आयटीतला जॉब सोडून त्यानं काय केलं, तर गाढविणीच्या दुधात पैसा असतोय हे शोधलं

भारतात गाढवांचा मुख्य उपयोग वजन ओढण्यासाठी करण्यात येत होता. मात्र, गाड्या आल्यानंतर मागच्या काही वर्षात गाढवांची संख्या खूप कमी झाली आहे. मात्र आता एक गोष्ट समोर येत असून पुन्हा एकदा गाढवाची प्रजाती वाढण्याचे चिन्हे आहेत. 

ते म्हणजे गाढविणीचे दुधामुळे.  

आयटी कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून मंगोलर मधील एका तरुणाने डॉंकी फार्मिंग सुरु केलं आहे. पहिल्या दहा दिवसात डॉंकी फार्मच्या मालकाला गाढवाच्या दुधासाठी १७ लाखांची ऑर्डर मिळाली आहे.  

हे डॉंकी फार्म करणाऱ्या तरुणाचे नाव श्रीनिवास गौडा असे आहे. 

४२ वर्षांच्या श्रीनिवास गौडा यांनी कर्नाटकतील दक्षिण कन्नड जिल्ह्यात डॉंकी फार्म सुरु केले आहे. श्रीनिवास यांनी सुरू केलेले डॉंकी फार्म देशातील दुसरे आणि कर्नाटकातील पहिले असल्याचे सांगण्यात येत आहे.   

२०२० मध्ये श्रीनिवास यांनी आपली आयटी कंपनीतील नोकरी सोडली आणि इरा या आपल्या गावात २.३ एकर मध्ये फार्म सुरु केले. या फार्म मध्ये कडकनाथ कोंबड्या, ससा, बकऱ्या ठेवण्यात आल्या होता. तसेच पशुवैद्यकीय सेवा सुरू केल्या होत्या. मागच्या २ वर्षात या परिसराचा चांगलाच विकास केला. 

श्रीनिवास यांनी गावात फार्म सुरु केल्यानंतर त्यांना गाढवाच्या दूधाबद्दलचे महत्व समजले होते. जेव्हा गाढवे पाळण्या बद्दल लोकांना सांगितले होते तेव्हा लोक यावर हसू लागले होते. गाढवाचे दूध हे चविस्ट  आणि त्यात औषधी गुण असल्याचे श्रीनिवास सांगतात.  

याच फार्म मध्ये श्रीनिवास यांनी ८ जून पासून डॉंकी फार्म सुरु करण्याचा निर्णय घेतला. 

सध्या श्रीनिवास यांच्या डॉंकी फार्म मध्ये २० गाढव आहेत. यासाठी श्रीनिवास यांनी ४२ लाख रुपये खर्च केले आहेत. गाढवाचे दूध विकण्यासाठी हे फार्म सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांना गाढवाचे दूध विकण्याची प्लॅनिंग श्रीनिवास यांची आहे. त्यांना आताच १७ लाखांची ऑर्डर मिळाल्याचे मीडिया रिपोर्ट नुसार सांगण्यात येत आहे. 

गाढवीनीची दूध सगळ्या दुकानांमध्ये मिळावे यासाठी श्रीनिवास प्रयत्न करणार आहेत. ३० एलएलच्या पाकिटाची किंमत १५० रुपये असणार आहे. हे दूध दुकानांबरोबर सुपर मार्केट आणि मॉल्स मध्ये उपलब्ध होणार आहे.

एक गाढविणी जास्तीत जास्त अर्धा लिटर दूध मिळते. जर गाढविणीकडून चांगलं दूध हवं असेल तर तिला वजनाचं काम द्यायला नको आणि स्वछता ठेवायला हवी असं पशु तज्ज्ञांचे मत आहे.

युरोपात आणि अमेरिकेत गाढविणीच्या दुधाला अधिक मागणी आहे. भारतातही मागच्या काही  वर्षांपासून गाढविणीचे दूध विकायला सुरुवात झाली आहे. हे दूध जास्त काळ टिकत नाही. 

टीस मधून एमएच शिक्षण घेणाऱ्या पूजा कौलने गाढवाच्या मदतीने काम करणाऱ्या लोकासांठी काही तरी चांगले करायचे होते. त्यासाठी २०२० मध्ये पूजा कौलने या तरुणीने कोल्हापूर मध्ये कामगारांना आणि ज्यांच्या शेतकरीकडे गाढवे आहेत त्यांना एकत्र केलं आणि गाढविणीचे दूध विकण्याचा प्रयत्न केला. हे मॉडेल तेव्हा फसले होते. 

मात्र, तिने हार मानली नाही. पूजाने आपली सहकाऱ्याच्या मदतीने ऑरगॅनिको नावाचा एक स्टार्टटप सुरु केलं होता. यात गाढवाच्या दुधापासून स्किन केअर उत्पादन तयार करून विकण्यात येतात. 

फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या ऑनलाईन वेबसाईट गाढवाच्या दुधापासून तयार करण्यात आलेले अनेक स्किन केअर प्रोडक्ट उपलब्ध आहेत.     

श्रीनिवास गौडा सांगतात की, सुरुवातीला गाढवाचे दूध विकणार म्हटल्यावर काही मित्रांनी चेष्टा केली होती. मात्र, तेच मित्र आता कौतूक करत आहेत. स्वतःच्या गावात डाँकी फार्मिंग आणि ट्रेनींग सेंटर सुरु केले आहे. गाढवाचे दूध हे इम्युनिटी बूस्टर असत. पहिल्या दहा दिवसात १७ लाखांची ऑर्डर मिळाली आहे. 

युरोप मध्ये काही ठिकाणी लहान मुलांना गाढविणीचे दूध पाजण्यात येते. तर अमेरिकेत गाढविणीच्या दुधापासून साबण, क्रीम बनवण्यात येते. लोकांकडून या स्किन केअर प्रोडक्टला  चांगली मागणी असल्याचे सांगितलं जात. भारतातील पशु तज्ज्ञांचे मते गाढवांच्या दुधावर अजून खूप रिचर्स करावा लागणार आहे. जरी हे दूध प्यायचे असेल तर त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. 

हे ही वाच भिडू   

 

Leave A Reply

Your email address will not be published.