घरच्या घरी केसांना कलप करताय, थांबा… हे पहा काय होतं.

काळजी करु नका, तुही रे टाईपमध्ये अज्जीबात तुम्हाला सरजामदार साहेबांनी कलप करावे की नाही वगैरे सांगणार नाही. हि स्टोरी खरी आहे आणि तितकीच खतरनाक देखील. कस आहे आपल्यातल्या कित्येकांना डोक्याचे केस काळे करुन घेण्याची सवय असते. एखादा केस पांढरा झाला तरी डोक्याला कलर लावून ते पटकन काळे करण्याकडे कल असतो. 

आत्ता हे चांगलच आहे पण सारखे बाहेर हजार पाचशे कशाला मोजा म्हणून छोटे पाऊच आणुन घरच्या घरी हा कार्यक्रम उरकण्याकडे प्रत्येकाचा भर असतो. 

१९ वर्षाच्या अस्टेला नावाच्या पोरीने तिचे फॉटो इन्स्टाग्रामवर टाकले होते. त्यामध्ये तीने सांगितलं होतं की मी घरच्या घरी केसांना डाय लावण्याचा प्रयत्न केला. त्याची रिएक्शन झाली आणि डोक्याच भज झालं. (शब्दश: भज झालय राव.) 

तर झालं अस की अस्टेलाने घरच्या घरी हेअर डाय लावली. ते लावल्यानंतर काही वेळात रिएक्शन सुरू झाली आणि तिचं डोकं सुजू लागलं. डायरेक्ट खोपडीला सुज आली. ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिचा सरळ श्वास देखील घेता येत नव्हता. बर हे सगळं नेमकं कस झालं हे तिलापण कळालं नाही. तेव्हा डॉक्टरांनी तिने केलेल्या डायचं पाकिट ताब्यात घेतलं. तिच्या रिपोर्टमध्ये देखील त्याच एका “घटकाचे” नाव घेण्यात आलं होतं. 

PPD अर्थात paraphenylenediamine मुळे तिचा हि रिएक्शॅन झाली. आत्ता यामुळे आपल्याला रिएॅक्शन होवू शकते. सलूनमध्ये साधारणं या सर्व गोष्टींचा विचार करुन डाय घेतले जातात पण घरी डाय लावणाऱ्यांना त्यामधा फरक लक्षात येत नाही. 

हे तिलापण माहित नव्हतं पण डॉक्टरांनी या निमित्ताने सगळ्या जनभरातल्या लोकांना मोफत सल्ला दिला. 

त्यांनी अस सांगितलं की कधीही डाई करणार असाल तर त्यापुर्वी छोटस सॅम्पल घेवून ते कानाच्या मागे लावावं आणि ४८ तास वाट पहावी. कोणता त्रास जाणवला नाही तर डाय लावण्यास सुरक्षित आहे समजून खुश्शाल डोक्याला चोळावा. 

तर आत्ता तुम्हाला काय करायला लागणार हे वेगळ सांगायची गरज नाही. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.