बंगालचा पूल कोसळला तो ‘ॲक्ट ऑफ गॉड’ मग आता गुजरात दुर्घटनेला जबाबदार कोण ?
तारीख ३० ऑक्टोबर २०२२. वेळ सायंकाळच्या साडे सहा ते पावणे सातची. ठिकाण गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदीवरचा फेमस १४३ वर्षे जुना केबल ब्रिज. पुलावर सुमारे ५०० लोक होते…याच दरम्यान एक दुर्घटना घडली. पुलावर सुमारे ५०० लोक होते. पूल नदीत कोसळला. त्यातली काही पाण्यात बुडून मृत्यू पावली तर काही कायमची जायबंदी झाली…
काल रात्रभर बचावकार्य सुरूच होतं..जखमींची संख्या वरचेवर वाढतच आहे तर मृतदेहांचा अक्षरशः खच पडलाय..पण हि घटना का झाली ? कशी झाली ? आणि याला जबाबदार कोण ? हे प्रश्न साहजिकच पडतात पण महत्वाचा प्रश्न म्हणजे १४३ वर्षे जुन्या पुलाचं नूतनीकरण करण्याची गरजच काय होती?
या सर्व प्रश्नांची आणि या दुर्घटनेवरून सुरु असलेलं राजकारण जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ लिंकवर क्लिक करा :