हलाल की झटका..? मटणातला हा बेसिक फरक काय असतो…?

दिल्लीत रोज तसे अनेक विषय चर्चेत आणि वादात असतात. पण सध्या चर्चा चालू आहे ती मटणावरुन. वाद ते चालू आहे ते खाण्यावरून चालू आहेत. म्हणजे खायचं की खायचं नाही यावरून नाही तर कोणत्या प्रकारच मटण खायचं यावरून.

यात दिल्ली महानगरपालिका, झोमॅटो आणि कृषी व खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडा देखील ओढलं गेलेलं आहे. यापूर्वी निर्यात करत असणार मांस हे हलालच असावं अशी अट होती. आत्ता केंद्र सरकारच्या अपेडाने ही अट रद्दबातल केलेली आहे.

मग यात आता तुम्ही म्हणणार भिडू काहीही काय. मटण हे मटण असतंय. तू त्यात पण आणखी काय प्रकार पाडत आहेस. तर मित्रांनो, मटणाचा प्रकार म्हणजे कोणत्या प्राण्याचं खायचं तसला प्रकार नाही तर कोणत्या प्रकारे कापलेलं मटण खायचं या वरून मुख्य वाद चालू आहे.

होय, बेसिकली मटण कापायचे दोन प्रकार असतात, यात

 हलाल मटण आणि झटका मटण

याच वादामुळे दिल्लीत झोमॅटो पण या वादात ओढला गेलाय. त्यांनी म्हणे हलाल वाल्या हॉटेलचाच ऑप्शन देतात आणि तिथून ऑर्डर पिकअप करतात. जे की हिंदू आणि शीख समाजाला चालत नाही. हे दोघे झटका मटण प्रेफर करतात.

त्यामुळे मागच्या आठवड्यात दिल्ली महानगरपालिकेनं हॉटेल आणि रेस्टोरंट वाल्यांना आपल्या दारावर इथे कोणत्या प्रकारे कापलेलं मटण वापरलं जात हे सांगणं बंधनकारक केलं आहे.

तर हॉटेलवाले म्हणत आहेत ‘खाण्याला धर्म नसतो’ पण एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे मटण कापण्यासाठी धर्म असतो. 

खरतर या दोन्ही प्रकारामध्ये धारदार चाकू आणि प्राण्याचा गळा या दोन गोष्टी कॉमन असत. दोन्ही मध्ये तो गळा कापलाच जाते. शेवटला प्राणी पण मरतो. पण फक्त कापण्यात थोडासा फरक आहे. आणि हाच थोडासाफरक आता मोठा वाद झाला आहे.

आता हा एवढा वाद सांगितल्यावर त्यातील तो थोडासा फरक सांगणं हे पण आमचं काम आहे.

हलाल मटण :

हलाल मटण कापताना प्राण्याच्या गळ्यावर धारदार चाकू फिरवून कापलं जात. श्वसन नलिकेला कापल्यानांतर अगदी काही क्षणातच प्राण्याचा जीव जातो. फक्त जिवंत जीव जात असल्यामुळे काहीसा तडफडतो.

हलाल पद्धतीने प्राणी कापण्यासाठी जमीयत उल उलेमा ए हिंन्द यांच्या देखरेखीखाली प्रमाणपत्र दिले जाते. सरकारी विभाग असा प्रकारचे कोणतेही प्रमाणपत्र देत नाही हे विशेष.

झटका मटण :

झटका मटण हा शब्द विजेच्या झटक्यातून आला आहे. विजेच्या झटक्याप्रमाणे एका झटक्यात प्राणी मारला जातो.  कारण त्या प्राण्याची जास्त तडफड व्हायला नको. एका झटक्यात मान धडावेगळी करण्याची ही पद्धत. 

धार्मिक फरक काय आहे.

मुस्लिम समाजामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हलाल केलेलंच मटण खातात. त्यांच्या समाज मान्यतेनुसार हलाल करण्याआधी कलमा वाचून ३ वेळा सूरी फिरवली जावी. तसेच हलाल करण्याआधी प्राणी बेशुद्ध व्हायला नको. 

ज्यावेळी हलाल करायचं चालेल असत त्यावेळी दुसऱ्या प्राण्याला पण तिथे घेऊन जायला मुस्लिम समाजामध्ये मनाई आहे. एक कापून झाल्यानंतरच दुसरा तिथं न्यायचा.

तर हिंदू आणि शीख समाजामध्ये झटका मटण खाल्लं जात. त्याच कारण सापडत आपल्याला टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिसर्च मध्ये. या रिसर्चनुसार २० व्या शतकामध्ये शीख समुदायाने याची सुरुवात केली. कारण मारण्यापूर्वी प्राण्याला कमी त्रास व्हावा. हीच पद्धत पुढे हिंदू धर्माने स्वीकारली.

याचमुळे हलाल वाले म्हणतात की धारदार चाकूने प्राण्याची श्वसन नलिका कापली की काही सेकंदात तो मरुन जातो. यात एक होत की मरण्यापुर्वी ते दुखण्याने तडफडत नाहीत. झटक्यामध्ये प्राणी मरण्यापुर्वीच तो अर्ध मेला झालेला असतो. त्यांना उपाशी ठेवलेलं असतं. तर हलाल करण्यापुर्वी प्राण्याला खावू पिऊ देखील दिलं जातं.

तर झटका मटणाला मानणारी सांगाता, या पद्धतीत प्राण्याला श्वास घेण्याचा देखील घ्यायला मिळत नाही. त्यांना माहित देखील होत नाही की आपल्या गळ्यावरुन सुरा कधी फिरला.

एकूणच दोन्ही काढील धार्मिक परंपरेनुसार दुकानदारांनी पण आपला ग्राहकवर्ग तयार केला आहे आणि तशी वेगवेगळी दुकान चालू केली आहेत.

वैज्ञानिक दृष्ट्या कसं ओळखायचं हलाल आहे कि झटका?

म्हैसुरच्या सेंट्रल फूड टेक्नॉलजी रिसर्च इंस्टीट्यूटचे हेड डॉक्टर वी. के. मोदी यांच्या म्हणण्यानुसार हलालने कापलेलं बोकडं आणि विजेच्या झटक्याने कापलेलं बोकडं या दोघांच्या मांसमध्ये जमिन आसमानाचा फरक होता.

हलालमध्ये प्राण्याच्या शरीरातील सगळं रक्त निघून जात. तर झटकामध्ये प्राण्याच्या शरीरात रक्त गोठलेल असतं त्यामुळे ते सगळं निघतं नाही. ज्यामुळे ते जर मटण आपण दोन ते तीन दिवसं साठवून वापरत असू तर चौथ्या दिवशी ते खराब होवू लागतं.

मागच्या वर्षी हैदराबादमधील ‘नॅशनल रिसर्च सेंटर ऑन मीट’ वैज्ञानिकांनी ‘डिफरेंस जेल इलेक्ट्रोफॉरेसिस’ नावाची एक पद्धत विकसीत केली. ज्या पद्धतीद्वारे हलाल आणि झटका मटणाची ओळख होवू शकेल.
पण मित्रांनो शेवटी कितीही काही असलं, यावरुन होणारा वाद जरी धार्मिक बाजून रुढी, परंपरा यानुसार असला तरी त्यात शेवटी प्राणी मरतोच. त्याचा जीव जातोच हे सत्य आहे. फरक फक्त तडफडून मारतो की शांततेत मारतो एवढ्यातच आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.