सद्या नाशिक जिल्ह्यात नेमकी पूरस्थिती काय आहे?

गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या काही भागात पावासने हाहाकार माजवला आहे. त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यात देखील गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मालेगावच्या तब्बल ३ हजार हेक्टर वरची जमीन पाण्याखाली गेली आहे.

मागे झालेल्या पावासने नाशिकमधील गोदावरी नदीला १३ सप्टेंबर रोजी पहिला  पूर आला होता. त्यानंतर दुसरा पूर २२ सप्टेंबर ला आला. आता तिसरा पूर आला आहे. कारण पुन्हा एकदा गंगापूर धरणातून विसर्ग सुरू केल्याने वर्षातला तिसरा पूर गोदावरीला आला. त्याला नाशिक मध्ये होणारा मुसळधार पाऊस आहे.

सद्या शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गंगापूर धरणातून १५००० क्यूसेक पेक्षा अधिक प्रमाणात विसर्ग होणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच त्यांना शक्य तितक्या लवकर स्थलांतरित होण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. 

आजही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे तसेच नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, प्रशासनाने असे आवाहन केले आहे. 

नांदगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, कळवणला पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. त्यात नांदगावमध्ये पांझण नदीमधून तर पालखेडच्या कालव्यात वाहून जाण्याच्या २ घटना घडल्या आहेत. 

मालेगाव – मालेगाव मधील शेतकऱ्यांना सर्वात जास्त या पावसामुळे नुकसान सहन करावे लागले आहे. एकट्या मालेगाव मधील तब्बल सहा गावांमधील तीन हजार हेक्टरवरील पीक उद्धवस्त झालेय. त्यामुळे तब्बल ५ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

तेथील शेकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सोपवला तर आहे मात्र नेहेमीप्रमाणेच नुकसान भरपाई कधी मिळणार याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही.

तर नांदगावमध्ये तब्बल २४३ मिमी पाऊस झाला आहे.

काल म्हणजेच मंगळवारी दिवसात नांदगावमध्ये तब्बल २४३ मिमी पाऊस झाला आहे. 

तर येवल्यात ७६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे जवळील मनमाडला पांझण आणि रामगुळणा नद्यांना पूर आलाय.  त्यामुळे अनेक भागात पाणी शिरले. मनमाडची जीवनवाहिणी असणारे वाघदर्डी धरण भरले आहे.

तर निफाड तालुक्यातील उगाव, शिवडी, खेडे परिसरात मोठ्या पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.

सध्या सर्वत्र होणारी ढगफुटी हाही हवामान बदलांचा परिणाम असल्याच तज्ञ मानतात. त्यामुळे येत्या काळात हवामान बदलाचे परिणाम प्रकर्षाने जाणवण्याची शक्यता असल्यानं याबाबत प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.