कुलभूषण जाधव, याकूब मेनन ते एकनाथ शिंदे.. हरीश साळवेंनी कोणत्या केसेस लढवल्यात

शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाचे बंड आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठविली आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात नोटीसला आव्हान दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाची बाजू देशातील जेष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडणार आहेत. तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे कायदेशीर बाजू मांडतील.

देशातील सगळ्यात महागडे वकील म्हणून ओळख असणाऱ्या हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची केस १ रुपयात लढवली होती. साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्यासोबतच याकूब मेनन, भोपाळ वायुगळती प्रकरण, नीरा राडिया प्रकरणात बाजू मांडली आहे. 

पहिला खटला अभिनेता दिलीप कुमार यांचा

हरीश साळवे यांचे वडिल राजकारणी आणि सीए होते. तर मुलगा वकिल. या दोघांची आयुष्यात पहिल्यांदा न्यायालयात गाठभेट पडली ती दिलीप कुमार यांच्या खटल्यामध्ये. दोघांनी मिळून दिलीप कुमारांना या खटल्यातुन सोडवून आणले.

हरीश यांच्या मते त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात १९७५ साली अभिनेता दिलीप कुमार यांच्या खटल्यासह झाली.

दिलीप कुमार यांच्यावर काळा पैसा बाळगल्याचा आरोप झाला होता. आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली होती. यात कर आणि दंड दोन्ही भरावा असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले होते.

एनकेपी हे दिलीप कुमार यांचे मित्र आणि सीए असे दोघे ही होते. इन्कम टॅक्स ट्रिब्युनल, उच्च न्यायालय या ठिकाणी या खटल्याचा निकाल दिलीप कुमार यांच्या बाजुनेच लागला होता. पण आयकर विभागाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.

यानंतर सर्वोच्च न्यायालयात हे वकिलपत्र हरिश यांना देण्यात आले. तो त्यांच्या आयुष्यातील पहिलाच खटला होता. यापुर्वी एकदा ही त्यांनी न्यायालयात वकिल म्हणून एकही खटला लढवला नव्हता.

या खटल्यात त्यांच्या वडिलांना मदत करत होते. सर्वोच्च न्यायालयात हरीश यांनी सगळी कागदपत्र व्यवस्थित फाईल केली. आणि ती पाहिल्यासोबतच अवघ्या ४५ सेकंदामध्ये आयकर विभागाचे अपील न्यायालयाने फेटाळून लावले. आणि दिलीप कुमार यातुन निर्दोष सुटले.

कुलभूषण जाधव 

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ पाकिस्तानच्या सैन्याने बलुचिस्तानमधून अटक केली होती. पाकिस्तानच्या दाव्यानुसार त्यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपात अटक करण्यात केली आहे. तेव्हा पासून ते पाकिस्तानच्या जेल मध्ये आहेत. 

पण भारताकडून हा दावा सतत फेटाळण्यात येतो. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या म्हणण्यानुसार, कुलभूषण जाधव निवृत्ती घेउन आपल्या व्यवसायाच्या  निमिताने इराणला गेले होते. तिथेचं पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचे अपहरण करण्यात आलं.

यांनतर २०१७ पासून कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. पाकच्या लष्करी न्यायालयानं त्यांना हेरगिरीच्या आणि दहशतवादाच्या आरोपाखाली मृत्यूदंड सुनावला. ज्यांनंतर भारतानं आंतराष्ट्रीय न्यायालयाची दार ठोठावली होती. 

जाधव यांच्याविरोधातल्या खटल्याला सुद्धा आव्हान दिलं होत. याप्रकरणी जेष्ठ वकील हरिश साळवे यांनी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस (ICJ) मध्ये कुलभूषण जाधव यांची बाजू मांडली.

फक्त एक रुपये फी घेऊन साळवेंनी ही केस लढविली. नेदरलॅण्ड्सच्या हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात १५-१ मतांच्या फरकाने भारताच्या बाजूने निकाल लागला. यानंतर कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत द्यावी, असे निर्देश देखील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेनन 

१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत एकामागे एक १२ ठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून आणले होते. त्यात २५७ नागरिक मारले गेले होते. १९९३ मध्ये १८९ लोकांविरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आला होता. 

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात याकूब मेमन युसूफ मेननलाटाडा कोर्टानं २००७ दोषी ठरवलं होतं. फाशीची शिक्षा सुनावली होती. याविरोधात याकूब आणि युसूफ  मेमन यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होता. त्यावेळी हरीश साळवे यांनी त्याची बाजू मांडली होती. 

  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.