इकडे बाप-लेक सायकलसाठी भांडत होते तिकडे दुसरा मुलगा लॅम्बोर्गिनी घेऊन फिरत होता

उत्तरप्रदेश हे देशातील सर्वात मोठ राज्य असून त्यावर ज्याची सत्ता त्याच पक्षाची देशात सत्ता राहते अस सांगितलं जात. योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव , मायावती यांच्यासह २१ जणांनी या राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविला आहे. 

 उत्तरप्रदेशमध्ये सलग दोन वेळा कोणीच मुख्यमंत्री झाले नाही

२०१२ मध्ये अवघ्या ३८ व्या वर्षी अखिलेश यादव उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. मायावती यांचा पराभव करून ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. आता पर्यंत उत्तरप्रदेश मध्ये सलग दोन वेळा कोणीच मुख्यमंत्री झाले नाही. तोच किस्सा अखिलेश यादव यांच्यासोबत घडला होता. 

 २०१७ मध्ये अखिलेश यादव यांच्या हातून उत्तरप्रदेशची सत्ता गेली आणि त्यांच्या मागे शुक्लकाष्ट सुरु झालं होते. समाजवादी पक्षात दोन गट पडले होते. एक गट होते मुलायमसिंग यादव यांचा तर दुसरा गट होता अखिलेश यादव यांच्या.

हा वाद विधानसभेच्या ऐन निवडणुकीवेळी सुरु झाला होता. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी हा वाद समोर आल्याने समाजवादी पक्ष कोण चावतोय असा प्रश्न पक्षातील इतर नेते आणि कार्यकर्ते विचारू लागले होते. 

त्यापूर्वी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी एक राष्ट्रीय अधिवेशन बोलावून उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आल्याची घोषणा केली होती. तर मुलायमसिंह यादव यांना पक्षाच्या मार्गदर्शकपदी नियुक्त करण्यात आलं होत.

यानंतर मुलायमसिंग यादव यांनी हा निर्णय आपल्याला अमान्य असल्याचे सांगितले होते. तसेच आपणचं समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून ‘सायकल’ हे निवडणूक चिन्ह  आपल्याजवळ राहायला हवं, असा दावा केला होता.

त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला होता. निवडणूक आयोगाने समाजवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह अखिलेश यादव यांना दिल. अखिलेश यादव यांना २०० आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले होते.

इकडे हा सगळा वाद सुरु होता. समाजवादी पक्षाचं चिन्ह असणाऱ्या सायकल वरून मोठा राडा सुरु होता. बाप लेकात मोठी दरार निर्माण झाली होती. मात्र दुसरीकडे मुलामसिंह यादव यांचा दुसरा मुलगा ५ कोटीची लॅम्बोर्गिनी घेऊनं फिरत. त्यावेळी सगळ्या माध्यमांचे लक्ष याकडे लागले होते.

यापूर्वी एक गोष्ट माहिती करून घेणे गरजेची आहे. ते म्हणजे मुलामसिंह यादव यांनी दोन लग्न केले होते. पहिल्या पत्नी पासून अखिलेश आणि दुसऱ्या पत्नी पासून प्रतीक अशी दोन मुले आहेत. प्रतीक हा दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा. तो कधीही राजकारणात नव्हता.

आताच सांगायचं झालं तर प्रतीक याच्या बायकोने म्हणजेच अपर्णा यादवने भाजप मध्ये प्रवेश केला असून ती निवडणूक सुद्धा लढविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर २०१७ मध्ये झालेल्या निवडणूक चिन्हाच्या वादावेळी यादव परिवारात मोठ्या प्रमाणात वाद सुरु होता. उत्तरप्रदेशच्या निवडणूका तोंडावर आल्या होत्या. त्यामुळे या वादाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले होते.अखिलेश यादव हे सायकल मिळवण्यासाठी धडपडत आहे, तर मुलायम सिंह यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव करोडोंची स्पोर्ट्स कार चालवत आहे. या लॅम्बोर्गिनी कारची किंमत सुमारे ५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत होते.

दरम्यान, प्रतीक यादव हे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या घरासमोरूनही हि कार गेले होते. प्रतीक यादव स्पोर्ट्स कार चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांना निवडणुकीत समाजवादी पक्षाला चांगलेच घेरले होते. 

तसेच प्रतीक यादव याने कार आणि आपल्या कुत्र्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लिहले होते,  “मी, ब्राउनी आणि ब्लू बोल्ट चिलीन’ असे लिहले होते. त्यानंतर त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. 

आता मात्र याच प्रतिक यादव याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आपले सासरे मुलायमसिंग यादव यांचे आशीर्वाद घेतले होते. तो फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. असे असले तरीही प्रतिक यादव हे अजूनही राजकारणापासून लांब आहेत.

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.