सगळ्यात महागडी फिल्म सुपरफ्लॉप ठरणं हा धक्का गुरुदत्तला कायमचं खिळखिळा करून गेला.

सिनेमाच्या नादात घर दार विकलं, बायको मुलं सोडून गेली, सगळ्यात महाग फिल्म सुपरफ्लॉप ठरली, माझी माणसं दुसऱ्यांसाठी कामं करायला लागली, आता मी पूर्णपणे अनाथ झालोय

हे शेवटच्या काळातले शब्द होते भारताच्या एकेकाळच्या सगळ्यात मोठ्या दिग्दर्शक अभिनेत्याचे. ते होते गुरुदत्त. भारतात ज्या ज्या वेळी कल्ट सिनेमाची गोष्ट समोर येईल तेव्हा गुरुदत्त हे नाव सगळ्यात वरच्या रांगेत राहील.

आजसुद्धा इतकी वर्ष लोटली गुरुदत्तच्या सिनेमांची भावनिक क्रेझ अजूनही तशीच आहे. हा पहिला माणूस होता सिनेमा संपल्यानंतर लोकं कामाची पावती म्हणून थेटरात टाळ्या वाजवायचे. सगळं आलबेल चाललं होतं सिनेमे चांगले चालत होते, वैवाहिक जीवनात सगळं ओके होतं, प्रसिद्धीच्या शिखरावर गुरुदत्त पोहचला होता आणि एका व्यक्तीच्या एन्ट्रीने गुरुदत्त भरकटत गेला.

वसंत कुमार पदुकोण हे गुरुदत्तचं मूळ नाव. ९ जुलै १९२५ रोजी कर्नाटकमध्ये झाला. करियर बनवण्यासाठी बंगालला गेलेला वसंत कुमार तिथल्या संस्कृतीच्या प्रेमात पडून गुरुदत्त म्हणून उदयास आला. टेलीफोन ऑपरेटर म्हणून काम पाहत असताना गुरुदत्तला साहित्याची गोडी लागली. कला क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करायला हवं असं त्याला कायम वाटत असायचं.

१९४५ मध्ये गुरुदत्त पुण्यात आले. प्रभात फिल्म कंपनीमध्ये अनेक गोष्टींशी गुरुदत्तची ओळख झाली. नृत्य आणि दिग्दर्शक म्हणून ३ वर्ष गुरुदत्तने काम पाहिलं. १९४७ साली प्रभात कंपनी बंद झाली आणि गुरुदत्त मुंबईत आले. देव आनंद सोबत त्यांची जोडी जमली आणि बाजी या सिनेमातून सिनेक्षेत्रात गुरुदत्तचं पदार्पण झालं.

गुरुदत्त अशी फिल्म बनवू पाहत होते ज्यातून भरपूर पैसे मिळतील आणि सिनेमा हिट होईल. जॉनी वॉकर, व्ही.के.मूर्ती या लोकांना सोबत गुरुदत्तने चांगली बॉण्डिंग केली. हॉलिवूडच्या फिल्म टेक्निकची ओळख बॉलीवूडला गुरुदत्तमुळेच झाली. व्ही.के. मूर्ती सांगतात कि गुरुदत्त फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये इतका गुंतलेला असायचा कि त्याला कशाचं भान राहत नसायचं.

सैलाब, सीआयडी, mr. and mrs. ५५, आरपार आणि प्यासा या पाच सिनेमांनी गुरुदत्तच्या आयुष्यात प्रसिद्धीची लाट आणली. इथून पुढे गुरुदत्त हा टॉपचा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखला जाऊ लागला.

आता इथं गुरुदत्तच्या आयुष्यात वहिदाची एंट्री झाली. गीता दत्तसोबत वैवाहिक जीवन फारसं काही चांगलं सुरु नव्हतं. पण वहिदा रेहमान गुरुदत्तच्या आयुष्यात येणं हे गुरुदत्तच्या फिल्मी कारकिर्दीसाठी मारक ठरलं. गुरुदत्तला वहिदा आवडू लागली होती पण वहिदाने एकतर्फी प्रेम समजून दुर्लक्ष केलं. पण गुरुदत्त वहिदाच्या आकंठ प्रेमात बुडाला होता.

याच काळात गुरुदत्तने कागज के फुल नावाचा सिनेमा केला ज्यात वहिदा रेहमान होती. या सिनेमामुळे गुरुदत्तला इतका मोठा धक्का बसला होता कि सिनेमॅटिक करिअर डबघाईला आलं होतं.

१९५९ च्या काळात १६ करोड रुपयात हा सिनेमा बनला होता, त्या काळातले  १६ करोड म्हणजे आजच्या काळातली खूप मोठी रक्कम झाली. हा सिनेमा गुरुदत्तच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट काळ ठरला.

हा सिनेमा आता जरी कल्ट सिनेमा म्हणून ओळखला जात असला तरी तो तेव्हा सुपरफ्लॉप ठरला होता. यामुळे दोन वेळा गुरुदत्तने आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले होते. चौदवी का चांद आणि साहिब बीबी और गुलाम या सिनेमांनी थोडंफार स्थैर्य गुरुदत्तला मिळालं पण कागज के फुल मुळे ते खचत गेले.

आर्थिक नुकसान इतकं झालं होतं कि घरदार विकावं लागलं, जुनी टीम गेली, दारूचं व्यसन लागलं यामुळे गुरुदत्त हळूहळू बॉलिवूडमधून वजा होत गेला. निद्रानाशाचा त्रास सुरु झाला होता, झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय त्याला झोप येत नसायची.

गुरुदत्तच्या निधनावर सुद्धा अनेक संशय व्यक्त केले गेले. त्याने दारूच्या नशेत भरमसाट गोळ्या खाऊन आत्महत्या केली. पण दुसऱ्या दिवशी गुरुदत्तच्या डायरीत राज कपूर यांच्याशी भेट घेण्याचं लिहिलेलं होतं. त्यामुळे गुरुदत्तने आत्महत्या केली असं बोललं जाऊ शकत नव्हतं. अनेक कयास आणि अफवा उठत राहिल्या. 

इतकं ट्रॅजेडी आयुष्य लाभलेला गुरुदत्त अजूनही कल्ट सिनेमांसाठी ओळखला जातो. सगळ्यात महागडी फिल्म सुपरफ्लॉप ठरणं हा मोठा धक्का गुरुदत्तला कायमचं खिळखिळा करून गेला.

 

नादान तमन्ना रेती में

उम्मीद कि कश्ती खेती हे…

इक हाथ से देती है दुनिया,

सौ हाथों से लेती है…

ये खेल है कब से जारी,

बिछडे सभी बारी बारी….

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.