गोष्ट हनुमानाच्या आधार कार्डची..

राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील गोष्ट. या जिल्ह्यातल्या दातारामगढ गावच्या पोस्टमन सुंदरलालकडे आधार कार्ड वाटण्याचं काम देण्यात आलं होतं. सुंदरलाल एक पत्ता गेल्या तीन दिवसांपासून शोधत होता पण त्याला आधारकार्डवरचा पत्ताच मिळत नव्हता. शेवटी सुंदरलाल ने फोटोवरुन तरी माणूस शोधून काढू, म्हणून आधार कार्ड फोडलं तेव्हा त्याच्या समोर होतं ते साक्षात हनुमानाचं आधार कार्ड.

या आधारकार्डचा नंबर 209470519541 असा होता. त्यावर व्यक्तीचं नाव लिहलं होतं हनुमानजी. आणि वडिलांच्या नावासमोर पवन. इतकचं नाही तर हनुमानाचा फोन नंबर देखील या आधार कार्डवर देण्यात आला होता. आत्ता देवाचं आधारकार्ड आलं आहे म्हणल्यानंतर गोष्ट संपुर्ण राज्यात झाली. राज्यातून देशात झाली आणि जेव्हा आपण चुकून हनुमानाचंच आधार कार्ड छापलय हे Unique Identification Authority of India (UIDAI) चे डायरेक्टर असणाऱ्या विजय मदन यांना कळलं तेव्हा त्यांनी देखील क्षणभर डोळे मिटले.

source- twitter

विजय मदन यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितल, “भारतासारख्या विशाल खंडप्राय देशात गमज्या करणाऱ्या लोकांची संख्या देखील तितकीच विशाल आहे. लोकांना समजायला हवं गमज्या कुठ करायची आणि कुठं नाही ते. असो, आम्ही हनुमानाच्या आधारकार्डला “अपवादात्मक चुकभूल” म्हणून स्वीकारत आहोत. या गमज्यामुळे आमचा एक्युरेसी रेट १०० टक्यांवरुन ९९.९ टक्यांवर आला आहे अस सांगण्यास देखील ते विसरले नाहीत.

आत्ता भगवान हनुमानाच्या आधार कार्डचं काय केल तर हे आधारकार्ड बंगलोरला असणाऱ्या मुख्य ऑफिसला पाठवण्यात आलं. तिथून ते रद्द करण्याचं पाप देखील करण्यात आलं. फक्त यातून एकच सिद्ध झालं ते म्हणजे, भारतात गमज्या करणारे लोकं कुणाचीही गमज्या करण्यास मागेपुढे पाहतं नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.