मोदींपासून संरक्षण मंत्र्यांपर्यंत वापरलं जाणार हे हेलिकॉप्टर सर्वात सुरक्षित मानलं जातं

तामिळनाडूच्या निलगिरीमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर Mi-17V5 कोसळले. या चॉपरमध्ये  सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 14 जण होते. निलगिरीच्या टेकडीवर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. तर बिपीन रावत यांनाही रुग्णालयात भरती केल्याचं समजतंय.

दरम्यान, लष्कराचं जे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. ते एक व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर आहे. Mi-17V5 भारतीय हवाई दलाचे सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह हेलिकॉप्टर मानले जाते. जे रशियाकडून मागवण्यात आले. रशियाच्या कझान हेलिकॉप्टरने याची निर्मिती केलीये. 

रशियाच्या Rosoboronexport ने 80 Mi-17V5 हेलिकॉप्टर वितरीत करण्यासाठी 2008 मध्ये भारत सरकारसोबत करार केला होता, जो 2013 मध्ये पूर्ण झाला होता. या 80 हेलिकॉप्टरसाठी १.३ अब्ज डॉलरचा करार झाला होता.

भारतीय हवाई दलासाठी २०१३ मध्ये पुन्हा  71 नवीन  Mi-17V5 हेलिकॉप्टरच्या वितरणासाठी नवीन करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती.

या हेलिकॉप्टरचा वापर लढाई सोबतच, शस्त्रे आणि रॉकेटपर्यंत वाहून नेण्यासाठी, फायर सपोर्ट, गस्त आणि शोध आणि बचाव मोहिमेसाठी केला जातो. हेलिकॉप्टरचे जास्तीत जास्त टेक-ऑफ वजन 13,000 किलो आहे.

हे जगातील सर्वात प्रगत लष्करी वाहतूक हेलिकॉप्टरपैकी एक मानले जाते.  त्यामुळे लष्करासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा या हेलिकॉप्टरचा वापर करतात. या हेलिकॉप्टरची तुलना बोइंग CH-47 चिनूकशी केली जाते.

या Mi-17V5 हेलिकॉप्टरची खासियत म्हणजे ते कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत, म्हणजे पार उष्णकटिबंधीय असो  सागरी हवामानात आणि अगदी वाळवंटातही उड्डाण करू शकते.

Mi-17V5 मध्ये Shturm-V क्षेपणास्त्र, S-8 रॉकेट, एक 23mm मशीनगन, PKT मशीन गन आणि AKM सब-मशीन गन आहे. तसेच शस्त्रांना लक्ष्य करण्यासाठी आठ फायरिंग पोस्ट आहेत. यात काचेचे कॉकपिट आहे, ज्यामध्ये मल्टी-फंक्शन डिस्प्ले, नाईट व्हिजन इक्विपमेंट, ऑनबोर्ड वेदर रडार आणि ऑटोपायलट सिस्टम आहे. केबिनच्या आत आणि बाहेरील स्लिंग कार्गो वाहतुकीसाठी डिझाइन केले आहेत

या हेलिकॉप्टरच्या स्पीड विषयी बोलायचे झाले तर Mi-17V5 चा टॉप स्पीड 250km/h आणि स्टॅण्डर्ड रेंज 580km आहे. महत्वाचं म्हणजे गरज भासल्यास ती वाढवताही येते. ते जास्तीत जास्त 6,000 मीटर उंचीवर उडू शकते.

हेलिकॉप्टरमध्ये स्टारबोर्ड स्लाइडिंग डोअर, पॅराशूट उपकरणे, सर्चलाइट आणि इमर्जन्सी फ्लोटेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे. जेणेकरून अपघाताच्या वेळी कुठलीही जीवितहानी टाळता येईल. तसेच  स्फोटांपासून संरक्षण करण्यासाठी इंधन टाक्या फोम पॉलीयुरेथेनने भरलेल्या असतात. यात इंजिन-एक्झॉस्ट इन्फ्रारेड सप्रेसर, फ्लेअर्स डिस्पेंसर आणि जॅमर देखील आहे.

Mi-17V5 हेलिकॉप्टरचा कमाल वेग 250 किमी/तास आहे आणि मानक श्रेणी 580 किमी आहे. ते जास्तीत जास्त 6,000 मीटर उंचीवर उडू शकते.

आता एवढ्या टेक्नॉलिजीने सुसज्ज असलेलं हेलिकॉप्टर नेमकं कोसळलं तरी कसं याचा शोध अजून चालू आहे. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक बोलावली आहे.

हे ही वाचं भिडू :

English Summary: The Mi-17V5 is a modern transport helicopter used by the Indian Air Force. The chopper is designed to carry personnel, cargo, and equipment inside its cargo cabin or on an external sling. The helicopter is capable of dropping tactical air assault forces and reconnaissance teams.

 

WebTitle: helicopter which are considered to be the safest are also used by the prime minister and the minister of defense

1 Comment
  1. Yogendrasingh Shivaji Patil says

    भारताचे सर्वोच्च CDS प्रमुख बीपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत दु:खद निधनाने भारताने एक महान हिरा गमावल्याने देशावर शोककळा पररली..स्व.बीपीनजी रावत यांना व समवेत १३ जणांजेही दुर्घटनेत निधनाने भावपुर्ण श्रद्धांजली…

Leave A Reply

Your email address will not be published.