फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या कंपन्या 70 ते 80 % डिस्काउंट देवूनही फायदा काढतात ते यामुळे

एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या वेब साईटवर सेल सुरु आहेत का हे अगोदर पाहिलं जातं. आपण एखादी वस्तू खूप दिवसापासून पाहत असतो. पण ती खरेदी करणे आपल्या बजेटमध्ये बसत नसते.

ती आता आपल्याला परवडेल त्या किंमती उपलब्ध होतो. त्याला सेल म्हणतात.

या ई-कॉमर्स कंपन्यांना ७० ते ८० टक्के ऑफ देतात.

एक वस्तू खरेदी केली तर दुसरी वस्तू त्यावर फ्री दिली जाते. कुठलीही कंपनी नुकसान करून तर बिझनेस करणार नाहीत. मग प्रश्न पडतो की, या कंपन्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देणं कसं परवडत असेल. डिस्काउंट देण्यामागे कुठले कारणं आहेत. 

फ्लिपकार्टच्या वतीने बिग बिलियन डे आणि तर अमेझॉन तर्फे ग्रेट इंडियन फेस्टिवल, मिंत्रा मॅड नेस सेल असे नाव देऊन डिस्काऊंट दिला जातो. मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही, इलेक्ट्रिक वस्तू, कपडे, शूज सारख्या वस्तूंवर जास्त डिस्काऊंट दिला जातो.    

१) ग्राहकांना ऑनलाईन खरेदीची सवय लागावी   

नवीन खरेदीदारांनी एकदा तरी ईकॉमर्सच्या वेबसाईट वरून वस्तू खरेदी करावी. त्यानंतर हा ग्राहक दुकानातून खरेदी करण्याऐवजी ईकॉमर्स कंपनीच्या वेबसाईट खरेदी करेल. म्हणजे त्याला ऑनलाईन खरेदीची सवय लागावी. याचा परिणाम दुकानदारांवर होते. त्याचा ठरलेला ग्राहक खरेदीसाठी येत नाही. 

ईकॉमर्स कंपन्या एवढा डिस्काऊंट दुकानदार देऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करावी म्हणून डिस्काऊंट दिला जातो. इतका डिस्काउंट दिल्यावर ईकॉमर्स कंपन्यांना सुरुवातीला नुकसान होते. मात्र, एकदाच अधिक वस्तू विकल्याने कंपन्यांना नफा होत असतो. त्यातून हे नुकसान भरून काढले जाते. 

२) स्टॉक क्लिअरन्स

ईकॉमर्स कंपन्यांचे सेल हे प्रत्येक वर्षाच्या  सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात लावण्यात येतात. या विक्रीला स्टॉक क्लिअरन्स सेल सुद्धा म्हटलं जात. या सेल मध्ये जुन्या वस्तू डिस्काऊंट दिला जातो. यात जास्त दिवसांपासून पडून राहिलेला वस्तू सेल मध्ये विकल्या जाव्यात असा हेतू कंपन्यांच्या असतो. 

उदाहरणं म्हणून पाहायचं गेलं तर वन प्लस कंपनी वर्षातून दोन वेळा आपला फोन लॉन्च करतात. ६ महिन्यापूर्वी लॉन्च केलेला फोन आता जुना झाला असतो. ईकॉमर्स कंपन्या जुने फोन बल्क मध्ये खरेदी करतात आणि सेल दरम्यान फोनवर अधिक डिस्काउंट देतात.  याच प्रकारे इतर वस्तूंवर सुद्धा ईकॉमर्स कंपन्या मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देतात. नवीन लॉन्च होणाऱ्या वस्तूवर डिस्काऊंट मिळत नाही. 

३) स्टोर नसल्याने त्याच्या संदर्भातील खर्च वाचतो

ईकॉमर्स कंपन्या या नॉर्मल दुकानांसारख्याच असतात. लोक येतात सामान खरेदी करून जातात. मात्र, दुकान आणि ईकॉमर्स कंपन्यात एक फरक असतो. तो म्हणजे ईकॉमर्स कंपन्यांचं एकही फिजिकल स्टोर नाही. त्यांचे वेअर हाऊस असतात. येथून त्या वस्तू ग्राहकांना पुरविण्यात येतात.

रेंट, कामगार, फर्निचर, लाईटबील ही भानगड ईकॉमर्स कंपन्यांच्या मागे नसते त्यामुळे त्यांची लाखोंची बचत होत. तसेच ईकॉमर्स कंपन्या वस्तूंची खरेदी ही बल्क मध्ये करते. त्यांना इतरांपेक्षा ती वस्तू स्वस्त मिळते. त्यामुळे सेल मध्ये डिस्काउंट द्यायला या वस्तू परवडतात.

तसेच ज्या रिटेलर, कंपन्यांच्या वस्तू या ईकॉमर्स कंपन्या त्यांच्या प्लँटफॉर्मच्या माध्यमातून विकत असतात त्यासाठी काही प्रमाणात कमिशन घेते. मात्र ज्यावेळी डिस्काउंट आणि सेल असतो त्यावेळी ते कमिशन कमी घेत असते. 

४) माहित नसणाऱ्या कंपन्यांच्या वस्तूवर ७० ते ९० टक्के सूट

ज्या वस्तूंवर ७० ते ८० टक्के सूट मिळणाऱ्या वस्तू एकतर जुन्या असतात किंवा कुठल्याही मोठ्या ब्रँड कंपनीच्या नसतात. या कंपन्या लिस्टिंग मध्ये आपल्या वस्तूची किंमत अधिक दाखवतात. सेल मध्ये त्या वस्तूची किंमत केल्याचे दाखवून ती विकते. 

५) डिस्काऊंट असेल तर खरेदी करण्याची संख्या अधिक 

एका अहवालानुसार ५९ टक्के ग्राहक ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वी डिस्काउंट आहे का हे चेक करत असतात. तसेच ६४ टक्के ग्राहक डिस्काउंट मिळत नाही तो पर्यंत वस्तूच खरेदीच करत नाहीत. सलग दोन- तीन सुट्ट्या जोडून आल्या की ईकॉमर्स कंपन्या सेल सुरु करतात. 

सध्या बाहेर दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ईकॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून शॉपिंग खरेदी करण्याकडे सगळ्यांचा कल आहे. त्यांचे मुख्य कारण म्हणजे दुकान पेक्षा ईकॉमर्स कंपन्यां कडून वस्तूवर मिळणारी सूट. त्यामुळे आता गावाकडील लोक सुद्धा ऑनलाईन खरेदी करत आहेत. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.