Mosque Man ऑफ इंडिया म्हंटले जाणारे गोविंद गोपालकृष्णन म्हणजे एक सुपरमॅनच ओ !

लहानपणी आणि मोठे झाल्यावर आपण हॉलीवुड च्या फिल्म्स मध्ये अनेक सुपरहिरो पहिले आहेत. हातातून जाळे सोडणारा स्पायडरमॅन, उंच आकाशात उडणारा, व्हिलनला उडू उडू मारणार बॅटमॅन आणि पॅन्टवर लाल चड्डी घालणार सुपरमॅन, त्यात अव्हेंजर्सची बातच वेगळी आहे. इथं भारतात ही बघितलं तर गोल गोल आकाशात फिरून लोकाना वाचवणारा शक्तिमान, आर्यमान किंवा ज्युनिअर जी आणि आता आता नवीन जन्माला आलेला क्रिश असो कीव फ्लाइंग जाट.

सगळे आपआपल्या विश्वात इथून तिथून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारताना दिसतात. आणि व्हिलनची चांगलीच तोडफोड करताना दिसतात. अवघड वाटणाऱ्या गोष्टीला सहजच करून दाखवतील असे हे सुपरहिरो, सद्यच्या घडीला असा क्वचितच एखादा मनुष्यप्राणी असेल ज्याला या सगळ्या मॅन्स बद्दल माहिती नसेल.

पण भारतात अजून एक असे सुपरहिरो आहेत जे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती असणे फार गरजेचे आहेत. 

ते तोडण्याचे नाही तर जोडण्याचे काम करतात, त्यांचा पाडण्याकडे नाहीतर बनवण्याकडे कल असतो. जे आपल्या कामातून सामाजिक आणि धार्मिक एकोप्याचे संदेश देतात. आणि एक चांगला विचार नवीन पिढीत रुजवण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांच्या कामावर भारतातील प्रत्येक नागरिकाने अभिमान बाळगला पाहिजे आणि त्यांना नावाजले पाहिजे. इथं एवढं गुणगान ज्यांचं गायलं जातंय ते आहेत भारताचे

Mosque Man.

आता इथं प्रश्न पडू शकतो की हे कोणते नवीनच मॅन आहेत..?? तर आज आपण त्यांच्या बद्दलच्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत.

तर मूळचे केरळ च्या तिरूवअनंतपुरमचे हे गृहस्थ असून त्यांना भारताचे Mosque Man म्हटले जाते. त्यांचे पूर्ण नाव गोविंद गोपळकृष्णन असे आहे. नावातच श्रीकृष्णाचा वास असलेले गोपळकृषणन हे 85 वर्षाचे आहेत ते पेशाने एक सीविल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांचे वडीलही एक सिविल कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी आपल्या करियर ची सुरुवात आपल्या वडिलांकडून केली.

शाळेत शिकत असताना शाळा शिकून झाल्यानंतर ते आपल्या वडिलांच्या कामावर जात असत, पुढे शाळा पूर्ण झाल्यानंतर कॉलेजचा असलेला जास्त खर्च त्यांच्या वडिलांना पेलता आला नाही त्यामुळे गोपालकृष्णन यांनी नंतर पूर्ण लक्ष कामावरच केंद्रित केले. त्यांनी आपल्या 60 दशकांच्या कारकिर्दीत 100 पेक्षा जास्त मस्जिद बांधण्याचे काम केले आहे. त्यांच्या मस्जिद बांधण्यात हांतखंड इतका जबरदस्त आहे की भले भले लोक त्यांचं काम पाहून चकित होतात.

विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची औपचारिक पदवी घेतलेली नाही.

कामातून आलेला अनुभव आणि कुशलता यातून त्यांनी अनेक चांगल्या चांगल्या प्रकारच्या वास्तूंची निर्मिती केली आहे. गोविंद गोपलकृष्णन यांनी फक्त मस्जिदच नाही तर त्यांनी 5 पेक्षा जास्त चर्च आणि एक मंदिरचे निर्माण ही केले आहे. पण त्यांना खास करून ओळखले जाते ते मस्जिद बांधण्यासाठी. जेव्हा पण मस्जिद बनवण्याचे किंवा त्यांच्या जीर्णोद्धाराची गरज पडते तेव्हा त्यांचे नाव प्रथम घेतले जाते. त्यांना विचारल्यास ते असे सांगतात की, मी ताज महल सारखी सुंदर वास्तु अजून पहिली नाही पण काही मुघल आणि त्याच्या आधीच्या वास्तूंच्या माहिती असलेल्या पुस्तकांचा अभ्यास केला आहे.

ते पुढे म्हणतात की, मी काम करताना कोणत्याही प्रकारच्या दडपणाखाली काम करत नाही, फक्त एवढा विचार करतो की जे काम करतोय ते देवाचं काम आहे ते पूर्ण आत्मियतेने, मन लावून आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे. जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा ते सुंदरच होईल. त्यामुळेच त्यांच्या कामारवर लोकांचा विश्वास आहे.

पण गोष्ट फक्त इथपर्यंत नाही त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत

गोविंद गोपालकृष्णन उर्फ Mosque Man हे स्वतः हिंदू आहेत. त्यांच्या पत्नी ह्या ख्रिस्ती आहेत, तर त्यांनी आपल्या दोन मुलांपैकी एका मुलाचे लग्न एक मुस्लिम मुलीशी लावून दिले आहे. धार्मिक सहिष्णुता आणि एकतेचा उत्तम उदाहरण त्यांच्या कुटुंबात पाहायला मिळते. इतकेच नाही तर त्यांच्या घरात गेल्यावर आपल्याला एका लाईनीत भगवत गीता, कुराण आणि बायबल ठेवलेले पाहायला मिळेल.

कामासोबतच त्यांनी आपल्या विचारांची बांधणीही भक्कम आणि मजबूतपणे केली आहे. फक्त पोकळ बोलून आणि कामाच्या बदल्यात पैसा भेटतो म्हणून मस्जिद बांधणे इथपर्यंत च मर्यादित न राहता त्यांनी हा विचार स्वतः मध्ये अंमलात आणला आहे. गोपालकृष्णन रमजान महिन्याच्या दरम्यान रोजा, इस्टर च्या दिवशी फास्ट तर तीर्थ यात्रा च्या वेळी व्रत ठेवतात.

गोपालकृष्णन आपल्या मल्याळम भाषेतील पुस्तक “नजाण कांडा कुराण” ज्याचा अर्थ “कुराण जी मी पहिली..” यावर काम करत आहेत. यासोबतच त्यांनी सामाजिक आणि धार्मिक संघटन “मानव मित्री” ची ही स्थापना केली आहे. ज्यात धार्मिक एकोपा आणि सहिष्णुता या गोष्टींना ते बढावा देतात. त्यांचे एक स्वप्न आहे, त्यांना एक धार्मिक शाळा सुरू करायची आहे ज्यात सर्व धर्माबद्दल, गीता, कुराण बायबल बद्दल ची शिकवण दिली जाईल. त्यांचा एकच संदेश सगळ्याना आहे, तो म्हणजे ईश्वर एक आहे आणि आपण सारी त्या एक ईश्वराची लेकरे आहोत.

आजच्या मंदिर मस्जिद वर राजकारण होणाऱ्या काळात आणि मंदिर मस्जिद बंधायच्या व तोडायच्या भानगडीत असलेल्या लोकांमध्ये, एखादा हिंदू व्यक्ति Mosque Man म्हणून ओळखले जाणे ही एक खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच त्यांच्या कडून प्रेरीत होणे आज च्या काळात फार गरजेचे आहे.

  • भिडू सौरभ चंदनशिवे

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.