भारतीय वायुसेनेतील “कारगिल गर्ल”….
भारतीय वायुसेनेत गुंजन सक्सेना नावाच्या अधिकारी आहेत. त्यांचा उल्लेख कारगिल गर्ल असा केला जातो. भारतीय सैनिकांच्या अनेक शुरकथा आपण कारगिल दिनाच्या निमित्ताने वाचत असतोच. पण कारगिलच्या युद्धभूमीत सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलेल्या महिला अधिकाऱ्याची हि गोष्ट. त्यांच्या कामगिरीमुळेच त्यांना शौर्यपदक देवून गौरवण्यात आलं आहे.
गुंजन भारत-पाकिस्तान दरम्यानच्या कारगिल युद्धात भाग घेतला होता. युद्धात जखमी झालेल्या भारतीय सैन्याच्या मदतीसाठी त्या चिता हॅलीकॉप्टर घेऊन पोहोचल्या होत्या. जवळपास आठवडाभर त्या युद्धभूमीवर सक्रीय होत्या. या आठवडाभराच्या कालावधीत द्रास आणि बटालिक सेक्टरमधील सैन्याला अन्नधान्याचा पुरवठा करणे, जखमी झालेल्या सैनिकांवर प्रथमोपचार करणे यांसारख्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या.
गुंजन युद्धभूमीवर सक्रीय असताना शत्रू सैन्याकडून त्यांच्या हॅलीकॉप्टरवर अनेकवेळा हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र अशाही परिस्थितीत गुंजन यांनी आपली भूमिका चोखपणे निभावली होती. अतिशय खडतर परिस्थितीत आपल्या कौशल्याच्या आधारे त्यांनी भारतीय सैन्याला मोठी मदत केली होती.
पाकिस्तानी सैन्याच्या हालचालीवर देखील त्यांची निगराणी होती. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांच्याकडे आपल्या सुरक्षेसाठी कुठलंही शस्त्र नव्हतं.
7. Gunjan Saxena and Srividya RajanSource: ndtv.com Flight officer Gunjan Saxena and Flight Lieutenant Srividya…
Fauji Life and Their Love Confessions ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮೇ 5, 2018
१९९४ साली २५ ट्रेनी मुलींची तुकडी भारतीय वायूसेनेत भरती करण्यात आली होती. त्यात गुंजन यांचा समावेश होता. त्यानंतर श्रीविद्या राजन यांच्यासह त्या पहिल्या भारतीय महिला एअरफोर्स पायलट बनल्या होत्या. गुंजन यांचे मोठे बंधू आणि वडील देखील भारतीय सैन्यात होते.
हे ही वाच भिडू.
- रवींद्रनाथ टागोरांचं ‘पहिलं प्रेम’असणारी ती मराठी मुलगी कोण होती ?
- ती आहे भारताची पहिली महिला ट्रक मॅकेनिक !
- देशभक्ती म्हणजे खायचं काम नाही !!!
- तिच्यावर बंदूक रोखून उभ्या असलेल्या 12 सैनिकांच्या दिशेने तिने ‘फ्लायिंग किस’ फेकले.