११ वी झालेला पोरगा संन्यासी व्हायला निघाला पण वाटेत गांधी भेटले अन् तो विनोबा झाला

विनोबा भावे.

यांच्या नावासमोर विचारवंत, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, गांधीवादी अशी अनेक विशेषणे जोडली जातात. त्यांची आज जयंती. स्वातंत्र्य सैनिक, भूदान चळवळसाठी ओळखले जातात. 

यांच्या जन्म ११ सप्टेंबर १८९५ मध्ये कोकणातील गोगांदा या गावात झाले. 

आई-वडिलांनी त्यांचे नाव विनायक ठेवले होते. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरी तर आईचे  रुक्मिणीबाई होते. त्या विनोबा भावे यांना विनायक ऐवजी ‘विन्या’ म्हणत असत, पण नंतर महात्मा गांधींनी त्यांचे नाव विनोबा ठेवले. त्यामुळे त्यांची विनायक आणि विन्या ही दोन्ही नावे विसरली गेली.

ब्रिटिशा विरोधात त्यांनी केलेल्या सत्याग्रह, आंदोलनमुळे त्यांना अनेकवेळा कारावास झाला होता. याची सुरुवात होते ते नागपूर येथील झंडा सत्याग्रहापासून. १९३७ मध्ये लंडन येथे दुसरी गोलमेज परिषद घेण्यात आली होती. या परिषेदेतून देशाला कशाचाही फायदा झाला नाही असे म्हणून विनोबा भावे यांनी ब्रिटिश सरकारवर प्रचंड टिका केली होती. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा कारागृहात जावे लागले.

कारागृहातून सुटल्यावर महात्मा गांधी यांनी विनोबा भावे यांना पहिले सत्याग्रही बनविले.

 मात्र त्यानंतर लगेच १७ ऑक्टोबर १९४० ला त्यांना तीन वर्षांची कठोर शिक्षा झाली. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनावेळी विनोबा भावे यांची तब्बेत खराब होती. अशावेळी सुद्धा महात्मा गांधी यांनी त्यांचा सल्ला घेतला होता. यामुळे विनोबा भावे यांच्यावर गांधींचा किती विश्वास होता लक्षात येते. 

स्वातंत्र्यानंतर जेव्हा अनेक नेत्यांना वाटले आपले काम पूर्ण झाले आहे. तर अनेक नेते राजकारणाकडे वळले होते. तेव्हा विनोबा भावे यांनी  भू-सुधारणेची भूदान संदर्भातील महत्त्वाकांक्षी चळवळ सुरू केली आणि त्यासाठी त्यांनी देशभर पायी पदयात्रा काढली. 

जमीनदारांच्या ताब्यातील पाच कोटी एकर शेतजमीन ही भूमिहीनांना त्यांच्याकडून सद्भावनेने देणगी घेऊन वाटप करणे. हे या चळवळीचे ध्येय होते.

१९५३ मध्ये जयप्रकाश नारायण यांनीही राजकारण सोडले आणि त्यांच्यात सामील झाले. 

एप्रिल १९५१ रोजी तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली असलेल्या गावातून ही चळवळ सुरु झाली. सुरुवातील या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र जे ध्येय ठेऊन हि यात्रा सुरु झाली होते. ते पूर्ण करता आले नाही. नैसर्गिक ऋषी शेतीचा त्यांचा प्रयोगही एकेकाळी खूप गाजला होता.

विनोबा भावे यांची स्मरणशक्ती मजबूत होती. हायस्कूलनंतर विनोबांच्या वडिलांनी त्यांना फ्रेंच शिकण्यास सांगितले, तर त्यांच्या आईचा संस्कृत शिकण्याचा आग्रह होता.त्यानंतर विनोबांनी फ्रेंच भाषेचा अभ्यास केला तसेच संस्कृतचे खाजगी क्लास करून शिक्षण घेतले. अशा प्रकारे त्यांनी आई आणि वडिलांचा शब्द पडू दिला नाही.

किशोरवयात त्यांना वेद, उपनिषदांचे, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांचे शेकडो श्लोक पाठ होते. लहानपणापासूनच गीता पाठ होती. वयाच्या एकविसाव्या वर्षी आईच्या सांगण्यावरून विनोबा भावे यांनी गीतेचा ‘गीताई’ या नावाने  मराठी अनुवाद सुरू केला. पण ते शेवटपर्यंत  काळात तो पूर्ण करू शकला नाही. 

अध्यात्माच्या बाबतीत त्यांनी आपली आईचा आदर्श होता. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे त्यांचे आदर्श होते. तसेच संत रामदास आणि शंकराचार्य आणि त्यांचे संन्यास हे त्यांचे प्रेरणास्थान होते 

विनोबा गांधींचा सहवासात आले 

मार्च १९१६ रोजी ते इंटर परीक्षा देण्यासाठी मुंबईला रेल्वेने निघाले  होते. ते मुंबई ऐवजी सुरतला पोहोचले. तिथून संन्यासाच्या शोधात हिमालयाच्या दिशेने गेले. मधेच काशीला पोहोचल्यावर विनोबांनी गांधीजींना मिरवणुकीत पाहिले तेव्हा त्यांचा हेतू बदलला.

नंतर, गांधीजींचे निमंत्रण मिळाल्यानंतर, विनोबा भावे अहमदाबादमधील त्यांच्या आश्रमात गेले, जिथे त्यांचा त्यांच्याशी पहिला संवाद झाला. या भाषणानंतर गांधीजींचे म्हणणे होते की बहुतेक लोक येथे काहीतरी घेण्यासाठी येतात, ही पहिली व्यक्ती आहे जी काहीतरी देण्यासाठी आश्रमात आली आहे.

त्यानंतर आश्रमाच्या अभ्यास, अध्यापन, सूतकताई, शेतीपासून ते सामुदायिक जीवनापर्यंतच्या प्रत्येक कार्यात विनोबा भावे पुढे होते. आश्रम कमी पडू लागल्यावर साबरमतीच्या काठावर नव्या आश्रमाचा पाया रचला गेला. पण स्वातंत्र्याच्या लाखो अहिंसक सैनिकांना तयार करण्याचे काम केवळ या आश्रमातून शक्य नव्हते. म्हणूनच गांधींना वर्ध्यातही असाच आश्रम हवा होता.

महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार जून १९२३ रोजी विनोबा भावे वर्ध्याला गेले आणि त्यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ या मासिकाचे संपादन सुरू केले. या मराठी मासिकात ते उपनिषदांसह महाराष्ट्रातील संतांवर लेखन करू लागले. त्यामुळे देशात भक्ती चळवळ सुरू झाली.मात्र काम अधिक करू लागल्याने त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यानंतर विनोबा भावे यांना डॉक्टरांनी डोंगराळ भागात जाण्याचा सल्ला दिला. त्यावर ते १९३७ मध्ये पवनार आश्रमात गेले. 

१९८२ मध्ये आजारी पडल्यानंतर त्यांनी आपले शरीर त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी अन्न आणि पाणी सोडले. १५ नोव्हेंबर १९८२ रोजी त्यांच्या मृत्यू झाला. १९५८ मध्ये त्यांना  रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला, तर १९८३ मध्ये त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात आले.

आयुष्यभर वादापासून लांब राहणारे विनोबा भावे यांनी १९७५ मध्ये आणीबाणीला समर्थन दर्शविले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.