मिस युनिव्हर्स हरनाझ कौरला जो आजार झालाय त्यावर उपचार पण नाहीये

२०२१. मिस युनिव्हर्सचं स्टेज. एका शब्दाने सगळी धाकधुकीवाली शांतात भंग केली आणि एकच कल्ला झाला. शब्द होता ‘इंडिया’. तब्बल २१ वर्षांनंतर भारताने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. आणि हा विजय भारताला मिळाला तो फक्त आणि फक्त एका व्यक्तीमुळे हरनाझ कौर संधू. केवळ २१ वयाच्या हरनाझनं मिस युनिव्हर्सच्या स्टेजवर दाखवून दिलं की किताब पटकावण्यासाठी फक्त सौंदर्याचीच नाही तर बुद्धी आणि कैशल्याची देखील खूप गरज असते. 

इतका मोठा मान देशाला मिळवून दिल्यानंतरही अनेकांनी तिला फक्त दिसण्यावरून अवॉर्ड मिळाला असं म्हणत ट्रोल केलं होतं. तरीही तिने सगळ्यांना चुकीचं प्रूफ केलंच होतं. मात्र आता परत एकदा हरनाझ ट्रोल होताना दिसतेय…. 

याचं कारण आहे तिचं वाढलेलं वजन. 

हरनाझने याबद्दल सांगितलंय की तिचं वजन वाढण्याचं कारण आहे तिला झालेला आजार.

हो, हरनाझ संधूला सध्या एका आजाराने ग्रासलं आहे म्हणून तिचं वजन वाढतंय. शिवाय या आजारावर सध्या उपाय उपलब्ध नाहीये. तेव्हा मिस युनिव्हर्ससोबत काय घडलं? हा आजार कोणता आहे? का होतो?  त्याची लक्षणं काय? शिवाय त्याने काय धोका निर्माण होऊ शकतो? सविस्तर जाणून घेऊया… 

अलीकडेच झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये हरनाझने सहभाग घेतला होता. ती रॅम्पवॉक करण्यासाठी आली तेव्हा तिच्या लुकपेक्षा जास्त तिच्या वजनावर सगळ्यांचं लक्ष गेलं. मग काय तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आणि तिला नेटकाऱ्यांनी ट्रोल करण्याचा एकही चान्स सोडला नाही. तेव्हा या ट्रोल्सला चोख प्रत्युत्तर हरनाझने चंदीगडमधील एका पत्रकार परिषदेत दिलं.

“मी माझ्या शरीराचा आदर करते आणि मला सिलिॲक आजार आहे, ज्यामुळे मला ग्लूटेनची ऍलर्जी आहे.” असं हरनाझने सांगितलं.

काय असतो हा सिलिक आजार? 

सिलिॲक आजार ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये तुम्हाला सामान्यतः गहू, बार्ली, राई, ब्रेड, पास्ता, कुकीज, केक अशा पदार्थांत आढळणाऱ्या प्रोटिन्सची ऍलर्जी असते. यात मुख्य घटक असतो ग्लूटेन. ग्लूटेन शरीरात इम्यून रिस्पॉंस उत्तेजित करते ज्याच्या परिणामी लहान आतड्याला जळजळ आणि नुकसान होते. शिवाय तुम्ही पोषक द्रव्ये शोषून घेऊ शकत नाही. यासाठीचा मुख्य घटक अनुवांशिक आहे. आणि या आजाराने तुमचं वजन वाढतं.

सिलिॲक हा आजकाल अतिशय सामान्य आजार झालाय. जगभरात १०० पैकी एका व्यक्तीवर याचा परिणाम होत असल्याचा अंदाज आहे. एकदा ग्लूटेन असलेले पदार्थ किंवा औषधे खाण्यास सुरुवात केली की कोणत्याही वयात सिलिॲक आजार विकसित होऊ शकतो. 

मग हा आजार एखाद्या व्यक्तीला झालाय हे कसं ओळखायचं? त्याची लक्षणं  काय आहेत? 

जुलाब लागणं, गोळा येणं, थकवा जाणवणं, अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं, स्किन रिएक्शन, अशक्तपणा, कब्ज, डिप्रेशन और ऐंगजाइटी वातं, स्नायूंमध्ये कमजोरी भासणे, भूक न लागणं अशी या आजाराची लक्षणं आहेत. त्यावर उपचार केले नाही तर सेलिॲक आजार जास्तीच्या गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. 

जसं की, पचन समस्या, पोषणाची कमतरता, थायरॉयड, डायबिटीज, आतड्यांमध्ये जळजळ होणं, संधिवात यासोबतच असे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात ज्याची कधी आपण नावं देखील ऐकलेली नसतील. म्हणून अशी काही लक्षणं जर जाणवत असली तर वेळीच डॉक्टरला कन्सल्ट करणं गरजेचं आहे. 

याच्यावर उपचार काय? 

तर सध्या तरी या आजारावर कोणताच उपाय उपलब्ध नाहीये. फक्त ग्लूटेन फ्री डाईट फोलो करणं हाच एकमेव उपचार आहे.

भारताची शान हरनाज संधूला या आजाराने ग्रासलं आहे. त्यात लोक तिची खिल्ली उडवतायेत हे बघून अजूनच वाईट वाटतं. पण अशावेळी हरनाज संधू मिस युनिव्हर्स का बनली? हे तिने अगदी अचूक दाखवून दिलंय. ट्रोल्सला न भीता तिने तिचा आजार उघडकीस आणला आहे आणि तिच्या वाढत्या वजनाच्या शरीराला स्वीकारलं आहे.

 यामुळे बॉडी शेमिंग करणाऱ्या कित्येकांना तिने जोरात थोबाडीत तर दिलीच आहे मात्र कित्येक ओव्हरवेट असल्याने नाराज असणाऱ्या लोकांसाठी ती आदर्श बनली आहे. असं असलं तरी एक गोष्ट ही देखील आहे की, आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला देखील अशी लक्षणं दिसत असतील तर लागलीच डॉक्टरकडे नक्की जा, लाजू नका. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.