स्वप्नात येणाऱ्या बाईचा पुतळा बांधायला गेला आणि १६ वर्षांपूर्वी केलेल्या खुनात सापडला

गुन्हा केला तर पहिल्या काही दिवसात आरोपींना वाटत पोलिसांच्या तावडीत सुटलो तर आपल्याला काहीच होणार नाही. मात्र या प्रकरणात आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी तपास बंद केला होता. मात्र आरोपीच्या मानगुटीवर खुनाचा भूत बसलं होत आणि त्यामुळेच ते १६ वर्षांनंतर सापडले.
१९९७ मध्ये मुंबईतील शिव भागात एका ५८ वर्षीय महिलेचा खून झाला होता. मुंबई पोलीस १ वर्ष तपास करतात. मात्र त्यांना आरोपी बद्दल काहीच माहिती मिळत नाही. त्यामुळे मुंबई पोलीस तपास थांबवते. त्यानंतर १६ वर्षानंतर एक सुगावा लागतो आणि त्या महिलेचे खुनी सापडतात. त्याच कारण म्हणजे खून करण्याच्या स्वप्नात येणारी बाई.
खून झालेल्या महिलेचं नाव भानुमती ठक्कर असे होते. त्या शिव येथील वृंदावन सोसायटीत एकट्याच राहायच्या. त्यांचे पती अमृतलाल हे व्यावसायिक होते आणि ते दुबईला राहायचे. ते वर्षातून एकदा मुंबईला येत. तर त्यांच्या मुलगा पुण्यात राहायचा.
ठक्कर यांच्या घरी काम करणारी माया पवार १४ ऑक्टोबर १९९७ ला दरवाजा वाजवते. मात्र अर्धा तास मधून भानुमती ठक्कर बाहेर येत नाहीत. मध्ये काही तरी घडल्याचा संशय आला त्यामुळे त्यांनी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं.
पोलीस दरवाजा तोडून घरात जातात.
त्यावेळी घरातील फर्निचर, कपडे, सामान हे विखुरलेले असत. तर भानुमती ठक्कर हे किचन मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सापडल्या. तसेच पोलिसांनी घराची झडती घेतल्यावर अडीच लाख रुपये आणि सोने गायब असल्याचे पोलिसांच्या लक्षात येते. मुंबई पोलिसांना भानुमती ठक्कर यांचे आरोप काही सापडत नाही. त्यामुळे १९९८ मध्ये पोलीस कोर्टात एक अहवाल सादर करतात आणि केस बंद करतात.
मधल्या १६ वर्षात काहीच घडत नाही. २०१३ मध्ये मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच मध्ये एक जण येतो आणि सांगतो की, सालो पहिले भानुमती ठक्कर नाम के औरत का मर्डर किया था तानाजी और संभाजीने. इन दोनो को अरेस्ट करलो साहब. शायद उनकी आत्मा को शांती मिलेगी.
तसेच त्याने सांगितले की, महाड तालुक्यातील आमच्या गावात या महिलेची समाधी बांधण्यात आली आहे. आम्ही बांधणाऱ्याला विचारले त्यावेळी त्याने महिलेच्या हत्येचे कारण सांगितले. शीवमध्ये एका महिलेची काही वर्षांपूर्वी हत्या झाली होती. तिचा आत्मा आमच्या गावाच्या अवतीभवती फिरत असतो. पोलिसांना वाटत गावाकडून आला आहे काही तरी बडबड करत असणार. त्यामुळे ते काही जास्त लक्ष देत नाही. पोलिस गांभीर्याने घेत नव्हते; मात्र ही व्यक्ती मात्र त्याच तळमळीने सांगत असतो.
यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक वस्त यांना काही तरी आहे असं वाटलं आणि त्यांनी पुन्हा एकदा तपासाचे आदेश दिले. पोलीस शीव पोलिस ठाण्यातील रेकॉर्ड तपासतात. सलग २० दिवस पोलीस भानुमती यांच्या हत्येप्रकरणातील कागदपत्रे शोधतात. त्यानंतर त्या व्यक्तीने दिलेल्या माहिती खरी असल्याचे पोलिसांना वाटले.
तपास करतांना समजले की, तानाजी पवार आणि संभाजी शेलार यांनी हा खून केल्याचे समजले होते.
माहिती देणार्याने पोलिसांना असेही सांगितले की, गुन्हा घडल्यापासून तानाजीला रात्री झोप येत नाही. त्याच्या स्वप्नात भानुमती ठक्कर येतात. तसेच दुसरा आरोपी तानाजीला एका पुजाऱ्याने सल्ला दिला होता. भानुमती ठक्कर यांचा पुतळा तयार केला आणि त्याची पूजा हे करत होते. त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला पुतळ्याबद्दल विचारले तेव्हा तानाजीने उत्तर दिले की ही एक स्त्री होती जी मुंबईत अपघातात मरण पावली होती आणि ती त्याच्या स्वप्नात दिसत होती.
पोलिसांना आरोपीचे गाव माहीत असले, तरी ते दोघेही मुंबईतच राहत होते. मुख्य आरोपीचा साथीदार संभाजी शेलार याचा मोबाइल नंबर पोलिसांना मिळाला. मोबाइल नंबरवरून संभाजी याचा गोरेगावच्या भगतसिंग नगरातील पत्ता मिळाला होता. पण याठिकाणी तो सापडला नाही.
शेलारला पोलिसांनी मोबाइल कंपनीमधून बोलतोय, असे भासवून पत्ता पडताळणी करण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. यावर आपण तुर्भे येथे कामाला असल्याचे संभाजी म्हणाला. पत्ता पडताळणी झाली आहे. आम्हाला केवळ तुमची सही हवी आहे, असे सांगून पोलिसांचे पथक तुर्भे येथे पोहोचले. सही करण्यासाठी कार्यालयाबाहेर आलेल्या संभाजीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आता खोटे बोलून काहीच होणार नाही, हे संभाजीला चांगेलच ठाऊक होते. माया पवार हिचा पती तानाजी पवार आणि मी मिळून भानुमती हिची हत्या केल्याचे त्याने सांगितले. तानाजी चुनाभट्टी येथे राहायला असून पती-पत्नी रुग्णांची देखभाल करण्याची कामे करत असल्याची माहिती संभाजी याने दिली. या माहितीवरून कफ परेड येथील एका रुग्णाच्या घरातून तानाजी याला पोलिसांनी पकडले.
तानाजी याने पोलिसांच्या तावडीत १६ वर्षांपासून पाळणारे आरोपी सापडले होते.
१४ ऑक्टोबर १९९७ च्या दुपारी तुळशीचे रोप देण्याच्या बहाण्याने वृंदावन सोसायटीमध्ये तानाजी गेला. भानुमती यांच्या घरात पैसे आणि दागिने असतात त्याला माहित होते. त्याला दहा हजारांची गरज होती. म्हणून पत्नी काम करत असलेल्या भानुमती यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. दहा हजार रुपये देणे हे भानुमती यांच्यासाठी फार कठीण नव्हते. तरीही त्या नकार देत होत्या.
घरातीलपैसे घेत असताना भानुमती आणि अडविले. त्यामुळे रागाच्या भरात आमच्याकडून त्यांची हत्या दोघांनी केली. पण तेव्हापासून तानाजी शांत झोपलो नाही. तो मांत्रिकांकडे गेला. मात्र त्याच्या पाठीवरील खुनाचे भूत उठत नव्हते. त्यांनी गावात समाधी बांधली. पण शेवटी आमचा गुन्हा उघडकीस आला.
हे हि वाच भिडू
- हॉलिवूडचे पिक्चर बघून हुशार बनला, पण डोकं बायको आणि गर्लफ्रेंडचा खून करण्यात वापरलं…
- शिक्षकाने पिक्चर पाहून विद्यार्थिनीचा खून केला लपायला मुलींचे ड्रेस घालून फिरला, तरीही घावलाच
- फेमस होण्यासाठी ३७ दिवसात ३७ खून केले पण महासत्ता अमेरिका अजूनही त्याला शोधू शकली नाही