकला गेला. यावर पुन्हा डिटेलमध्ये काम करण्यात आलं आणि प्लेस्टेशन २ साठी रिलीज केलं गेलं. 

GTA ३ मोठ्या जोशात लॉन्च झाला आणि तुफ्फान हिट झाला. गेम डेव्हलप करणार्यांनी अगोदरच्या सगळ्या उणिवा भरून काढल्या होत्या. हि कंपनी पुढे रॉकस्टार नॉर्थ म्हणून उदयास आली. पुढे GTA चे बरेच व्हर्जन आले, VICE CITY, SAN ANDERS, LIBERITY CITY STORIES यांचा त्यात समावेश होता. २९ एप्रिल २००८ आणि सप्टेंबर २०१३ मध्ये अनुक्रमे ४ आणि ५ भाग आले. पण या सगळ्यांमध्ये GTA ५ जास्त लोकप्रिय झाला. या व्हिडिओ गेमला बेस्ट व्हिडिओ गेम म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

या गेममधे काल्पनिक पात्र आहेत, यात मर्डर, ड्रग्ज, क्राईम, थीफ आणि सेक्शुअल सिनसुद्धा पाहायला मिळतात. जो येईल त्याला तुडवायचं, पैशे गोळा करायचे, कोड टाकून गाड्या आणि पोरी फिरवायच्या अशे सगळे प्रकरण आहेत. मिशन पास केल्यावर हत्यारं मिळणं वैगरे असं सगळं या गेममधे आहे.

ज्यावेळी हा गेम बनवला गेला तेव्हा २६५ मिलियन डॉलर खर्च आला होता, पण जेव्हा gta लॉन्च झाला तेव्हा ८०० मिलियन डॉलर इतकी प्रचंड विक्री त्याची झाली. २२५ मिलियन कॉपीज GTA च्या विकल्या गेलेल्या आहेत.

आजवरचा सगळ्यात महागडा आणि लोकप्रिय गेम म्हणून जीटेवायसीटीला ओळखलं जातं. अजूनही हा गेम खेळणाऱ्या बऱ्याच लोकांना यातले कोड पाठ आहेत हेच या गेमचं यश म्हणावं लागेल.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.