एका घटनेतल्या प्रामाणिकपणामुळे हाजी मस्तान मुंबईच्या गुन्हेगारीचा ‘सुलतान’ बनला तो कायमचाच….
मुंबई अंडरवर्ल्ड हे असं जग होतं ज्यामुळे कैक लोकांची लाईफ सेट झाली आणि काही लोकांची लाईफ कायमचीच नष्ट झाली. मुंबईवर अनेक जणांनी आपली दहशत बसवली आणि काळाच्या ओघात ते नाहीसेही झाले. पण या मुंबईवर राज्य गाजवू पाहणाऱ्या दादांमध्ये एक धागा सेम होता कि गरिबी आणि त्यातून सुटका व्हावी म्हणून निवडलेला चुकीचा रस्ता.
आजचा किस्सा हा मुंबई गुन्हेगारी विश्वाशी जरी संबंधित असला तरी त्यातील एका घटनेमुळे एक साधा हमाल मुंबईचा राजा बनला. तो हमाल होता हाजी मस्तान. हाजी मस्तानच्या आयुष्यात घडलेल्या त्या घटनेमुळे तो एका रात्रीत मुंबईचा किंग झाला होता. आधी किस्सा बघू नक्की काय घडलं होतं.
सुरवातीला १९४४ साली हाजी मस्तान हमाल म्हणून एका बंदरावर काम करायला सुरवात केली. दुबई, हॉंगकॉंग अशा मोठ्याशहरातून येणाऱ्या मालाची वाहतूक करणे हे त्याच काम असायचं. १९४७ साली माझगाव डॉकमध्ये मस्तानने ३ वर्ष पूर्ण केली होती. हे काम करताना त्याच्या लक्षात आलं ते खूप महत्वाचं आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारं होतं.
उतरवून घेतलेला माल कस्टम्समधून गेलाच नाही तर त्यावर ड्युटी लावायचा प्रश्नच उरणार नाही, तर आपण हा माल थेट आयात करणाऱ्यालाच थेट पोहचवला तर या व्यवहारात आपल्याला बरच नफा मिळू शकतो. मस्तानने एक आयडिया लावली कि जर ट्रान्सिस्टर्स आणि मनगटी घड्याळे आयात केली आणि त्याची इम्पोर्ट ड्युटी चुकवली तर आपल्याला बरेच पैसे मिळेल. त्यावेळी मस्तानला १५ रुपये रोज होता.
आता त्याने हि योजना बनवली आणि एका अरबी व्यक्तीला तो भेटला. त्याच नाव होत शेख मोहंमद अल घालीब. घालिबला सुद्धा हेच हवं होत त्याने मस्तानशी हातमिळवणी केली. मस्तानसारखा उत्साही तरुण तो शोधतच होता. त्याकाळात जास्त तस्करी चालत नसे अगदीच किरकोळ प्रमाणावर घड्याळे, सोन्याची बिस्किटे, ट्रान्सिस्टर्स इतकंच.
घालीबने मस्तानला समजावून सांगितलं कि डोक्यावरच्या पटक्यातून सोन्याची बिस्कीट, घड्याळे असं काही सहज लपवून आणता येऊ शकत. मस्तान बंदरावर काम करत असल्याने त्याला ते सहज जमणार होत, मस्तानने त्याला मोबदला विचारला तेव्हा घालीबने त्याला मोठं बक्षीस देईल म्हणून वचन दिलं. अशा कामात पुढे मस्तान पटाईत झाला त्याच उत्पन्न १५ रुपयांवरून ५० रुपयांवर गेलं.
तिथे हमालांना त्रास देणाऱ्या शेरखान पठाणाला मस्तानने कायमच पळवून लावलं त्यामुळे बंदरावर लोकांमध्ये त्याची इज्जत वाढली. घालिबच्या व्यवहारात मस्तान १०% भागीदार बनला होता. १९५० नंतर मुंबई प्रांतामध्ये मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी दारूबंदी आणली आणि इतर चोरट्या मार्गाने येणाऱ्या मालावर राज्यात भरपूर वाढ होण्याची संधी निर्माण झाली.
या काळात घालीब आणि मस्तानने त्यांच्या अवैध व्यवसाय जोरात पुढे आणला. बराच नफा मस्तानने मिळवला. आता कुठे त्याची भरभराट सुरु झाली होती कि पोलिसांनी ड्युटी ऑफिसर पोलिसांनी घालिबला अटक केली. घालिबला अटक होत असताना मस्तानने तस्करीतून आलेला माल स्वीकारला होता. घालिबच्या वतीने एक सोन्याच्या बिस्किटांची पेटी त्याने घेतली होती.
आता घालिबला अटक झाल्याने मस्तानच्या डोक्यात विचार आला कि हे बिस्कीट विकून आपल्याला बराच फायदा होईल, पण दुसऱ्या वेळी त्याला वाटायचं कि हा पैसा आपण घालीबलाच देऊया. शेवटी द्विधा मनस्थितीत असल्याने त्याने ती पेटी तशीच ठेवून दिली.
पुढे तीन वर्षांनी घालीब सुटला. तीन वर्षे केस लढवण्यात त्याचे सगळेच पैसे संपले होते. कुटुंबातही फारसं स्वारस्य त्याला उरलेलं नव्हतं. काय करावं त्याला कळत नव्हतं. शेवटी तो घरातल्या वस्तू विकू लागला. शेवटी एकदम भिकारी अवस्थेत कसाबसा घालीब मस्तानला भेटला. मस्तानने त्याला ओळखले आणि एका झोपडीत नेले.
एका खराब कपड्यांच्या खालून त्याने ती पेटी बाहेर काढली, तिचं झाकणही उघडलेलं नव्हतं. घालीबने ती पेटी उघडली आणि तो त्या सोन्यांच्या बिस्किटांकडे पाहून भयंकर खुश झाला. त्याने मस्तानला विचारलं कि हि पेटी विकून तू सगळ्यात मोठा डॉन बनला असता मग तस का नाही केलं ? मस्तान शांतपणे म्हणाला, माझे वडील मला नेहमी शिकवत आले कि,
तू कोणापासूनही निसटून जाऊ शकशील ; पण ज्याने तुला निर्माण केले त्या देवापासून तू कधीच निसटून जाऊ शकत नाही.
माझा अजूनही विश्वास आहे कि मी कधी ना कधीतरी बंबईका बादशहा वाटेल एवढा श्रीमंत होईन.
हे ऐकून घालिबच्या डोळ्यात पाणी आलं. या घटनेनंतर घालीबने त्या पेटीमध्ये ५०% पार्टनर म्हणून मस्तानला निवडले. तिथून पुढे १५ रुपये रोजगार असणारा मस्तान एका रात्रीत पाच लाख रुपयांचा मालक झाला. आणि पुढे तो बंबईचा बादशहा झाला हे काही वेगळं सांगायला नकोच.
हे हि वाच भिडू :
- जयप्रकाश नारायण यांच्यामुळे हाजी मस्तानसहीत ८० गुंडांनी स्मगलिंग सोडून दिली
- हाजी मस्तान ते दाऊदच्या गर्दीत “बेबी पाटणकर” मात्र टिच्चून उभा होती.
- हाजी मस्तानला नडलेला माणूस म्हणजे सुनिल दत्त..
- मुंबई अंडरवर्ल्ड मधील सगळेच डॉन तिला घाबरायचे, दाऊद तिला मावशी मानायचा..