मुंबईत एक जण हॉटेलात ८ महिने राहिला, २५ लाखाच बिल केलं आणि खिडकीतुन पळून गेला

तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असे किस्से अनेकदा घडतात कि, एखाद्या व्यक्तीने एका हॉटेल मध्ये स्टे केला, तेथील सोयी-सुविधा वापरल्या आणि बिल न भरता पळून गेला. बरं बिल किती असेल? फार तर फार झालं असेल ४-५ हजार किंव्हा थोडंफार जास्त..

पण मुंबईत तर एक किस्सा असा घडलाय कि, एक महाशय मुंबई शहरातल्या अलिशान हॉटेल मध्ये राहिला तेही तब्बल ८ महिने. हो आणि या ८ महिन्याचं बिल केलं तब्बल २५ लाख इतकं ! आणि हे तब्बल २५ लाखांचं बिल न भरता हा व्यक्ती कोणालाही काहीही कल्पना न देता तो फरार झालाय. थोडक्यात या महाशयाने या हॉटेल ला २५ लाखांना गंडवलं आहे.

तर या व्यक्तीचं नाव सांगितलं जातंय मुरली कामत असं. 

मुरली कामत असे ओळखले जाणारे आरोपी नवी मुंबईतल्या एका हॉटेलमधून २५ लाख रुपयांचं बिलाची थकबाकी न देता पळून गेले आहेत. याच मुरली कामात याने आपल्या लहान मुलासह तब्बल ८ महिन्यांपूर्वी हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. गेल्या आठ महिन्यांपासून या व्यक्तीने दोन रूम बुक केल्या होत्या. 

२५ लाख रुपयांचे बिल घेऊन तो बाथरूमच्या खिडकीतून पळून गेला. 

हा ४३ वर्षीय मुरली कामत जो अंधेरीचा रहिवासी असल्याचं प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याने आठ महिन्यांच्या कालावधीसाठी खारघर परिसरातील ‘हॉटेल थ्री-स्टार’ मधील दोन खोल्या बुक केल्या होत्या. त्याने त्याच्या १२ वय वर्षाच्या मुलासह हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. अडीचशे दिवसांपासून जास्त काळ हॉटेल मध्ये राहून त्याने २५ लाखांचे बिल केले. मात्र हे २५ लाखांचे बिल न भरता तो व्यक्ती आपल्या मुलासह पळून गेला. त्यानंतर या हॉटेलने मुरली कामतविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

अहवालानुसार, कामत गेल्या वर्षी म्हणजेच २०२० सालच्या नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदाच या मुंबईतल्या  हॉटेलमध्ये प्रवेश केला होता.

आपण बराच काळापासून  फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, माझ्या बऱ्याच ओळखी आहेत इत्यादी  माहिती त्या हॉटेल च्या कर्मचाऱ्यांना दिली आणि दोन सुपर डीलक्स रूम बुक केल्या. एक रूम त्या व्यक्तीच्या वैयक्तिक मुक्कामासाठी होती तर दुसरी रूम त्याच्या कामाशी संबंधित असलेल्या बैठकांसाठी होती.

चेक इन केल्या नंतरच्या एका महिन्यानंतर आपण झालेल्या बिलाची रक्कम भरू असे आश्वासन त्याने हॉटेलवाल्यांना दिले होते. त्यासोबतच या व्यक्तीने स्वतःचा पासपोर्ट हॉटेलला सबमिट केला होता अशीही माहिती समोर आली आहे. 

बरीच महिने झालीत बिल भरले नाही म्हणून हॉटेल मालकांनी त्यांना बिल भरण्याची विनंती केली.

अगदी यावर्षीच्या मे महिन्यापर्यंत या कामात ने हॉटेलचे बिल भरलेच नव्हते. शेवटी १७ जुलै रोजी हॉटेल कर्मचाऱ्यांना त्यांच्या बुक केल्या गेलेल्या रूममध्ये आढळले की, कामत याने आपल्या मुलासह बाथरूमच्या खिडकीतून पळ काढला आहे. मात्र त्याने त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन हॉटेलच्या रुममधेच सोडला. मात्र त्याचा शोधाशोध करून शेवटी हाती काहीच न लागल्याने शेवटी हॉटेलने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.