आपने धर्मनिरपेक्षता मागे सोडून भाजपसारखी हिंदुत्वाची वाट धरलीय का ?
नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्यात यावा, अशी मागणी एका नेत्याने केलेय. साहजिक तुम्हाला वाटणार हा नेता भाजपचा असेल. किमान हिंदूत्वावादी धोरणावर बंड केलेल्या शिंदे गटाचा असेल. तुम्हाला अस वाटत असेल तर तुम्ही चुकताय.
ही मागणी केलेय कधीकाळचे गांधीवादी नेते, पंजाब निवडणूकीच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगतसिंग यांचा पुरस्कार केलेले व सध्या गुजरातच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हिंदूत्ववादी झालेले आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी..
सुरवातीला तुम्हालाही वाटलं असेल की नोटांवर लक्ष्मी व गणपतीचे फोटो छापण्याची केजरीवाल यांनी केलेली मागणी उपहासात्मक असेल. पण तस नाहीय. ते नेमकं काय म्हणाले हे पाहण्यासाठी खाली दिलेली लिंकवर लिंकवर क्लिक करून पहा