RAW ने भारताच्याच विमानाचं अपहरण करुन ते पाकिस्तानच्या हवाली केलं होतं.
हा किस्सा १९७१ सालचा. तेव्हा राजीव गांधी वैमानिक होते. ३० जानेवारी १९७१ सालची ती सकाळ होती. जम्मू वरुन श्रीनगरच्या दिशेने जाण्यासाठी फॉकर फ्रेंडशीप अर्थात गंगा नावाच्या विमानाने उड्डाण केलं. विमानाने अपेक्षीत उंची गाठताच वैमानिकांच्या केबिनमध्ये १९ वर्षांचा एक तरुण आला. वैमानिकाच्या डोक्यावर त्याने बंदूक ठेवली आणि विमान लाहोरच्या दिशेने घेवून जाण्यास सांगितलं. हमिद कुरेशी अस त्याचं नाव. त्याचा भाऊ अशरफ कुरेशी यांच्यासह त्याने विमानचं अपहरण केलं.
वैमानिकासहीत विमानामध्ये २७ प्रवासी होते. त्यांच्या जीवाला धोका होताच पण त्याहून अधिक धक्कादायक गोष्ट हि होती की,
ते विमान चालवत होते स्वत: राजीव गांधी ?
भारतीय विमानाच अपहरण करण्यात आलं होतं. ते विमान लाहोरच्या दिशेनं चाललं होतं पण विमान खुद्द राजीव गांधी चालवत होते. पण भारताची गुप्तचर यंत्रणा मात्र शांत होती. त्याला कारण देखील तसच होतं.
२ जानेवारी १९७१ रोजी अल फतह नावाच्या आंतकवादी संघटनेशी निगडीत असणाऱ्या काही आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती. या आंतकवाद्यांची चौकशी केल्यानंतर पाकिस्तानात कट रचला जात असल्याची टिप देण्यात आली. या टिपच्या आधारावर माहिती काढून घेण्याची जबाबदारी हामिद कुरेशी या मुलाला देण्यात आली. हामिद कुरेशी चौकशी करत असतानाच पाकिस्तानची गुप्तचर संघटनेना ISI ने त्याला ताब्यात घेतलं. रॉ साठी काम करत असल्याचं त्या 16 वर्षीय युवकाने कबुल केलं. तात्काळ ISI ने त्याला भारताचं विमान जे खुद्द राजीव गांधी चालवणार आहेत ते अपहरण करुन आणण्याची जबाबदारी सोपवली.
- पाकिस्तानी अधिकाऱ्यांमुळे अपहरण करण्यात आलेल्या ६६ भारतीयांचा जीव वाचला होता !!!
- भारतासाठी लढलेली दहशतवादी संघटना.
- पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकणार होता.. पण ?
काही दिवसातच हामिद कुरेशी भारतात पोहचलां. जम्मू वरुन श्रीनगरला जाणारं विमान राजीव गांधी चालवणार असल्याची माहिती त्याला मिळाली. हामिद कुरेशी रॉ चा एजेंट म्हणूनच काम करत असल्याने त्याच्या हालचालींवर रॉ च्या अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला. हामिद कुरेशी याला रॉच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं तेव्हा ISI च्या अधिकाऱ्यांनी त्याला दिलेल्या ऑपरेशनच्या जबाबदारीची इत्यंभूत माहिती त्याने रॉ च्या अधिकाऱ्यांना दिली.
ऑपरेशनचा दिवस उजाडला. दिनांक ३० जानेवारी १९७१ ला एअर इंडियाच्या विमानाचं अपहरण करण्यात आलं. ठरल्याप्रमाणे ते विमान लाहोरच्या विमानतळावर उतरवण्यात आलं. मात्र या विमानात न राजीव गांधी होते न की साधारण प्रवासी. हामिद कुरेशीच्या हातात असणारी बंदुक देखील खोटी असल्याचं पुढे स्पष्ट झालं.
मात्र या घटनेचा फायदा घेवून भारताने तात्काळ पाकिस्तानसाठी आपलं हवाई क्षेत्र प्रतिबंधित केलं. पुर्व पाकिस्तानात पश्चिम पाकिस्तानात जाण्यासाठी आत्ता पाकिस्तानी विमानांना कोलंबो वरुन जावं लागलं.
कालांतराने त्या वैमानिकासह प्रवाशांना सोडून देणं पाकिस्तानला भाग पडलं. वर्षांच्या शेवटी बांग्लादेशचा जन्म झाला. अनेकांच्या मते रॉ नेच आपल्या एजेंटकरुन विमान अपहरण घडवून आणलं होतं. त्याचं कारण म्हणजे बांग्लादेश युद्धापुर्वी भारताला पाकिस्तानची शक्य तितकी नाकेबंदी करायची होती. काहींच्या मते पाकिस्तानने राजीव गांधी यांच्या अपहरणाचा कट केला होता तो त्यांच्यावरतीच उधळण्यात भारत यशस्वी झाला होता. नेमकं काय होतं त्याच स्पष्टीकरण न भारत देवू शकत होता की पाकिस्तान !
या घटनेचं वर्णन रॉ चे वरिष्ठ अधिकारी आर के यादव यांनी मिशन R&AW या पुस्तकात केले आहे.