गुजरातमध्ये ७१ दिवसात १ लाख २३ हजार डेथ सर्टिफिकेट दिली, पण कोरोनामुळे मृत्यू ४ हजार?

गुजरात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे होम स्टेट. देशातील एक डेव्हलप्ड राज्य म्हणून या गुजरातकडे बघितलं जातं. पण मागच्या काही दिवसात या राज्यावर कोरोना परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरत असल्याच्या टिका, मृत्यूचे आकडे लपवले असल्याचे आरोप हे सातत्यानं होतं असल्याचं दिसून आलं होतं आहेत, यामुळे अगदी न्यायालयानं देखील राज्य सरकारला अनेकदा सुनावलं आहे.

आता अशातच यात एक गौप्यस्फोट समोर येत आहे. या गौप्यस्फोटामुळे गुजरातमध्ये कोरोनाच्या मृत्यू झालेल्या आकडेवारीविषयी पुन्हा शंका व्यक्त होऊ लागली आहे. त्याच झालं असं कि आज भास्कर समूहाचे गुजराती भाषिक वृत्तपत्र दिव्य भास्कर या वृत्तपत्रानं गुजरातमध्ये मागच्या ७१ दिवसात मृत्यू झालेल्यांविषयी एक आकडेवारी जाहिर केली आहे.

यानुसार,

राज्यात १ मार्च ते १० मे या ७१ दिवसांच्या दरम्यान एकूण १ लाख २३ हजार मृत्यू प्रमाणपत्र अर्थात डेथ सर्टिफिकेट जारी केली आहेत. तर मागच्या वर्षी याच काळात ५८ हजार प्रमाणपत्र जारी केली होती. याचा अर्थ यावर्षी ६५ हजार ०८५ प्रमाणपत्र अधिकचे जारी केली आहेत. 

पुढे वृत्तपत्रानं असं देखील सांगितलं आहे कि,

एका बाजूला जास्तीचे प्रमाणपत्र तर देण्यात आले आहेतचं, पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला गुजरात सरकारनं सांगितलेल्या आकडेवारीनुसार १ मार्च ते १० मे या काळात केवळ ४ हजार २१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गुजराती अखबार दिव्य भास्कर ने यह खुलासा किया है.

सोबतच वृत्तपत्रानं या काळात राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून देण्यात आलेले प्रमाणपत्र आणि सरकारी आकडेवारी नुसार तिथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या या संबंधी डाटा देण्यात आला आहे.

त्यातील काही शहरांची नाव आणि तिथली आकडेवारी बघू.

दिव्य भास्कर या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, 

राजकोट शहरात मागच्या वर्षी १ मार्च ते १० मे या दरम्यान २ हजार ५८३ प्रमाणपत्र देण्यात आले होते. तर यावर्षी याच काळात मृत्यू प्रमाणपत्रांची संख्या वाढून १० हजार ८७८ झाली आहे. तर गुजरात सरकारच्या आकडेवारीनुसार १ मार्च २०२१ ते १० मे २०२१ या ७१ दिवसांच्या काळात राजकोट शहरात केवळ २८८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भावनगर शहरात मागच्यावर्षी याच काळात १ हजार ३७५ जणांचे मृत्यू प्रमाणपत्र दिले होते. यावर्षी हा आकडा वाढून तब्बल ४ हजार १५८ झाला आहे. तर सरकारी आकडेवारीनुसार या काळात केवळ १३४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Image

अहमदाबादमध्ये मागच्या वर्षी १ मार्च २०२१ ते १० मे २०२१ या दरम्यान ७ हजार ७८६ प्रमाणपत्र दिले होते. यावर्षी हा आकडा १३ हजार ५९३ च्या घरात गेला आहे. तर सरकारच्या म्हणण्यानुसार शहरात या काळात २ हजार १२६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

याच पद्धतीने राज्याच्या सुरत शहरात मागच्या वर्षी या काळात २ हजार ७६९ प्रमाणपत्र देण्यात आली होती. या वर्षी याच ७१ दिवसांच्या काळात हा आकडा वाढून ८ हजार ८५१ इतका झाला आहे. मात्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारी नुसार १ हजार ०७४ जण कोरोनामुळे दगावली आहेत.

वडोदरा शहरात यावर्षी ७ हजार ७२२ जणांची मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले होते. मागच्या वर्षी या काळात २ हजार ३७३ जणांचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते. तर सरकारनं सांगितलेल्या आकडेवारीनुसार या काळात फक्त १८९ जण कोरोनामुळे दगावली आहेत.

याच पद्धतीने नवसारी जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी १ मार्च २०२१ ते १० मे २०२१ या दरम्यान २ हजार ०२६ जणांचे मृत्यू प्रमाणपत्र प्रशासनाकडून देण्यात आले होते. तर यावर्षी याच काळात ३ हजार ४३४ जणांचं मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आलं आहे. तर सरकारच्या आकडेवारी नुसार या ७१ दिवसांच्या काळात संपूर्ण जिल्ह्यात केवळ ९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

याआधी देखील अनेक माध्यमांनी यासंबंधीच्या बातम्या दिल्या आहेत 

या आधी देखील अनेक माध्यमांनी गुजरातमधील मृत्यूचा आकडा लपवल्याबद्दल याबद्दल भाष्य केलं आहे.

न्यू-यॉर्क टाईम्सने आपल्या रिपोर्टमध्ये गुजरातमधील वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या हवाल्यानुसार सांगितलं होतं कि,

“राज्यात कोरोनामुळे मरणाऱ्यांचा आकडा सरकारी आकड्यांच्या ४ ते ५ पट अधिक आहे.”

सोबतच टाइम्स ऑफ इंडियाने एप्रिल महिन्यातील दिलेल्या एका वृत्तानुसार,

वडोदरा महानगरपालिकेनं आपल्या रोजच्या अहवालात शहरामध्ये रोज जास्तीत जास्त २ ते ३ मृत्यू होतं असल्याचं सांगितलं होतं. तर सुरतमध्ये २० पेक्षा कमी, आणि राजकोटमध्ये १५ पेक्षा कमी मृत्यू होतं असल्याचं प्रशासनानं सांगितलं होतं.

पण त्याच वेळी टाइम्स ऑफ इंडियाने केलेल्या पडताळणीनंतर गुजरातमधील सर्वात मोठे एसएसजी हॉस्पिटल वडोदरा इथं एकाच ठिकाणी ७ दिवसांमध्ये तब्बल १४२ मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. तर वडोदऱ्याच्या २ हॉस्पिटल्समध्ये एका आठवड्यात ३०० मृत्यु झाले असल्याचं सांगितलं होतं.

राजकोटमध्ये ८ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान १८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दावा टाईम्स ऑफ इंडियाने केला होता. तर प्रशासनानं इथं या काळात ३२ मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.

विद्युतदाहिन्या देखील वितळलेल्याचं समोर आलं होतं

मागच्या महिन्यात सुरतमधील अश्विनीकुमार आणि रामनाथ घेला या दोन स्मशानभूमींमधील जवळपास १६ विद्युतदाहिन्यांमध्ये दररोज १०० पेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. हा मृतदेहांचा ओघ जास्त असल्यामुळे स्मशानभूमीतील या विद्युतदाहिन्यांवर इतका ताण आला होता की त्यांच्या उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुरांडी अक्षरशः वितळली असल्याचं वृत्त अनेक माध्यमांनी दाखवल होतं.

या सगळ्या परिस्थिती आणि आकड्यांकडे बघितल्यानंतर आपल्या सहज लक्षात येईल कि गुजरातमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यु लपवले जातं आहेत. जर दिव्य भास्करच्या आकडेवारीनुसार बघितलं तर सरकारच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष मृत्यू झालेल्यांचा आकडा हा १० ते १५ टक्के जास्त आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.