पंचायत 2 ते मिर्झापूर 3 : येत्या काळात हे “सिक्वेल” राडा करायला तयार आहेत..

कुठलाही शो किंवा पिक्चर गाजला की कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि प्रेक्षक सगळेच त्याच्या सिक्वेलसाठी उत्सुक होतात. पण इतिहास काय सांगतो तर, कुठल्याही पिक्चर किंवा शोचा ‘सिक्वेल’ असतो ‘गंडेश कार्यक्रम’.

लोकांना दूसरं आलेलं काय पचवता येत नाही, पण आपण आशाही सोडत नाही. आपण पार्ट 2 आलाय पार्ट 3 आलाय असं म्हणत, नाचत थेटराट जाऊन येतो.

आता तर काय थेटर पण लांब. हल्ली दुनियाभरच्या गोष्टी आपल्याला एका बटणापर्यंत घेऊन आल्यायत.. लॅपटॉप उघडून एक बटन दाबायचा अवकाश. नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइमला सुट्टी नसतेय. Netflix वर नाही म्हणायला इंग्लिशचं कौतुक जास्तय पण Amazon Prime कसं आपलं वाटतं. सगळी मंडळी शिव्या हासडून हासडून लईच वोकल होत असतात.

असो. तर मुद्दा आहे Amazon Prime वर येऊ घातलेल्या सिरिजच्या सिक्वेल्सचा. आता आपल्या आवडत्या बऱ्याच सिरिजचे ‘भाग २ आणि भाग ३’ येऊ घातलेत. ते चालणार का पडणार हा नंतरचा विषय. पण येऊ घातलेत हे खरं.. आम्हाला कळलं तसं म्हणलं तुम्हाला पण सांगावं.

तेवढीच समाज सेवा, नाही का… 

आता पहिलं सांगायचं म्हणजे पंचायत सिरीजचा सीझन 2 येतोय.

 

Panchayat Season 3 Release Date 800x600 1

महात्मा गांधींचं एक वाक्य आहे, ‘The soul of india lives in, its villages’ 

या वाक्याला साजेशी अशीच ही सिरिज आहे. सिरिजमधल्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आपल्याला नवीन आणि रिलेट होणारं असं सारखं काहीतरी सापडत रहातं. 

एका वाक्यात स्टोरीलाइन सांगायची झाली, तर एक अभिषेक नावाचा, इंजिनियर असूनही जॉबलेस मुलगा, गावाकडे एका पंचायतीत नोकरी करायला लागतो आणि त्याची पंचाईत होते.

तिथे त्याला येणारे अनुभव आणि प्रसंग असले रंगवलेत की तुम्ही सिरिज एकदाका बघायला घेतलीत की लगेच सोडत नसताय. सीझन 2 सुद्धा सीझन 1 प्रमाणेच साधारण सेम स्टोरीलाइन भोवती फिरतोय. ह्या कॉमेडी ड्रामाचा सीझन 2, रिलिझ होणारे ह्या महिन्याच्या २० तारखेला म्हणजेच २० मे २०२२ रोजी. 

दुसरा आहे मिर्झापुरचा सीझन 3

mirzapur season 3 heres what we know 2

मिर्झापुर या सिरीजने, भारतात Amazon Prime चीच लोकप्रियता वाढवली असं म्हटलं तरी अतिशयोक्ति होणार नाही आणि मिर्झापूर ही सिरिज, ‘भारतीय कंटेटमध्ये किती दम असू शकतो’ हे दाखवून देते.

गुड्डूभैय्या मुन्नाभैय्या कालीनभैय्या यांनी तर या सिरिजभर अगदी राडाच घातलाय, हे काय वेगळं सांगायला नको. हि सिरीज म्हणजे सस्पेन्स थ्रिलर सिरीजचं तडकतं फडकतं उदाहरण आहे.

ह्या सिरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फेझल, श्वेता त्रिपाठी शर्मा, विजय वर्मा, हर्षीता गौर अशा खुंखार लोकांची कामं आहेत. मिर्झापुरचे ऑलरेडी दोन सीझन येऊन गेलेत. पहिला सीझन साहजिकच तुफ्फान गाजला, दूसरा सीझन कोणाला भावला तर कोणाला वाटलं गंडला आणि आता आलाय सीझन 3.

तिसरा सीझन ह्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात रिलीझ होण्याची शक्यता आहे पण एक्सट डेट अजून तरी निश्चित झालेली नाही.

लिस्टमधला तिसरा आहे पाताल लोकचा सीझन 2

maxresdefault 1

एक इंस्पेक्टर, त्याचं इन्वेस्टिगेशन आणि या सगळ्या दरम्यानचा त्याचा प्रवास. पाताल लोक म्हणजे एक फूलफ्लेज्ड थ्रीलर ड्रामा.

ह्या सिरिजमध्ये जयदीप अहलावत, ईश्वक सिंग, अभिषेक बॅनर्जी अशा खतरनाक लोकांनी कामं केलीयेत. पहिला सीझन तर लोकांनी एका बैठकीत संपवला होता. आणि आता दूसरा सीझन काय कमाल करतो ते पाहावं लागेल. 

पाताल लोक सिरिजचा पहिला सीझन ऐन लॉकडाउन मध्ये म्हणजे 15 मे 2020 ला आलेला. तर दूसरा सीझन नक्की कधी रिलीज होणारे ह्याची फिक्स डेट अजून तरी आलेली नाही पण मुहूर्त ह्याच वर्षी लागतोय हे फिक्स.

चौथा द फॅमिली मॅनचा सीझन 3 येतोय.

The Family Man 3

एकीकडे ‘मिडल क्लास गाय’ तर दुसरीकडे ‘वर्ल्ड क्लास स्पाय’. ही आहे एका सर्वसामान्य माणसाची असामान्य गोष्ट. या गोष्टीत श्रीकांत तिवारी नावाच्या एका मिडल क्लास माणसाची, जॉब आणि घर दोन्ही सांभाळताना उडणारी तारांबळ लय भारी दाखवण्यात आलीये. 

सिरिजमध्ये मनोज वाजपई, प्रियामणी, समंथा, शरद केळकर, शरीब हश्मी अशा भन्नाट लोकांनी कामं केलीयेत 

द फॅमिली मॅनने दोन्ही सिरिज गाजवल्या आणि आता तिसरी सिरिज पण गाजणार असल्याचं सांगितलं जातंय. तिसरा सीझन ३ जून २०२२ ला रिलीझ होणारे असं बोललं जातंय पण ओफिशीयल डेट अजून यायची आहे. 

आणि आता ह्या लिस्ट मधलं शेवटचं नाव आहे ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ आणि ह्या सिरिजचा सीझन 3 येतोय.

7

ही आहे मज्जानी लाईफ जगणाऱ्या चार मैत्रिणींची गोष्ट. ह्या सिरिजने सुद्धा Amazon Prime वर हवा केली. हि सिरीज पाहताना ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरच्या भाषेवर नसलेल्या बंधनांचा ह्या बायकांनी पुरेपूर वापर करून घेतलाय असा फील येतो.  शिवाय हि सिरीज बघताना तुम्हाला मुंबईच्या नाईट लाईफचाही थोडाफार अंदाज येऊन जातो.

ह्या सिरीजमध्ये सयानी गुप्ता, बानी जे, कीर्ती कुल्हारी, मानवी गगरू ह्या चौघी मेन रोल मध्ये आहेत. 

सिरीजचा तिसरा सिझन खरं ह्या वर्षीच्या एप्रिल मध्ये रिलीज होणार होता पण कोव्हिड आणि लॉकडाऊनमुळे सिझन रिलीज होऊ शकला नाही. पण तो या वर्षीच होणार आहे अशी खात्री वर्तवली जातेय.

तर ह्या आहेत Amazon Prime वरच्या पाच सिरिज ज्यांचे सीक्वेल्स आता या वर्षात येणारेत. तेव्हा तुमची Amazon Prime ची सोय आत्ताच करून ठेवा. आणि सिरिज पाहायला अजून सुरवात केली नसेल तर आधीचे सीझन झट झट बघून घ्या. 

हे ही वाच भिडू:

1 Comment
  1. Marathibana says

    Very nice

Leave A Reply

Your email address will not be published.