कोण आहे हा हेल्मेट मॅन ऑफ इंडिया?

सध्या जग हे वेगाने पुढे चालाल आहे. त्यात माणूस पैसा कमवायला जीवाची पर्वा न करता रात्र-दिवस स्वतःला कामात झोकून देत आहे. कारण आयुष्यात सगळ काही पैशानेच हासील होऊ शकत असा माणसाचा  समज झाला आहे. पैशाशिवाय कसलं पान ही हलत नाही इथ.

प्रत्येक गोष्टीचा एक प्रवास आणि मार्ग असतो. मार्ग प्रत्येकाला मिळेलच असे नाही पण त्या मार्गाच्या प्रवासातून प्रत्येकजण जात असतो. २०१४ मध्ये दोन मित्र सोबत राहत होते. एक कायद्याचे शिक्षण घेत होता तर दुसरा इंजिनीयारिंगचे. एक सकाळ अशी आली की इंजिनीयारिंग करत असलेल्या मित्राचा रस्त्यावर अपघात झाला. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे जे कारण सांगितले त्याची रिस्क आपण आपल्या जीवनात रोज सहजपणे घेत असतो ते पण थोड्याशा पैशांसाठी. त्याच्या मृत्यूचे कारण होते, “हेल्मेट न घालणे”. जर हेल्मेट घातलेले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता आणि आई-वडिलांच्या वृद्धापकाळात त्यांचा आधार बनला असता. या सगळ्या दुर्घटनेचा साक्षी होता त्याचा कायद्याचे शिक्षण घेत असलेला मित्र. त्याला पण मोठा धक्का बसला होता. या कथेला खर वळण तेव्हा मिळाले जेव्हा या मित्राला बसलेल्या धक्क्याने अनेकांच्या मित्रांचे जीव वाचले आणि समाजात शिक्षण देण्याच्या कामात सुद्धा हातभार लागला. ते कसे शक्य झाले आणि सोबत “फ्री हेल्मेट” कसे मिळते ते जाणून घेऊ.

कोण आणि कसा बनला हेल्मेट मॅन ?

या सत्य कथेचे दोन पात्र आहेत. एक जो रस्ते अपघातात मृत्युमुखी पडला होता, त्याच नाव कृष्ण कुमार होत. तर हेल्मेट मॅनचे नाव राघवेंद्र कुमार आहे. जो बिहार मधील बगाढी गावचा राहणारा आहे. आपल्या मित्र्याच्या मृत्यूतून त्याने धडा घेतला. मृत्यूचे कारण कळल्यावर त्याने जीवनाला एक नव वळण दिल. २०१४ मध्ये मृत्यू झालेल्या मित्राच्या धक्क्यातून सावरत २०१५ मध्ये त्याने जीवनाची नवी सुरुवात केली. सुरुवात अशी होती की कुठल्याही आई-वडिलांचे एकुलते एक आपत्य कुठल्या दुर्घटनेचे शिकार होऊ नये, आणि हेल्मेट न घालणे हे त्याला कारण असू नये. म्हणून राघवेंद्रने हेल्मेट न घातलेल्या लोकांना मोफत हेल्मेट वाटणे सुरु केले. यासोबत त्याने एक काम आणखी केलं ते म्हणजे कृष्णाची जी पुस्तके पडून होती ती गरीब मुलाला देऊन टाकली.

मोफत हेल्मेट मिळत असल्याने लोक खुश व्हायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून राघवेंद्रच्या मनालाही हायस वाटायचं. पण त्यांना कमी जाणवायची, ते हेल्मेटची गरज आणि अनिवार्यता म्हणून हे अभियान चालवत होते मात्र त्यांच्या हिसोबाने ते पूर्ण होत नव्हत. मोफत हेल्मेट मिळाल म्हणून लोक खुश व्हायचे आणि ते घेऊन घरी चालले जायचे. पण यातून ती जागरूकता पसरत नव्हती राघवेंद्रन हवी होती.

अशात त्यांना एका स्त्रीचा फोन आला. ती स्त्री म्हणजे त्या मुलाची आई होती, ज्याला राघवेंद्रने पुस्तके दिली होती. त्या आईने त्यांना जे काही सांगितले त्याने त्यांचा आनंद दुगुनीत झाला आणि अभियान चालवण्याची नवी कल्पना मिळाली. त्या आईने सांगितले की, आपण माझ्या मुलाला जीपुस्त्के मोफत दिली होती त्याक्टून अभ्यास करून तो पूर्ण जिल्ह्यातून टॉप आला. हे ऐकून राघवेंद्रनना आनंद झाला आणि जागरूकता निर्माण करण्याचा नवा उपाय मिळाला.

त्यांनी विचार केला की, लोकांना मोफत हेल्मेट देण्याएवजी त्यांच्याकडून मुलांचे पुस्तके घ्यावी आणि त्याबदल्यात हेल्मेट द्यावे. याने एकसोबत दोन कामे होतील, लोकांना सुरक्षेसाठी हेल्मेट पण मिळेल आणि जागरूकता पण पसरेल. शिवाय त्या मुलांन पण शिकण्यात मदत होईल जे पैशाअभावी शिकू शकत नाही. आणि पुस्तके देऊन सगळी चांगली लोक त्यांच्या अभियानात भाग घेण्यास उस्तुकत होतील. बस तेव्हा पासून त्यांनी पुस्तके घेऊन हेल्मेट देणे सुरु केले.

आपल्यात एक म्हण पसिद्ध आहे, “काही मिळायला काही गमवावं लागतं” आणि प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. या म्हणीनुसार राघवेंद्र यांनी सुद्धा मोठी किंमत चुकवली आहे. या अभियानात त्यांनी कमवलेली सगळी कमाई लावलेली. स्वतःच होत ते सुद्धा विकून टाकल. मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपनीत जॉब होता तो ही सोडून दिला. आणि पूर्ण जीव ओतून अभियान चालवायला लागले.

सुरुवातीला त्यांच्या घरच्यांनी सुद्धा त्यांना पूर्ण साथ दिली नव्हती. त्याचं म्हणन होत, आजच्या मतलबी युगात कुणी इतक करत का ? घर विकल, नोकरी सोडली वैगेरे वैगेरे. हे प्रश्न मित्रांसोबत सगळ्यांकडून ऐकावे लागले. पण आता लोकांमध्ये होत असलेली जागरूकता आणि लहान मुलांचा आनंद बघून घरचे त्यांना सपोर्ट करायला लागले.

राघवेंद्र एका अडीच वर्षाच्या मुलीचे वडील आहेत. त्यांचे हे अभियान आतापर्यंत देशातील ९ राज्यात पोहचले आहे. ज्यात  बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. गेल्या ५ वर्षात जवळपास २०,००० हेल्मेट आणि दीड लाख पुस्तके या अभियानातून वाटली गेली आहेत.

ज्यामाध्यमातून हेल्मेट मॅन गरीब आणि गरजू मुलांना पुस्तके वाटतात ती ११ बुक बँक. या बुक बँकचे वैशिट्य म्हणजे, तुमची जुनी पुस्तके एका बॉक्स मध्ये टाकायची आणि तिथे तुमच्या गरजेची जी पुस्तक असतील ती घेऊन जायची. जेव्हा तो बॉक्स भरून जातो तेव्हा त्यात जमा झालेली पुस्तके गरजूंना मोफत द्देऊन दिली जातात. राघवेंद्र सगळ्यांना या बुक बँकशी जुडण्याचे आवाहन करतात.

आपली जुनी पुस्तके घेऊन या आणि नवीन हेल्मेट घेऊन जा.

राघवेंद्रच्या या अभियानाला आता ५ वर्षे पूर्ण होत आली आहेत तरी पण अजून ते देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले नाही. त्यासाठी प्रत्येक राज्यातील सरकारने हे अभियान आपल्या राज्यात चालू करण्यासाठी मदत राशी द्यावी. ज्याने देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या तर घटेलच शिवाय गरीब घरातील मुलांना चांगले शिक्षण मिळण्यास देखील मदत होईल.

भारताचा हा हेल्मेट मॅन एक लिस्ट तयार करत आहेत. ज्यात पुस्तके देणाऱ्या घेणाऱ्यांची नावे आहेत. ती लिस्ट तयार करण्यामागचे कारण त्यांनी सांगितले की, जर यातील एखाद मुल पुढे चालून यश प्राप्त करतो आणि तो आयआयटी साठी क्वालिफाय होतो तर आम्ही त्याच्यासाठी राज्य सरकारकडे शिफारस करू की, त्याची फीस सरकारने द्यावी आणि अशा अजून ११ मुलांना शिक्षणात मदत करावी.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.