मुश्रीफांनी नगरचं पालकमंत्री पद सोडलंच तर त्याजागी प्राजक्त तनपुरेंची वर्णी लागणार?

गेल्या वर्षभरात म्हणजेच २०२१ मध्ये तरी अशी चर्चा होती कि, हसन मुश्रीफ त्यांचं पालकमंत्रीपद सोडणार !!! त्यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. 

मात्र वेळोवेळी मुश्रीफांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी करत असल्यामुळे नगरच्या पालकमंत्रीपदाची कायमच चर्चा राजकीय वर्तुळात चालत असते. अलीकडेच अहमदनगरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन आढावा बैठक पार पडली. या स्पष्ट म्हणून दाखवलं कि, बैठकीत त्यांनी असं स्पष्टपणे म्हणून दाखवलं कि, “मला पालकमंत्री पदावरून मला मुक्त करावं अशी इच्छा मी व्यक्त महिन्यांपूर्वी केली होती, मात्र अजूनही मला मुक्त केलं नाही”. 

त्यांच्या या जाहीर वक्तव्यामुळे आता दोन प्रश्न उपस्थित झाले त्यातला पहिला प्रश्न म्हणजे, मुश्रीफांना नगरचे पालकमंत्रीपद का नकोय? आणि दुसरा प्रश्न म्हणजे, त्यांनी पालकमंत्री पद सोडलंच तर त्यांच्या जागी कुण्या नेत्याची वर्णी लागणार ?

मुश्रीफांच्या या वक्तव्यामुळे असं तरी चित्र स्पष्ट होतंय कि, आता ते तरी या पदावर फार काळ राहणार नाहीत. त्यामुळे लवकरच नगरचे पालकमंत्री बदलण्याची संकेत तर आहेतच पण या पदावर राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा सद्या राज्याच्या राजकारणात म्हणलं जातंय.

मुश्रीफांनी जरी सोडलं तरी महाविकास आघाडी सरकार या पदासाठी तनपुरे यांचं नाव फिक्स करणार असे दवे काही नेतेलोकं करतायेत….असो नगरकरांचे ज्याकडे लक्ष लागले ते म्हणजे महाविकास आघाडी काय निर्णय घेईल हे तर काहीच काळात स्पष्ट होईलच पण पालकमंत्री बदलले तर हे पद नगरमधील कुठल्या नेत्याकडे जाणार की पुन्हा जिल्ह्याच्या बाहेरच्या नेत्याकडे हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पण महत्वाचं म्हणजे, या चर्चेच्या केंद्रस्थानी प्राजक्तदादा तनपुरे यांचं नाव आहे त्यामुळे त्यांच्याविषयी आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दविषयी जाणून घेऊया… 

सद्या प्राजक्त तनपुरे हे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे ते राज्यातील सर्वात तरुण मंत्री आणि आमदार आहेत असं म्हणलं जातंय. प्राजक्त तनपुरे हे राजकीय घराण्यातून आले असल्यामुळे त्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली असं म्हणलं जातं. त्याच संबंधी हा दबक्या आवाजात डायलॉग मारलाच जातो कि, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांच्यामुळे तनपुरे याना थेट एवढं मोठं पद मिळालं असल्याचं म्हणलं जातं…

पण कायमच उत्कृष्ट कामगिरी करण्यात तरुण मंत्री म्हणून तनपुरे यांची कारकीर्द मानली जाते. खरं तर त्यांनी नगरपरिषदेतून राजकारणाला सुरुवात केली त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दवर नजर टाकूया…

प्राजक्त तनपुरे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९७६ रोजी झाला….तरुण मंत्री असण्याच्या मानाबरोबरच ते एज्युकेटेड लीडर म्हणवले जातात कारण त्यांनी बी. ई, तसेच एमबीए, एमएस या पदव्या घेतल्या आहेत. त्यांनी अमेरिकेतून शिक्षण घेतलं आहे. तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्त्व आहे. तसेच त्यांचा ग्रामीण आणि शहरी भागातील समस्यांचा चांगला अभ्यास आहे. आणखी एक म्हणजे प्रसाद साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून ते जबाबदारी ते पाहतात.

प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच सुरू झाला.

 नगरपरिषदेतून राजकारणाला त्यांनी सुरुवात केली…. ते राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी अनेक विकासाची कामे पार पाडलीत, तसेच त्यांचे राहुरीत उत्कृष्ट संघटन असल्याचे दिसून येते. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीने विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं.

प्राजक्त तनपुरे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील तितकीच वजनदार आहे..

म्हणजेच प्राजक्त तनपुरे यांचे वडील म्हणजेच माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि त्यांची आई म्हणजे नगराध्यक्षा उषा तनपुरे या आहेत. शिवाय त्यांचे आजोबा बाबुरावदादा तनपुरे हे दहा वर्षे आमदार होते त्यांचे सलग २५ वर्षे आमदार होते आणि ५ वर्षे खासदार म्हणून होते. इतकी भारी कारकीर्द असून देखील आणि महत्वाचं म्हणजे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांचे निकटवर्तीय म्हणले जातात तरी देखील ते मंत्रीपदापर्यंत पोहचले नाहीत…पण त्यांचे पुत्र प्राजक्त तनपुरे मात्र मंत्रीपर्यंत पोहचले तेही पहिल्याच दमात ! 

इतकं जबरदस्त राजकीय इतिहास असलेले प्राजक्त तनपुरे याना घरातच राजकारणाचं बालकडू मिळालेत. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन ते थेट राजकारणात उतरले. 

पण त्यांच्या राजकारणातल्या संधीला त्यांच्या ‘मामांची’ कृपा म्हणून म्हणले जाते, म्हणजेच प्राजक्त तनपुरे यांच्या आई उषा तनपुरे या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बहीण आहेत. त्यामुळे मामांचा आपल्या भाच्यावर राजकीय वरदहस्त आहे, त्यांनीच प्राजक्त तनपुरे यांना राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचं तिकीट मिळवून दिल्याचे बोलले जाते. 

पण काहीही असो प्राजक्त तनपुरे यांनी २०१९ च्या नगरच्या राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विरोधात उभे राहून त्यांचा २३ हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. आज ते महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत….पहिल्याच दमात !!!

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.