भगतसिंगांनी खरंच “रंग दे बसंती” गायलं होतं का ?

 

१९२७ सालचा वसंत ऋतू.

लखनौ स्टेंट्रल जेलची हवा मात्र यावेळी वेगळीच होती. पळसाच्या पानांचा गडद केसरी रंग आकाशात उधळत होता आणि या झाड्याच्या खालीच गप्पा मारत होते ते काकोरी कटात सहभागी घेतलेले क्रांन्तीकारकं…

वसंताचं रितेपण या सर्वांच्या चेहऱ्यावर असावं. त्यातील एक क्रांन्तीकारक पंडित रामप्रसाद बिस्मिल यांना म्हणाला,
पंडितजी,

“आप बसंत पर कोई गीत क्यूं नहीं लिखते…?”

पंडितजींनी वसंताकडे एक कटाक्ष टाकलां आणि जन्म झाला तो, मेरा रंग दे बसंती चोला या गाण्याचा.

त्याकाळी क्रांन्तीकारकांमध्ये हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. भारतमातेच्या ध्येयानं पछाडलेला एकन् एक क्रांन्तीकारक मेरा रंग दे बसंती म्हणतं देशासाठी प्राण अर्पण करायला आहूती देवू लागला.

क्रांन्तीच्या त्या काळ्या रात्रीचं गाणं म्हणजे “मेरा रंग दे बसंती”.

पण नेमकं भगतसिंग यांनी हे गाणं गायलं होतं का याबाबत अनेक इतिहासकारांमध्ये मतप्रवाह आहेत पैकी काहीचं म्हणणं अस आहे की, भगतसिंग यांनी फासावर जाण्यापुर्वी हे गाणं गायलं होतं. काहीच्या मते त्यांनी इन्कलाब जिंदाबाद चे नारे दिले होते तर काहीच्या मते त्यांनी हे इन्कलाब जिंदाबाद देखील म्हणलं होतं आणि मेरा रंग दे बसंती देखील गायलं होतं.

‘मेकिंग ऑफ रिव्हॅल्यूशनरी’ या के.सी. यादव यांच्या पुस्तकातील भगतसिंगाचे सहकारी क्रांती कुमार यांच्या मतानुसार फाशीच्या वेळी हे गीत गाण्यात आलं नव्हतं. फाशीवर जाण्यापुर्वी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्याच दोन ओळी गुणगुणत होते त्या ओळी होत्या,

वतन की आबरू का पास देंखे कौन केहता हैं |
सुना हैं आज मक्तल मैं हमारे इम्तिहा होगा ||

१९६५ मध्ये आलेला हिंदी चित्रपट शहिद मध्ये हे गीत सर्वप्रथम वापरले गेले होते. चित्रपटाच्या शुटिंगपुर्वी अभिनेते आपल्या संपुर्ण टिमला घेवून भगतसिंगच्या आईंना भेटायला त्यांच्या गावी गेले होते. तेव्हा झालेल्या भेटीवर प्रेरित होवून गीतकार- संगीतकार प्रेम धवन यांनी हे गाणं पहिल्यांदा फिल्ममध्ये वापरलं.

त्यानंतर २००२ साली प्रदर्शित झालेल्या बॉबी देओलच्या २३ मार्च १९३१ शहिद व अजय देवगणच्या द लिजेंड ऑफ भगतसिंग या फिल्ममध्ये देखील हे गाणं वापरण्यात आलं होतं.

आत्ता हे गाणं भगतसिंगांनी अतिम क्षणी गायलं की नाही याबाबत अनेक मतप्रवाह असले तरी भगतसिंग यांच्याबरोबरीनेच त्या काळातील सर्वच क्रांन्तीकारकांसाठी हे गाणं म्हणजे भारतभुमीसाठी जगण्याची एक उमेद होती हे नक्की !!!

हे ही वाच भिडू