योग्य वेळी घेतलेलं विष अमृत होवू शकते, अवेळी घेतलेले अमृत विष होवू शकते.

माणसाच्या आयुष्यामध्ये वेळेला अन्यसाधारण महत्व आहे. ज्या प्रमाणे पृथ्वी स्वतः भोवती फिरते, सूर्य उगवतो आणि मावळतो, पावसाळा येतो आणि हवा वाहत असते या सगळ्या गोष्टी वेळेवर अवलंबून आहे. त्याच प्रमाणे माणसाचं जगण, मरण, सुख-दुख, यश आणि अपयश सगळं काही वेळेवर अवलंबून असते.

माणसाने दिवसभर कधी आणि काय करायचे हे सुद्धा वेळेचच गणित असत असं म्हंटल तरी चालेल. कधी उठलं पाहिजे, कधी अंघोळ केली पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे हा सगळा वेळेलाच भाग असतो.

माणूस भूक भागवण्यासाठी अन्न खातो खर पण वेळेवर घेत नसल्यामुळे आजारही पडतो. कोणत्या वेळेस कोणत्या गोष्टी खाव्यात याच हे माहित नसल्यामुळे अनेक मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कधी काय खाल्लं पाहिजे हे माहित असल्यास आपल्याला अनेक आजारानं पासून दूर राहता येईल.

रात्रीच्या वेळेस दही खाऊ नये. 

आयुर्वेदानुसार रात्रीचा वेळी दही खाऊ नये. कारण रात्री दही खाल्याने पोटातील कफ चे प्रमाण वाढते. त्यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजारांना निमंत्रण मिळते. दुपारची वेळ दही खाण्यासाठी योग्य मनाली जाते. वसंत वृतू मध्ये दही खान टाळावं. ज्या लोकांच्या शरीरामध्ये सूज आहे त्यांनी दही खाऊ नये. तसेच दही कधीही गरम करून खाऊ नये किंवा उन्हामुळे दही गरम झाली असेल तरी ती खाऊ नये.

रात्री झोपायच्या आधी दूध पिणे चांगले असते.

दूध पिण्याची योग्य वेळ किंवा अयोग्य वेळ कुठली यावर खूप जणांची आपापली मत आहेत. काही लोक तर दूध पिण्याच्या वेळेला घेऊन गोंधळले असतात. काही लोक दूध नाश्त्यामध्ये घेणं पसंद करतात. तर काही लोक रात्रीच्या जेवणा नंतर घेणं पसंद करतात. जर दूध दिवसा पिल तर त्याच्यामुळे दिवसभर एनर्जी राहते. आणि रात्री घेतलं तर डोकं शांत राहत आणि झोप चांगली येते. आयुर्वेदा मध्ये दूध पिण्याची योग्य वेळ रात्रीची असते असं सांगितलं आहे.

फळ खाण्याची वेळ.

फळ खाण्याची किंवा फळाचा ज्यूस पिण्याची योग्य वेळ सकाळची असते. जेवण झाल्यानंतर फळ खाऊ नये असं आयुर्वेदात सांगितलं आहे. जर जेवणानंतर फळ  खाल्यास पचनसंस्थेशी संबंधित आजार उद्भवतात. आपण खाल्लेल्या फळाचा शरीरासाठी काहीही उपयोग होत नाही. फळांमध्ये असणारी पौष्टीकता घ्यायची असेल तर सकाळच्या वेळेस फळ खावी.

पाणी पिण्याची योग्य वेळ.

लहानपणा पासून आपल्याला नेहमी हे संगितलं जात कि रोज किमान आठ ग्लास तरी पाणी प्यावे. पाण्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. चेहऱ्यावरील चमक, केस गळणे, पोटाच्या समस्या आणि लठ्ठपणा या सारखं अनेक प्रॉब्लेम पाण्यामुळे कमी होतात.पण हे सगळे फायदे तेव्हा होतात जेव्हा पाणी योग्यवेळी पिले जाते. चुकीच्या वेळी पिलेल पाणी अनेक आजारांना आमंत्रण देतो.

१) सकाळी उठल्यानंतर १ ते २ ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे आपल्या शरीरात असलेल्या बॅक्टेरिया मल आणि मुत्राद्वारे बाहेर पडते. आणि शरीराला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी मदत होते.

२) जेवण करण्याच्या अर्धा तास आधी जर पाणी पिले तर भूक कमी लागते. त्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. आणि पोट हि चांगले राहते

३) जेवल्या जेवल्या किमान तासभर नंतर पाणी प्यावे कारण अन्न पचवण्यासाठी निर्माण होणारा पचनद्रव खाल्लेल्या अन्नामध्ये चांगल्या पद्धतीने मिसळतो. त्यामुळे पचन चांगले होते.

४) जेवण करताना तहान लागली तर दही, ताक, रायता प्यावे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळेते आणि जेवणही लवकर पचते.

५) आपल्या मेंदूमध्ये ७५ टक्के पाणी असते. म्हणून थकवा आला कि पाणी प्यावे. त्यामुळे थकवा जातो काम करण्यात प्रसन्नता येते.

६) सकाळ पासून दिवसभर जास्त पाणी प्यावं. संध्याकाळ पासून पाण्याचं प्रमाण कमी करावं. तस केल्यास रात्री झोपमोड होत नाही. त्यामुळे चांगली झोप घेता येते.

७) अंघोळीच्या आधी पाणी प्यावे. त्यामुळे ब्लडप्रेशर कमी होण्यास मदत होते. गरम पाण्याने अंघोळ करणार असाल किंवा शावर घेणार असाल तर थंड पाणी पिवू नये.

८) व्यायाम करण्याच्या आधी पाणी पिल्याने आपल्या मांसपेशी उत्तेजित होतात. आणि योग्य प्रमाणात पाणी पिलं तर थकवा कमी लागतो.

९) आजारी असताना जेवढं जास्त पाणी प्याल तेवढ्या लवकर बरे व्हाल. महिलाना गर्भावस्थेत आणि स्तनपान करताना पाण्याची जास्त गरज असते. त्यामुळे या काळात शक्य तेवढे पाणी प्यावे.

Leave A Reply

Your email address will not be published.