एक मिनिट द्या, सॅनिटॉयझरचा शोध लावणाऱ्या या नर्सला धन्यवाद म्हणा.

हॅण्ड सॅनिटायझर ही गोष्ट सध्या लोकांना कोरोनापासून लढण्यासाठी महत्वाची ठरत आहे. संचारबंदीच्या काळात देखील गावभर उंडारण्याची काही जणांची खोड जात नाहीय. पण घरातले अशा व्यक्तिंना हॅण्ड सॅनिटायझरने शुद्ध करुन परत घरात घेण्याच पुण्य कर्म करत आहेत.

लेखाच्या पुर्वी फक्त अशा लोकांना एकच सांगण आहे की, इतक्या वर्षात तुम्ही रोज बाहेर पडून काय उपडली आहे का? स्वत:चा नाही पण दूसऱ्यांच्या जिवाची तरी काळजी करा आणि गप्प घरात पडून रहा.

असो तर हा विषय आहे सॅनिटायझरचा.

सॅनिटायझरचा शोध लावण्यामागे एक लॅटिन अमेरिकेतील तरुणी होती. तिच नाव लुप हर्नाडेंज. या लुप हर्नांडेजची माहिती लोकांना समजली तेव्हा तिच्या नावाने ट्विटरवर ट्रेन्ड होवू लागला. लोक तिला धन्यवाद देवू लागले.

१३ मार्च २०१२ रोजी द गार्डियन मध्ये एक लेख छापण्यात आल्याचा सांगण्यात येत. याच लेखाद्वारे लूप हार्नांडेजने सॅनिटायझरचा शोध लावल्याची माहिती देण्यात आली.

१९६६ साली बेकर्सफील्ड इथे राहणारी विद्यार्थींनी लूप हर्नांडेजने सॅनिटायझरचा शोध लावला.

त्यापुर्वी आजारी व्यक्तींच्या संपर्कात येताना डॉक्टर साबण आणि पाण्याचा उपयोग करत होते. मात्र प्रत्येक ठिकाणी साबण आणि पाणी मिळेलच अशी गोष्ट नव्हती, त्यामुळे डॉक्टरांना टेन्शन असायचं.

यावर विचार करत असतानाच तिने जेल च्या स्वरुपात अल्कोहल उपलब्ध करायचा विचार केला आणि त्यातूनच हॅण्ड सॅनिटाझरची निर्मीती करण्यात आली.

याहून अधिक अशी माहिती नाही. द गार्डियनमध्ये देखील तिच्याबद्दल जी माहिती मिळते त्यामध्ये माहिताचा स्त्रोत देण्यात आलेला नाही. यापुर्वी देखील लूप हार्नांडेज बद्दल काहीही छापून आलेलं नाही. तरिही अनेकांच्या मते हॅण्ड सॅनिटायझरचा शोध तिनेच लावला होता.

२०१९ च्या द गार्डियनमध्येच देखील लूप हर्नांडेजचा आजवरच्या ऐतिहासिक काम करणाऱ्या नर्समध्ये उल्लेख केला गेला आहे. अस सांगतात की त्या गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ आरोग्य सेवेच आपल कर्तव्य संभाळत आहेत.

ही बातमी ट्रेन्ड तर करतच आहे, आत्ता त्यांनी शोध लावला का इतरांनी याहून अधिक महत्वाच वाटतं ते म्हणजे आज सॅनिटायझरमध्ये किमान स्वत:ची काळजी तरी घेता येते.

हे ही वाच भिडू.