बरोबरीचे पोरं शाळेत अभ्यास करत होते तेव्हा हंसिका मोटवानी सिनेमाची लीड हिरोईन होती

बॉलिवूडमध्ये आपण जे बालकलाकार बघत असतो अचानक ते जेव्हा एखाद्या भलत्याच रूपात टीव्हीवर दिसू लागतात तेव्हा दंगा तर होतोच ना शेठ. काही काही अभिनेत्र्या या आपण कायम तरुण आणि वयाने लहान कस दिसू याविषयी विचार करताना दिसतात पण आज ज्या अभिनेत्रीचा किस्सा आपण बघणार आहोत त्या अभिनेत्रीने कमी वयातच मोठं दिसून राडा केला होता, काय आहे किस्सा डिटेलमध्ये पाहू.

तर तुम्ही कोई मिल गया हा सिनेमा पाहिलाच असेल त्यात रितिकभाऊ सोबत त्याच्या गॅंगमधली एक बारकी पोरगी असती बघा तर ती होती हंसिका मोटवानी. बालकलाकार म्हणून हंसिका मोटवानी बॉलिवूडमध्ये आली खरी पण तिचं कमी वयात एखाद्या अभिनेत्रीसारखं दिसणं हे कॉंट्रोव्हर्सीचा भाग झालं होतं. तस तर हे प्रकरण बरंच गाजलं होतं इतकं कि हंसिका मोटवानी परत बॉलिवूडमध्ये दिसली नाही. पण तिने साऊथ सिनेमांमध्ये आपलं साम्राज्य तयार केलं.

२००३ मध्ये कोई मिल गया सिनेमात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून प्रेझेंट झाली पण २००७ येईपर्यंत ती सिनेमाची लीड अभिनेत्री म्हणून पडद्यावर झळकू लागली होती. मुंबईच्या एका सिंधी परिवारात हंसिकाचा जन्म झाला, आई डॉक्टर आणि वडील व्यावसायिक होते. हंसिका मोटवानीच्या करियरमध्ये जी कॉंट्रोव्हर्सी झाली त्यात तिच्या आईचा मोठा वाटा आहे असं मानलं जातं.

हंसिकाच्या आईचं एक क्लीनिक होतं ज्यात सेलेब्रिटी लोक वजनवाढ किंवा वजन कमी करणे, सुंदरता वैग्रे अशा गोष्टींच्या चेकअपसाठी यायचे.

एकदा जुही चावला क्लीनिकवर आली असताना हंसिकाला बघून जुही चावला तिच्या आईला म्हणाली कि हिला तुम्ही टीव्हीसाठी प्रयत्न का करू देत नाही, दिसायला सुद्धा छान आहे तर एकदा छोट्या पडद्यासाठी प्रयत्न करा.

पुढे अरुणा इराणी दिग्दर्शित देस में निकला होगा चांद या सीरियलमध्ये बाल कलाकार म्हणून हंसिका मोटवानीची निवड झाली. यानंतर हंसिका मोटवानी बऱ्याच सीरियलमध्ये दिसली सोनपरी, शाका लाका बूम बूम, सांस भी कभी बहू थी अशा अनेक छोट्यामोठ्या भूमिका यत्ने साकारल्या होत्या. यानंतर तिने जागो, हवा आबरा का डाबरा, हमी है ना, कोई मिल गया अशा सिनेमात बालकलाकार म्हणून हंसिका दिसली.

ज्या वयात तिच्या वयाचे पोरं शाळेत अभ्यास करत होते त्याच वेळी हंसिका मोटवानी सेलेब्रिटी बनली होती. स्वतःच्याच शाळेत ती प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा गेली होती.

पण मधल्या ३-४ वर्षानंतर हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसण्याऐवजी ती अचानक फिल्मची लीड म्हणून समोर आली पण यावेळी मोठी कॉंट्रोव्हर्सी झाली. लोकांचा संशय वाढला कि हंसिकाच्या आईनेच तिला हार्मोनल इंजेक्शन दिले असावे वैगरे.

हंसिका मोटवाणीवर असा सुद्धा आरोप होता कि तिने अभिनेत्री दिसावं म्हणून अनेक सर्जरीसुद्धा केल्या होत्या आणि इंजेक्शनसुद्धा घेतली होती. लीड हिरोईन म्हणून हंसिकाचा पहिला सिनेमा देसामुद्रू हा अल्लू अर्जुनसोबत होता. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगला चालला. या सिनेमामुळे साऊथमध्ये हंसिका मोटवाणीला अनेक सिनेमे आणि अवॉर्ड ऑफर झाले.

पुढे हिमेश रेशमिया सोबत ती आपका सुरूर मध्ये सुद्धा दिसली. बॉलिवूडमध्ये हंसिका मोटवाणीला स्वीकारलचं गेलं नाही. तिच्या शरीरावर, अभिनयावर टीका टिप्पण्या सुरु झाल्या कारण लोकांच्या मनात कोई मिल गया मधली हंसिका मोटवानी बाळ कलाकार असल्याचं चित्र तयार झालं होतं. सर्जरी आणि हार्मोनल इंजेक्शनच्या बातम्या वेगाने व्हायरल होत होत्या. हिमेश सोबत तिने सिनेमा केला तेव्हा ती १५-१६ वर्षाची असल्याचं सांगण्यात येतं.

बॉलीवूडने नाकारल्यावर हंसिका मोटवानीने बॉलिवूडचा नाद सोडला आणि ती कन्नड, तामिळ, तेलगू सिनेमांमध्ये काम करू लागली. रोमिओ ज्युलिएट, अंबाला, सिंगम, बोगन,व्हिलन, कंट्री, पार्टनर अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. २०१४ साली फोर्ब्सच्या यादीत हंसिका मोटवानी २५० व्या नंबरवर होती. 

बालकलाकार म्हणून दिसणारी हंसिका मोटवानी अभिनयापेक्षा तिच्या कॉंट्रोव्हर्सीमुळेच जास्त गाजली.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.