काळे कपडे घालायला लागतील म्हणून गुलजार ऑस्कर अवार्ड घेण्यासाठी गेले नाहीत.

साल २००८. शोमन सुभाष घई एक सिनेमा बनवत होते. नाव होतं युवराज. 

हिरो होता सलमान खान आणि हिरोईन होती कॅटरीना कैफ. सोबत घईंचा लाडका अनिल कपूर होता, मिथुनदा होते. तोंडी लावायला बोमन इराणी आणि झायेद खान.सुभाष घईनी आपला आजवरचा अनुभव वापरून एकदम परफेक्ट फॅमिली ड्रामा मसाला सिनेमा बनवला होता.

सुभाष घई फिल्म इंडस्ट्रीमध्ये कान सेन म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पिक्चरमध्ये चांगली स्टोरी एखादे वेळेस नसेल पण चांगली गाणी नाहीत अस कधी होतं नाही. कर्ज, हिरो, कर्मा, सौदागर, राम लखन, खलनायक, परदेस, ताल ही सगळी गाणी सुपरहिट होती.

युवराज सुद्धा एक म्युजीकल सिनेमा होता. त्याची चर्चा खूप आधीपासून सुरु होती.

संगीतकार रहमान आणि गीतकार होते गुलझार तालची जादू रिपीट करणार याची खात्री सगळ्यांना होती. सिनेमाचं संगीत खूप ग्रांड बनवण्या साठी रहमान ने प्रचंड मोठा सिंफनी ऑर्केस्ट्रा वापरला होता. सुभाष घई रेकोर्डिंगला हजर राहून स्वतःचे इनपुट्स देखील देत होते.

एके दिवशी एका गाण्याचं रेकोर्डिंग झालं. पण का कुणास ठाऊक सुभाष घईना ते गाणं आवडल नाही. त्यांच्या मते ते गाण खूपच सौम्य आहे आणि ते ज्याच्यावर चित्रित होणार आहे त्या झायेद खानच्या करेक्टरला शोभणार नाही. रहमानला ते गाण खूप आवडल होतं. त्यान आणि गुलजार साहेबांनी घईना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

अखेर युवराज मध्ये ते गाण दिसल नाही. रहमानच्या मनात मात्र याच गोष्टीची चूटपुट लागून राहिली होती.

युवराज रिलीज झाला. सलमान, कटरीना असूनही हा सिनेमा प्रचंड मोठा सुपरफ्लॉप झाला. गाणी चालली मात्र त्यात तालची जादू नव्हती.

अशाच एका संध्याकाळी रहमानला एक इ-मेल आला. त्यात लिहील होतं,

“हाय  मी डॅनी बॉयल. मी एक सिनेमा बनवतोय आणि त्याच संगीत तू द्यावसं असं मला वाटतंय.”

रहमानचा आधीतर त्या इमेलवर विश्वास बसत नव्हता पण नंतर बोलण झाल तशा गोष्टी उलगडत गेल्या. बॉयल हा इंग्लंडमधला सर्वात मोठा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. तो मुंबईमध्ये एक सिनेमा बनवत होता. सिनेमा जवळपास बनला होता फक्त संगीत बाकी होतं. पिक्चरच नाव सुद्धा फायनल होतं,

“स्लम डॉग मिलीनियर ” 

रहमानची व त्याची भेट झाली. रहमानला सिनेमाचे रशेस दाखवले. स्टोरी ऐकवली. त्याला ती खूप आवडली. तो त्याकाळात दुसऱ्या एका सिनेमावर काम करत होता. ते त्यान सोडल आणि डॅनीच्या सिनेमाची गाणी बनवायला सुरवात केली. सगळ्यात पहिला फोन केला सुभाष घईनां. युवराज सिनेमातून जे गाण वगळल होतं तेच गाण या इंग्लिश सिनेमासाठी वापरायची त्याला इच्छा होती.

सुभाष घईना काहीच प्रोब्लेम नव्हता. त्यांनी होकार कळवला. खूष झालेल्या रहमानन गुलजारना संपर्क केला. सिच्युएशन नुसार काही ओळी बदलून घेतल्या. सुखविंदर सिंगच्या पहाडी आवाजात गाण रेकोर्ड झालं.

ते गाण होतं,”जय हो !!”

स्लमडॉग मिलीनियर रिलीज झाला. सुपरहिट झाला. त्याने अनेक रेकोर्ड ब्रेक केले. अनेक पुरस्कारावर आपल नाव कोरलं. एक झोपडपट्टीमधील मुलगा एका रात्रीत स्पर्धा जिंकून करोडपती बनतो ही कथा प्रेक्षकांनाच नाही तर समीक्षकांना देखील आवडली होती. ऑस्करसाठी देखील नॉमिनेशन मिळाल होतं.

२२ फेब्रुवारी २००९ ला ऑस्कर अवार्ड सेरेमनी झाला. स्लमडॉग मिलीनियरला तब्बल ८ ऑस्कर मिळाले.

यात बेस्ट सिनेमा, बेस्ट डिरेक्टर, स्क्रिनप्ले अनेक पुरस्कारांची लयलुट होती. भारताच्या रसूल पोकट्टीला साऊंड मिक्सिंगचा पुरस्कार मिळाला. रहमानला बेस्ट संगीताच आणि जय होला बेस्ट गाण्याचा अवार्ड मिळाला.

जय होचा अवार्ड रहमान आणि गुलजार या दोघांच्यात वाटून देण्यात आलेला होता. भारतीय फिल्मइंडस्ट्रीच्या इतिहासातील ही सर्वात महत्वाची घटना होती, मात्र पुरस्कार स्वीकारायला फक्त रहमान एकटाच आला. अख्खी टीम लॉस एंजिलीसच्या कार्यक्रमाला हजर झाली. पण गुलजार तिथे नव्हते.

गुलजार यांच्या गेल्या चाळीस वर्षात जे कार्य केल त्याचा सर्वोच्च सन्मान होता.   पण त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

पुढे एकदा एका मुलाखत घेणाऱ्याने गुलजार यांना हा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी गंमतीत सांगितल,

” ऑस्कर अवार्डच्या कार्यक्रमात काळा कोट घालणे कम्पल्सरी आहे आणिमाझ्या कडे फक्त पांढरेच कपडे आहेत. म्हणून मी ऑस्कर घेण्यासाठी गेलो नाही.”

गुलजार साहेबांचा टेनिस खेळताना एक छोटा अॅक्सिडेंट झाला होता. त्यामुळे त्यांना अमेरिकेला जाणे अवघड होती. ते तरीही गेले असते मात्र आपल्या तत्वांना मुरड घालून पांढऱ्या ऐवजी काळा रंग वापरणे शक्य नव्हते. त्यामुळे घरच्याच आग्रह असूनही ते ऑस्कर घेण्यासाठी गेले नाहीत.

पांढऱ्या रंगाबद्दल ते म्हणाले,

” मैं सफेद रंग कॉलेज के दिनों से पहन रहा हूं. मुझे रंग पसंद हैं, लेकिन अब मैं रंग-बिरंगे कपड़े पहनूंगा, तो ऐसा लगेगा, जैसे मैं झूठा हूं. अपने बारे में ऐसा महसूस करवाना मेरे लिए जीवन की सबसे बुरी चीज होगी. मैं वैसा ही दिखाना चाहता हूं, जैसा मैं हूं. मैं ऐसा ही हूं- सफेद.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.