व्हिन्सीने ६०० वर्षांपूर्वी बनवलेल्या डिझाइननुसार हेलिकॉप्टरचा जन्म झाला

देशभरात सध्या हेलिकॉप्टरची चर्चा आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशा हेलिकॉप्टरचा इतिहास ही फार मोठा आहे.

आणि या हेलिकॉप्टरला चित्रात उतरवणारा कलाकार म्हणजे लिओनार्दो दा व्हींची….

गोलाकार आणि पंख या अर्थांचे ग्रीक शब्द आहेत ना त्यांच्यावरून हेलिकॉप्टर हा शब्द तयार झाला आहे.

जुन्या विमानाचा संदर्भ आपल्या रामायणात सापडतो तसाच  चालविता येईल अशा उडणाऱ्या यंत्राचा सर्वांत आधीचा उल्लेख चिनी लेखनात इ. स. ३२० मध्ये आलेला आढळतो. फ्लाइंग टॉप
म्हणजेच उडता भोवरा या चिनी खेळण्यावर आधारित हे यंत्र असावं.

पंख हे उड्डाणाचा स्रोत म्हणून वापरणाऱ्या चिनी पतंगाचा ४०० सालामधील उल्लेख आढळतो. दोरा ओढून त्या यंत्राची पाती फिरविणे हे हेलिकॉप्टरचे तत्त्व वापरणारी खेळणी मध्ययुगात माहीत होती.

पण त्याचा उल्लेखच आढळतो. चित्र स्वरूपात काही सापडलं नाही.

हेलिकॉप्टरचा आराखडा म्हणा अथवा त्याच चित्र सापडलं ते पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात. लिओनार्दो दा व्हींची यांनी हेलिकॉप्टराची चित्रे काढली होती. त्याच्या चित्रात उड्डाण स्थिती प्राप्त करण्यासाठी स्पेरीकल हवा-स्क्रू वापरला होता.

या चित्रामधून प्रेरणा घेत बऱ्याच कार्यकर्त्यांनी हेलिकॉप्टर बनवायचा प्रयत्न केला. पण त्यात यश आलं ते लाउनॉय व बीन व्हेन्यू या दोन कारागिरांना. त्यांनी खेळण्यातील हेलिकॉप्टर फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सला सादर केले होते त्यासाठीचे मॉडेल पक्ष्यांच्या पिसांपासून बनविले होते. या खेळण्यामुळे फ्रान्समध्ये आल्फोन्स पेनोद यांनी १८७० मध्ये तयार केलेल्या हेलिकॉप्टराच्या अधिक यशस्वी प्रतिकृतीची आधीच निर्मिती केली होती.

यशस्वी हेलिकॉप्टराच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेल्या तत्त्वांची वैज्ञानिक मांडणी स्पष्टपणे करण्याचे काम सर जॉर्ज केली यांनी १८४३ मध्ये केले.

स्थिर पंख उड्डाणाचे जनक म्हणूनही त्यांचा अनेकांनी उल्लेख केला आहे. त्यानंतर अनेक संशोधकांनी आपल्या हेलिकॉप्टरा-संबंधीच्या कल्पना पूर्णपणे प्रतिकृती किंवा रेखाचित्र या रूपात मांडल्या. १९१२ मध्ये डॅनिश संशोधक याकोब एलहॅमर यांनी हेलिकॉप्टराच्या नियंत्रणविषयक समस्येविषयी महत्त्वाचे काम केले. १८ डिसेंबर १९२२ रोजी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील सैन्याच्या हवाई दलासाठी जॉर्ज द बोटझीट यांनी तयार केलेल्या हेलिकॉप्टराने २ मिनिटांहून कमीकाळ जमिनीवरून उड्डाण केले तर ४ मे १९२४ रोजी फ्रान्समध्ये एत्येन अमिचेन यांनी १ किमी. वर्तुळाकार अंतर हेलिकॉप्टरामधून पार केले. दरम्यान गायरोप्लेन आणि ऑटोगायरो यांविषयीचे अनेक प्रयोगही झाले आणि त्यांतून हेलिकॉप्टराविषयीच्या संशोधनाला मदत झाली.

हेलिकॉप्टराच्या विकासात १९३६ मध्ये जर्मनी अग्रभागी आला.

कारण जर्मनीत फोक आकगेलिस ६१ हेलिकॉप्टर तयार झाले. त्यालातीन १६० हॉर्सपॉवर अरीय एंजिनाने चालविले जाई. हे हेलिकॉप्टर ३,७५० मी. उंच उडाले आणि त्याने २३० किमी. उड्डाण केले. १९३८ साली जर्मन वैमानिका हाना रीत्श या जगातील पहिल्या हेलिकॉप्टर चालिका झाल्या. त्यांनी हे हेलिकॉप्टर बर्लिन शहरालगत उडविले होते. जर्मनीने आपली हेलिकॉप्टराविषयीची प्रगती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चालू ठेवली व फ्लेटनर कोलिब्रीया हेलिकॉप्टराचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन करणारा जर्मनी हा पहिला देश ठरला.

१९३९–४१ दरम्यान अमेरिकेत ईगॉर सिकॉर्स्की यांनी आपल्या तड-३०० या हेलिकॉप्टराच्या उड्डाण चाचण्यांची मालिका यशस्वीपणे पार पाडली. हे हेलिकॉप्टर लहान होते व ६५ अश्वशक्तीचे एंजिन त्यात बसविले होते. त्यात बहुतेक आधुनिक हेलिकॉप्टरांमधील वैशिष्ट्यपूर्ण घटकगुण होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर हेलिकॉप्टरांचा विविध क्षेत्रांतील व्यापारी उपयोग जलदपणे वाढत गेला. उदा., लढाया, पोलिसांची कामगिरी, पिकांवरील औषध फवारणी, डासांचे नियंत्रण, वैद्यकीय कारणांसाठी रुग्णांचे स्थलांतर करणे, तसेच टपाल व प्रवासी वाहतूक.

बेल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने ऑर्थर यंग यांच्या नेतृत्वाखाली बेल मॉडेल-४७ हे हेलिकॉप्टर बनविले. ते एक सर्वाधिक महत्त्वाचे हेलिकॉप्टर ठरले.

बाजारात आज अनेक प्रकारची हेलिकॉप्टरे उपलब्ध झाली आहेत. ही हेलिकॉप्टर अद्ययावत तर झालीच आहेत पण रिस्क ही वाढलीच आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.