गाय मेलीय बघायला या.

भिडू लोक्स, नद्यांना आपल्या भारत देशाच्या जीवनदायिनी म्हणल जात. आणि आपल्याकडच्या नद्या आणि त्यांच्या गोष्टी पण लई इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे वर्षभर वाळली खडखडीत असणारी येरळा हाय, तशीच वर्षात दोनदोनदा पूर येणारी ब्रम्हपुत्रा पण हाय. आपल्याकड ह्या नद्यांना देवी मानल जात, त्यांची पूजा केली जाते, आणि सगळ्यात पवित्र नदी म्हणून गंगेची कशी वाट लागल्या ते पण आपल्याला माहित्ये.

अशीच अजून एक नदी म्हणजे, सरस्वती.

पाचवी सहावीला असताना भूगोलाच्या पुस्तकात सरस्वती नदी राजस्थानात लुप्त झाली एवढच लिहिलेलं हुत. मग कोणतर म्हणल ती जमिनीच्या खालन वाहत्या, म्हणल भिडू अशी नदी खालन कशी काय वाहू शकत्या ? एक पठ्ठ्या तर त्याहून पुढ्च बोलला, त्यो म्हणला, गंगा-यमुना-सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगम अलाहाबादला, आय मीन प्रयागराजला हुतो, म्हणजे सरस्वती हाय पण दिसत नाय.

पण खरा डोक्याला शॉट तेव्हा लागला जेव्हा कळल कि भारत सरकारने कि लुप्त झालेली नदी परत आणण्यासाठी हरयाणामध्ये प्रकल्प हातात घेतलाय म्हणून. आमच एक भिडू तर डोक धरून खालीच बसल, म्हणल अस कुठ होत असतंय व्हय ?

मग आम्ही भिडू लोकांनी यावर जरा माहिती काढायची ठरवली. त्यासाठी नेटवर डोक्युमेंट्रीज बघितल्या, अजून आर्टिकल्स वाचले, अस वाटल हुत की माहिती काढल्यावर गुत्ता सुटल पण त्याऐवजी त्यो अजूनच वाढला. तुम्हाला सगळच आता जरा इस्कटून सांगतो.

सगळ्यात पहिला सरस्वती नदीचा उल्लेख येतो पुराणांत, ऋग्वेदामध्ये नदीसूक्ते आहेत त्यामध्ये. तर ऋग्वेदात सरस्वती नदीवर श्लोक लिहिलेले आहेत. त्यात सर्वोकृष्ट आई, सर्वोकृष्ट नदी आणि सर्वोत्कृष्ट देवी असा सरस्वतीचा उल्लेख येतो. सरस्वतीचा अर्थ बघायचा म्हणल तर “सरस + वती” म्हणजे मोठ्ठा प्रवाह सणारी असापण हुतो.

आता हि नदी लुप्त कशी झाली ह्याचा एक भारी किस्सा पण सांगितला जातो.

तेच झाल अस, व्यास आणि गणपती सरस्वती नदीच्या काठी महाभारत लिहायला बसले हुते, व्यास सांगत हुते आणि गणपती लिहून घेत हुता. पण गणपतीने व्यासांना अट अशी घातली हुती की जर ते सांगताना थांबले तर त्यो पुढ लिहिणार नाय, शेजारून सरस्वती नदी खळ खळ खळ आवाज करत वाहत हुती. तिच्या आवाजाने गणपतीला व्यवस्थित ऐकू जात नव्हत म्हणून व्यासांनी नदीला शाप दिला कि तू लुप्त हुशील आणि जमिनीखालन वाहू लागशील, आणि त्यादिवशीपासन सरस्वती जमिनीखालन वाहते.

आमचा एक भिडू म्हणला,

“ हि कसली सिस्टम म्हणायची राव, आवाज येईन तर बाजूला जाऊन बसायचं, का त्या नदीलाच शाप द्यायचा ?”

म्हणल गड्या, पोइंट हाय. ह्याहून पुढ म्हणजे अस एका ठिकाणी लिहील हुत की नदी अस्पृश्यांच्या आणि दलितांच्या प्रदेशाच्या आधी लुप्त हुते.

आता मुद्दा सरकारचा. भारत सरकारकडून सरस्वती नदी संशोधन मंडळ चालवलं जात, त्याची दिल्ली आणि चेन्नई इथे केंद्रे आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आधी सरस्वती खरच हुती पुढे ती वाळली. हडप्पा, मोहेंजोदडो आणि अशा अनेक नागरी संस्कृती सरस्वतीच्या काठावर उदयाला आल्या. आता त्यांनी एकदम scientifically सांगितलंय कि नदी कशी आधी हुती आणि ती पुढे लुप्त कशी झाली.

तर सरस्वती नदी हिमालयात उगम पावून पुढे गुजरातमध्ये जाऊन अरबी समुद्राला मिळते अस त्याचं म्हणणे हाय. पण झाल अस की tectonic shifts नावाचा एक प्रकार असतोय, म्हणजे भूगर्भीय हालचाली. (कळल नाय तर गुगल करा) त्यामुळे दिल्ली हरिद्वार हा पट्टा वर उचलला गेला आणि सरस्वती नदीच उगमाच पाणी तुटल. मग ह्या नदीला सतलज आणि यमुना अशा दोन उपनद्या हुत्या, त्यातली सतलज यु टर्न मारून सिंधूला जाऊन मिळाली आणि यमुना सरस्वती नदीच उरलसुरल पाणी घेऊन पुढे वाहू लागली. ह्याला रिव्हर पायरसी अस पण म्हणत्यात.

भिडू म्हणले,

आयला हे एकदम पटतंय की, म्हणजे खरच असणार बरका नदी !!

पण एका भिडूने एक आर्टिकल काढल, त्यात लिहील होत कि अशी नदी मुळात नव्हतीच कधी. मुळात “ सरस्वती” हे नाव नसून विशेषण आहे, आणि ऋग्वेदामध्ये ते सिंधू नदीसाठी विशेषण म्हणून वापरलं गेलंय. त्यात अजून पण लई कारणे हुती की जस F.C.Oldham नावाचा एक ब्रिटीश संशोधक होता, त्याने १८८५ मध्ये अस लिहून ठेवलंय कि सतलज आणि यमुना या दोन नद्यांच्या म्हणून एवढा मोठ्ठ प्रवाह असणारी नदी वाहने भौगोलिकदृष्ट्या शक्य नाही. आमच्या चक्कीत जाळ न कानात धूर झाला.

आता खरतर सरस्वती नदीला परत आणायचा प्रोजेक्ट १९९८ मधेच सुरु केला हुता पण तेव्हा काय त्यो नीट चालला नाय, पुढे UPA  सरकारने तर त्यो बासनात गुंडाळून ठेवला. पण शेठ सत्तेवर आल्यावर मात्र ह्या कामाला निश्चितच गती मिळाली. हरयाणा सरकारने यासाठी ५०० कोटी निधी घोषित केला, आणि काम जोरदार सुरु झाल.

आता तुम्ही म्हणशीला अशी नदी कुठ जिवंत होत असती का ? आम्हाला पण ह्यो पश्न पडला आम्ही म्हणल शेठ ने प्रेस कॉन्फरस घेतली कि विचारूया.

त्यातच हरयाणामध्ये मुगलवाली नावाच गाव हाय, तिथे खणताना पाणी लागल आणि एकच बोंबाबोंब झाली, सरस्वती नदीच पाणी घावल म्हणून. झाल, दुसऱ्या दिवशी मिडिया, तिथले नेते, हरयाणाचे मुख्यमंत्री सगळे हजर झाले. त्या गावाला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल अश्या घोषणा दिल्या गेल्या, हिंदू संस्कृतीच सगळ्यात प्राचीन आहे यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. गावातल्या लोकांना कळायचं बंद झालेलं. एका रात्रीत गावातल्या दहा दुकानांची नाव बदलून “सरस्वती” झाली. मुस्तफाबादच सरस्वतीनगर झाल. (उत्तरप्रदेश जास्त लांब नाय म्हणा हरयाणापासन.)

भिडू म्हणले, आईला हे मटेरीअल भारी हाय.

आणि आम्ही ह्या विषयावर नाटक करायचं ठरवल. ती नदी गावात आल्यावर नेमक हाय हुत म्हणून आणि टक्कुर खाजवत बसलो, आणि आम्हाला नाटक मिळत गेल. गाय मेलीय हे नाटकाच नाव.

56573486 2339750936070024 546540502585966592 n

आता तुम्ही म्हणणार आयला, अस का नाव ठेवलय ? त्यासाठी नाटक बघायला यायला लागतंय भिडू लोक्स.  ह्या नाटकाचा प्रयोग १२ एप्रिलला म्हणजे शुक्रवारी रात्री ९ वाजता भरत नाट्यमंदिर इथे होणाराय. तर तुम्हीपण या, सरस्वती नदीच्या दर्शनाला. खुद्द शेठ येणारेत बरका !! 

अधिक माहितीसाठी. 

Leave A Reply

Your email address will not be published.