५,००० कोटींचा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताचं कुटूंब आज काय करत..? 

हर्षद मेहता हे नाव सध्या ट्रेडिंगवर आहे. SCAM1992 या सिरीजला हर्षदचं नाव पून्हा चर्चेत आणण्याचं श्रेय द्यायला हवं, नेमकं काय झालं कशा पद्धतीने हर्षद मेहताने घोटाळा केला. नेमका घोटाळा केला की फक्त तत्कालीन बॅंक सिस्टीमचा फक्त फायदा उचचला अशा सगळ्या घडामोडी उत्कृष्ट पद्धतीने या सिरीजमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. 

ही सिरीज संपते ती हर्षद मेहताच्या मृत्यूनंतर.

त्यानंतर त्याच्या कुटूंबाच काय झालं, त्याच्यासोबत सुरवातीपासून असणाऱ्या त्याच्या भावाचं काय झालं याबद्दल मात्र काहीच दाखवण्यात न आल्याने लोकांना या त्याच्या कुटूंबाच काय झालं हा प्रश्न पडला…

३१ डिसेंबर २००१ रोजी  हर्षद मेहताचा पोलीस कस्टडीत असतानाच मृत्यू झाला.

त्यानंतर मात्र हर्षदच्या कुटूंबाला खूप मोठ्ठी कायदेशीर लढाई लढावी लागली. ही कायदेशीर लढाई २७ वर्ष चालली आणि इन्कम टॅक्स ट्रिब्युनलने फेब्रुवारी २०१९ मध्ये स्व. हर्षद मेहता, त्यांची पत्नी ज्योती आणि भाऊ अश्विन यांच्याकडून २,०१४ कोटींच्या केलेल्या टॅक्सची डिमांड रद्दबातल केली. 

२०१९ साली हर्षद मेहताच्या पत्नीने स्टॉक ब्रोकर किशोर जनानी आणि डेरलर बॅक विरोधात देखील एक केस जिंकली. किशोर जनानी नावाच्या स्कॉक ब्रोकरकडे हर्षद मेहतांचे ६ कोटी होते. न्यायालयाने निर्णय देताना हर्षदच्या कुटूंबाला किशोर जनानी यांनी १८ टक्के व्याजाने हे पैसे परत करावेत असा निर्णय दिला. 

या सिरीजमध्ये हर्षद मेहताचा भाऊ अश्विनचा एक डॉयलॉग आहे. त्यामध्ये अश्विन कायद्याचे पुस्तक वाचत असतो. त्यावर हर्षद म्हणतो आपल्यावर असलेल्या केस तू कायद्याचा अभ्यास करुन एका दिवसात सोडवणार आहेस का? यावर अश्विनचं उत्तर असतं की, आपल्यावर लागलेल्या केस एका दिवसात सुटतील या गैरसमजुतीत तू का आहेस?

हर्षद मेहताचा भाऊ अश्विन आज मुंबई हायकोर्ट सोबत सुप्रीम कोर्टात देखील प्रॅक्टिस करतो.

त्यांनीच कायद्याचा अभ्यास करुन हर्षद मेहतावरील कित्येक केसेस लढल्या. आपल्या भावाचं अनेक केसेसमधून नाव साफ करत असताना वेगवेगळ्या बॅंकाना त्याने जवळपास १७०० कोटींचा परतावा केला. वास्तविक अश्विन तेव्हा देखील हर्षदसाठी वकिली करायचा. 

हर्षद मेहतावरील केसेस २००१ साली त्याच्या मृत्यूनंतर थांबल्या मात्र अश्विन २०१८ पर्यन्त केसेस लढत राहिले. २०१८ साली स्टेट बॅंकेला धोका देण्याच्या आरोपावरून त्यांची मुक्तता करण्यात आली. 

 

हर्षद मेहताच्या मुलाबाबत सांगायचं तर बिझनेस स्टॅण्डर्ड मध्ये २०१८ साली त्याच्याबाबत माहिती आली होती.

Screenshot 2020 10 22 at 1.16.52 PM

https://www.business-standard.com/article/companies/harshad-mehta-s-son-in-deal-to-buy-23-in-bse-listed-company-118052300057_1.html

यामध्ये हर्षदच्या मुलाने बॉम्बे स्टॉक एक्सेंजमध्ये लिस्टेड असणाऱ्या फेअर डिल फिलामेंट्स या कंपनीची भागिदारी विकत घेतली होती.

त्यानंतर त्याच नाव बातम्यात नसलं तरी एक उद्योगपती म्हणून त्याने आपला जम बसवल्याचं सांगण्यात येत. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.