लहानपणी खेळणी दुरुस्त करणाऱ्या मुलाने ‘रेवा’ ही भारताची पहिली इलेक्ट्रिक कार बनवली.

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडत आहेत. अरबस्थानमधल्या तेलाच्या विहिरी कधी ना कधी आटणार हे काही सिक्रेट उरलेले नाही. सगळं जग पेट्रोल आणि डिझेलला पर्याय शोधण्यासाठी धावत आहे.

सध्या इलेक्ट्रिक कार्स हाच एकमेव पर्याय आपल्या समोर दिसत आहे.

अनेक आघाडीच्या मोटार कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या मार्केटमध्ये आणत आहेत. भारतात मात्र पहिली इलेक्ट्रिक कार १९९६ मध्येच आली होती.

तिचं नाव ‘रेवा’

बंगळुरूचे सुदर्शन मैनी हे एका प्रथितयश कंपनीमध्ये इंजिनियर होते. घरच्यांनी बळजबरीने केलेले इंजिनियर नव्हे तर त्यांना खरोखर टेक्नॉलॉजीची आवड होती.सदानकदा वस्तू खोलने रिपेअर करणे, त्या मागचं विज्ञान समजावून घेणे हा त्यांचा छंद होता.

हीच आवड त्यांच्या मुलामध्ये म्हणजे चेतन मध्ये उतरली.

अगदी लहान असताना म्हणजे चौथीत असताना चेतन मैनी याने स्वतःचा रेडिओ बनवला होता. तेव्हाच हा मुलगा जिनियस आहे आणि काही तरी वेगळं करून दाखवणार याची लक्षण दिसत होती.

त्याची दोस्त मंडळी आपली खराब झालेली खेळणी त्याच्या कडून दुरुस्त करून घ्यायची.

सहावीत पोहचला तोवर त्याने स्वतः बनवलेल्या रिमोटवर खेळण्यातले विमान उडवून दाखवले.

त्याच प्रचंड कौतुक झालं. दिवसरात्र खेळण्यातल्या कार्स खोलणे त्याचे स्पेअरपार्ट बदलणे वगैरे उद्योग सुरू असायचे.

अगदी शाळकरी वयातच त्याला इलेक्ट्रॉनिक कारची चमत्कारिक दुनिया खुणावत होती.

पुढे अमेरिकेच्या मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये मेकॅनिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटमध्ये त्याने प्रवेश घेतला. त्याच हे लहानपणापासूनच स्वप्न होत कारण मिशिगनजवळच असणारे डेट्रोईट हे जगभरातले ऑटो हब म्हणून ओळखले जाते.

अमेरिकेत गेल्यावर चेतनच्या टॅलेंटला खरी संधी मिळाली.

या विद्यापीठात वेगवेगळे चाललेले प्रयोग, नवीन टेक्नॉलॉजीचा भाग होता आलं, शिकायला मिळालं.

युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनने एकदा सोलर कार बनवण्याच्या कॉलेज प्रोजेक्टसाठी एक टीम बनवली. चेतन मैनी यांची सुद्धा यात निवड झाली. त्यांनी व त्यांच्या ग्रुपने सनरनर ही सोलार कार बनवली.

या कारला त्यांनी सोलार कार रेस मध्ये उतरवलं. अमेरिकेत त्यांनी रेस जिंकली.

पुढची जागतिक चॅम्पियनशिपची रेस ऑस्ट्रेलियाला होणार होती.

जगभरातील होंडा सारख्या दिग्गज ऑटो कंपन्या आपल्या ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजीच्या कार घेऊन आल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात ३२०० किमी ही रेस होणार होती. तेव्हा या मिशिगन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कारने तिसरा नंबर मिळवला.

जगभरात चेतन मैनी व त्यांच्या टीमचील कौतुक झालं.

या रेसमुळे चेतन मैनी यांना प्रचंड आत्मविश्वास मिळाला. जगात सस्टेनेबल एनर्जीवर भरवसा ठेवता येऊ शकतो, आणि पर्यावरणाच्या दृष्ट्या हाच भविष्यकाळ असणार आहे याची त्यांना खात्री पटली.

मेकॅनिकल इंजिनियरिंग च्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी स्टॅनफोर्ड विद्यापिठात प्रवेश घेतला.

इथे शिकत असतानाच त्यांनी एक इलेक्ट्रिकल कारच डिझाइन बनवलं.

पुढे डॉ.लोन बेल यांच्या कंपनीत इंटर्नशिप सुरू केली. तिथे असताना चेतन मैनी याना या टेक्नॉलॉजीवर रिसर्च करायला त्यात इंपृव्हमेंट करायला चान्स मिळाला. या काळात त्यांना अनेक मोठ्या कंपण्यातून जॉबची ऑफर येत होती पण त्यांनी त्याला नकार दिला.

चेतन मैनी यांना आपल्या देशाची इलेक्ट्रिक कार बनवायची होती.

साधारण १९९४ साली चेतन यांचे वडील सुदर्शन मैनी अमेरिकेला आले व डॉ. बेल यांच्या पुढे भारतात इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी कंपनी सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी तो स्वीकारला.

अवघ्या २४ वर्षांच्या चेतन मैनी यांनी १९९६ साली पहिली इलेक्ट्रिक कार बनवून भारतात पाठवून दिली.

आपल्या आईच्या नावावरून या गाडीच नाव रेवा ठेवण्यात आलं होतं.

भारतीय रस्त्यावर अनेक कठोर चाचण्या करण्यात आल्यावर १९९७ साली पुण्याच्या ARAI या संस्थेतर्फे त्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पुढच्या दोन वर्षात चेतन मैनी भारतात आले. आता पर्यंत त्यांनी कार बनवण्यासाठी प्रयत्न केले होते पण आता या कार साठी मार्केट बनवण्याच आव्हान होतं.

अनेक चाचण्या, सुधारणा १० लाख किमी रनिंग हे सगळं केल्यावर अखेर जुलै २००१ मध्ये रेवा बाजारात आली. फक्त भारतातच नाही तर इंग्लंड अमेरिकेतही त्याची विक्री सुरू करण्यात आली.

चेतन मैनी यांचं स्वप्न साकार झालं.

पण हा काळ पेट्रोल डिझेलच्या कारचा सुवर्णकाळ होता. नवनवीन संशोधन होऊन लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या गाड्या येत होत्या. त्यातील कन्फर्ट, त्याचा स्पीड या पुढे बॅटरीवर चालणारी छोटीशी रेवा एखाद्या खेळण्यातल्या गाडी प्रमाणे दिसायची.

सरकारची कोणतीही मदत किंवा सबसिडी मिळत नसतानाही चेतन मैनी यांनी हार मानली नाही. आपल्या कार मध्ये बदल करत लोकांना अवेअरनेस पोचवत त्यांनी आपला लढा सुरूच ठेवला.

२०१० साली महिद्रांने त्यांचे ५५% शेअर्स विकत घेतले.

आता महिद्रातर्फे रेवा आय व रेवा लिऑन या गाड्या प्रोड्युस केल्या जातात. १६० किमी प्रति तास वेगाने धावणारी रेवा NXG हे त्यांचं टार्गेट आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.