आसाममध्ये हेमंत बिस्वा, कर्नाटकात बोमाई आणि महाराष्ट्रात शिंदे अमित शहांचा पॅटर्न ठरेलला आहे

महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय घडामोडींनी कळस घातलाय. अब्बास- मस्तान लाजतील असे ट्विस्ट रोज येतायेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असं म्हणताना देखील काही चुकत तर नाही का असं वाटतंय.

लास्टपर्यंत फडणवीस असंच सगळ्यांना वाटत होतं. स्वतः फडणवीस त्या अविर्भावात होते. मात्र ऐन टायमाला गेम पालटला आणि फडणवीस यांना सत्तेत सामील होऊन उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं.

दिल्लीतील नेतृत्वाकडून फडणवीस यांचा गेम झाल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. 

या दिल्लीच्या नेतृत्वाकडून फडणवीस यांचे पंख छाटण्यात आले या शंकेला अजूनच बळ मिळतं जेव्हा एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडाचा घटनाक्रम उलगडत जातो. राज्यसभेच्या आणि  विधानपरिषेदेच्या  निवडणुका अगदी घासून झाल्या. अगदी दुसऱ्या क्रमांकाच्या मतांच्या कोटा आणि विरोधी पक्षाची काही मतं फोडून फडणवीसांनी दोन्ही निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आले. 

जर एकनाथ शिंदे एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी करणार असं फडणवीसांना माहित असतं तर त्यांनी एवढी मेहनत केली नसती. 

विशेषतः संजय राऊतांसारखे उमेदवार विजयी होऊन दिले नसते. त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदार सुरतला पोहचले तेव्हा शिंदे गुजरात भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात होते अशा बातम्या आल्या होत्या. सुरवातीला भाजपच्या राज्यातील नेतृत्वालाही या बंडाची कोणतीही भनक नव्हती. त्यानंतर मग या आमदारांना आसामच्या गुवाहाटीला हलवण्यात आलं. 

गुजरात भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आसामचे मुखमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे अमित शहा यांचे विश्वासू मानले जातात. 

त्यामुळे या संपूर्ण बंडात त्यांना महत्वपूर्ण जबाबदारी दिली असल्याचं  सांगितलं जातं. मग पार गुवाहाटीला आमदार गेल्यानंतर  फडणवीस आणि राज्यातील भाजप नेतृत्व यावर प्रतिक्रिया देऊ लागले. अगदी सरकार स्थापना करताना फडणवीस ऍक्टीव्ह मोडमध्ये होते मात्र त्याचवेळी लास्टपर्यंत ते मुख्यमंत्री राहणार की नाही त्यानं सांगण्यात आलं आणि शेवटी मग त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा पक्षादेश देण्यात आला.

हा असा सगळा घटनाक्रम बघितला तर फडणवीस यांना डावलल्याची शंका टाळता येत नाही.

त्याचवेळी एकनाथ शिंदे यांची निवड भाजपच्या मागच्या काही राज्यांच्या मुख्यमंत्रीपद निवडण्याच्या रांगेत एकदम परफेक्ट बसते.

विशेषतः मूळ भाजपचे नसलेले आसामचे हेमंत बिस्वा सर्मा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमइ यांच्या उदाहरणावरून कळून येतं.

हेमंत बिस्वा सर्मा

हेमंत बिस्वा सर्मा मूळचे काँग्रेसचे. एकेकाळी काँग्रेसचे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांचे राइट हॅन्ड म्ह्णून ओळखले जात होते. तरुण गोगई यांच्यानंतर हेमंत बिस्वा सर्मा हेच मुख्यामंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र तरुण गोगई यांच्या मुलाच्या म्हणजेच गौरव गोगई यांच्या एंट्रीनंतर मात्र त्यांचा नंबर मग मागे पडू लागला. आणि त्यांनी भाजपात उडी मारली.

आता हा झाला त्यांचा इतिहास. सध्या आपल्या कामाचा मुद्दा आहे तो म्हणजे भाजपात आल्यानंतर अवघ्या ६ वर्षात त्यांना त्यांना आसामसारख्या राज्याचा मुख्यमंत्री का करण्यात आलं. 

विशेषतः सर्बादानंद सोनोवाल या सीटिंग मुख्यमंत्र्यांना डावलून भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं. 

याच सर्वात पाहिलं कारण सापडतं ते म्हणजे बिस्वा यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव. भाजपमध्ये येण्याच्या आधी हेमंत बिस्वा यांनी आसाम गण परिषदेचे (एजीपी) प्रफुल्ल कुमार महंता आणि काँग्रेसचे हितेश्वर सैकिया आणि तरुण गोगोई या आसामच्या तीन मुख्यमंत्र्यांबरोबर जवळून काम केलं होतं. 

पण नुसत्या अनुभवाचा प्रश्न नव्हता. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यावेळी भाजपचे पक्षाध्यक्ष असलेल्या अमित शहांचा प्रत्येक निर्णय सर-आँखोपार म्हणत त्यांनि सांगितलेली प्रत्येक कामगिरी फत्ते करून दाखवली होती. 

सेक्युलर काँग्रेसमध्ये आपली राजकीय हयात घालवलले बिस्वा या काळात हार्ड कोअर हिंदुत्ववादी बनले. 

नव्याने आल्याने त्यांचे भाजपातील नेत्यांबरोबर एवढे जवळचे  संबंधसुद्धा नव्हते. त्यात आरएसएसच्या मुशीतले नसल्याने नागपूरवरून ऑर्डर घेण्याचा प्रश्नच नव्हता.

 यामुळेच मोदी-शाह यांच्या नेतृत्वाला एक परफेक्ट पॉईंट मॅन किंवा येस मॅन शर्मा यांच्यात दिसला आणि इतर नेत्यांना डावलत शहा यांनी हेमंत बिस्वा शर्मा यांना मुख्यमंत्रीपदी  बसवलं. त्यात  बिस्वा यांनी स्वीकारलेल्या कट्टर हिंदुत्वाच्या धोरणामुळे भाजपातील जुन्या नेत्यांना आणि  आरएसएसलाही मोदी-शाह हेमंत बिस्वा शर्मा यांच्या मुख्यमंत्री निवडण्याच्या निर्णयाला प्रश्नचिन्हा लावता आलं नाही.

असाच प्रयोग मग झाला कर्नाटकात.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

२०१८ मध्ये कर्नाटकात विधासभेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. मात्र मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना सरकार काय बनवता आलं नाही. त्यामुळे मग भाजपचं सरकार आणण्यासाठी येडियुरप्पा यांनी जेडीएस आणि काँग्रेस सरकारला जंग जंग पछाडायला सुरवात केली. अखेर येडियुरप्पा यांचे प्रयत्न यशस्वी झाले. जेडीएस आणि काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर हे सरकार पडलं. आता येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी बसणार हे फिक्स असल्याचं बोललं गेलं. 

मात्र त्यातही महाराष्ट्रासारखाच एक धक्कादायक निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं दिला तो म्हणजे येडियुरप्पा यांना डावलून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री करणं. 

बसवराज बोम्मई आधी जनता दलात होते. त्यांचे वडील एसआर बोम्मई यांनीही कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. 1998 आणि 2004 मध्ये ते धारवाड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. बोम्मई यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी  एचडी देवेगौडा आणि रामकृष्ण हेगडे यांसारख्या मोठ्या नेत्यांसोबत काम केले होते. बसवराज एस बोम्मई हे लिंगायत समाजातील आहेत.

बसवराज बोम्मई यांनी 2008 मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

म्हणजे पुन्हा अनुभव,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध नाही,  पक्षात नवीन आणि पक्षातील स्थापित नेतृत्व नाही त्यामुळं स्वतःचा माणूस म्हणून तयार करता येणं शक्य हे शाह-मोदी नेतृत्वाला मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वात पाहिजे होते तेच मुद्दे.

त्याचबरोबर यामुळं केंद्रीय नेतृत्वाला प्रश्न करण्याची क्षमाता असणारे येडियुरप्पा यांना देखील शांत करता येणार होतं. त्यामुळं मग भाजपाबाहेरून आलेल्या बसवराज एस बोम्मई यांना संधी मिळाली. त्यात लिंगायत समाजातून येणं हा त्यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरला.

 बसवराज एस बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात कर्नाटकात झालेल्या  हिजाब वाद, टिपू सुलतान जयंतीवरून वाद, पुस्तकात करण्यात आलेले बदल त्यांच्या हिंदुत्वाबद्दलच्या भूमिकेबद्दल देखील बरंच सांगून जातात. 

आणि मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

आणि हेच सगळ्या निकष पूर्ण एकनाथ शिंदे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा  वारसा सांगणारं हिंदुत्ववादी नेतृत्व एकनाथ शिंदेची जमेची बाजू. आपली हिंदुत्ववादी नेत्याची ओळख स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांनी धर्मवीर सिनेमा काढला असं ही सांगण्यात येतं.

भाजपात प्रवेश नाहीये मात्र शिवसेनेत त्यांना पक्ष नेतृत्वाच्या आदेशाला प्रश्न नं करता काम करण्याचा अनुभव आहे. त्यात राजकारणात काम करण्याचा मोठा अनुभव. पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध नाहीये पण कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून काम करण्याची पूर्ण क्षमता. यामुळं दिवसेंदिवस मोठं होत चाललेल्या फडनवीसांना परपेक्ट चेकमेट करता येत होतं. बाकी महाराष्ट्रत डॉमिनंट असलेली मराठा कास्ट हा प्लस पॉईंट. 

त्यामुळं एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष घेऊन आले किंवा नुसते आमदार जरी घेऊन आले तरी त्यांना मोदी-शहा नेतृत्वाकडून बळ दिलं जाईल कारण एकनाथ शिंदे मोदी-शहा नेतृत्व निवडण्याचे सर्व निकष परफेक्ट पूर्ण करतात. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.