कॅप्टन अमरिंदर सिंगनंतर आता गुलाम नबी आझाद नवीन पक्ष काढण्याच्या तयारीला लागलेत…
जास्त मागची गोष्ट नाहीए भिडू . थोडं डोक्याला ताण दे लगेच आठवेल. राज्यसभेत एका नेत्याला निरोप देण्याचा कार्यक्रम चालू होता. मोदींनी डोळ्यात पाणी आणत म्हटलं होतं ‘मी तुम्हाला रिटायर होऊ नाही देणार. माझ्या घरचे दरवाजे नेहमीच तुमच्यासाठी खुले राहतील’. आठवला का भिडू. मोदींनी हा सेंटी डायलॉग एका विरोधी पक्षातील नेत्यासाठी मारला होता त्या नेत्याचं नाव होतं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद.
आता ७२ वर्षाचे गुलाम नबी आझाद काँग्रेसनं आता राज्यसभेची नवीन टर्म नाकारली म्हटल्यावर मस्त रिटायर होऊन निवांत हिमालयात (त्यांचं घर तिकडंच आहे भिडू ) जाऊन बसतील असं लोकांना वाटत होतं. पण राजकारणी रिटायर होणं दुर्मिळच.
‘अभी तो मैं जवान हूँ ‘ असं म्हणतं गुलाम नबी आझादांनी काश्मीरमध्ये सभांचा चांगलाच धडाका लावलाय.
१६ नोव्हेंबर ते १० डिसेंबरच्या दरम्यान त्यांनी १० सभा घेतल्यात. या सभा चांगली गर्दी खेचतायत म्हणून चर्चेत आहेत.
मात्र अजून एक कारण आहे ज्यामुळं या सभांची बरीच चर्चा होतीय. गुलाम नबी आझाद कोणत्याही सभेत गांधी घऱ्याण्याचं नाव घेत नाहीत.
आपल्या सभांमध्ये ते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना सरळ इग्नोर मारतायत.
याबद्दल जेव्हा त्यांनी पत्रकारांना विचारलं तर याचा जास्त काय अर्थ लावू नका. काँग्रेस तो ‘मेरी दिल मे रहता है’ या अर्थाचं नेहमीचं टिपिकल उत्तर दिलंय. तसंच पक्ष सोडून जाण्याचा किंवा नवीन पक्ष काढण्याचा सध्यातरी कोणताच विचार नाहीए असंही ते म्हणालेत.
मात्र त्यांनतर त्यांनी जे म्हटलंय त्याला आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये खूप महत्व आलाय असं राजकीय जाणकार सांगतात.
‘ये तो कोई नहीं बता सकता कि राजनीति में आगे क्या होगा’ अशी पुष्टी त्यांनी पुढं जोडलीय.
आता तुम्ही म्हणणार भिडू तू पण बाकीच्यांसारखं एका वाक्यावरून स्टोऱ्या बणवायला लागलास का?पण मित्रा विषय खरंच डीप आहे पुढं वाच.
गुलाम नबी त्यांच्या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जाहीर टीका करत नाहीयेत .
आझाद त्याऐवजी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर प्रश्न करत आहेत. त्यात पुन्हा ते थेट सिन्हा यांना पण काही बोलत नाहीत. म्हणजे भाजपच्या बाबतीत अगदी गोल गोल भूमिका घेत आहेत असं राजकीय विश्लेषक सांगतात.
पुन्हा आता त्यांच्या आर्टिकल ३७० वरील भूमिका बघा.
मी संसदेत कसा आर्टिकल ३७० हटवण्याचा संसदेत विरोध केला होतो असं ते छाती फुगवून सांगतात. मात्र त्याचबरोबर आर्टिकल पुन्हा ३७० आणले पाहिजे का? यावर ते चिडीचूप
जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा द्या. राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकर घ्या अशा मागण्या त्यांनी आपल्या सभांमधून केल्या आहेत. या मागण्यांचा भाजपाला ही काहीच इशू नाहीए.
असंच एका सभेत त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ३०० जागा मिळणार नाहीत असंही विधान केल होतं.
मागच्याच महिन्यात गुलाम नबी आझाद यांच्या जवळच्या काँग्रेसच्या २० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते.
काँग्रेसचे जम्मू काश्मीर अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्या विरोधात आपण राजीनामा देतोय असं त्यांनी म्हटलंय. मात्र त्याचबरोबर गुलाम नबी आझाद हे मोठे नेते आहेत आणि त्यांचा काँग्रेसनं सन्मान केला पाहिजे असंही ते म्हणालेत.
महाराष्ट्रामध्ये लोकसभाची सीट जिंकल्यानंतर १९८२ नंतर काँग्रेसनं गुलाम नबी आझादांना प्रत्येक सरकारमध्ये स्थान दिलंय. तसेच १९९० पासून २०२१ पर्यंत ते राज्यसभेवर होते. अमरिंदर सिंगांसारखं ते पार्टी पण सोडून गेले नव्हते. पण आता सीन वेगळा आहे . ते ना सत्तेत आहेत ना राज्यसभेवर. त्यामुळं असही गुलाम नबी आझादांकडे गमवण्यासारखा काही नाहीए. त्यामुळे ते मोदींनी उघड्या ठेवलेल्या दरवाजाचा उपयोग ते अमरिंदर सिंगांसारखं पुन्हा राजकारणात एन्ट्री मारायला करतील अशी दिल्लीत जोरात चर्चा आहे.
English Summary: After winning the Lok Sabha seat in Maharashtra, after 1982, Congress gave Ghulam Nabi Azad a place in every government. He was also in the Rajya Sabha from 1990 to 2021. He did not leave the party like Amarinder Singh. But now the scene is different. They are neither in power nor in the Rajya Sabha. Therefore, Ghulam Nabi Azad has nothing to lose. Therefore, there is a lot of talk in Delhi that he will use the door left open by Modi to re-enter politics like Amarinder Singh
Web Title: Gulam Nabi Azad is all set to form a new party like Captain Amarinder Singh