‘दमा दम मस्त कलंदर’ मागचा खरा “कलंदर” माहित आहे का ?
कलंदर हा शब्द कानावर आला की, दमादम मस्त कलन्दर, अली दम दम दे अन्दर, दमादम मस्त कलन्दर, अली दा पैला नम्बर, हो लाल मेरी हि कव्वाली आपोआप आठवते. या गाण्याने घातलेला धुमाकूळ तसा घातलेला म्हण्यापेक्षा घालत असणारा धुमाकूळ आपल्याला माहितीच आहे. पण कलंदर म्हणलं कि आपल्यला आठवतो तो बेफिकीर. बिनधास्त मदमस्त होऊन जगणारा एखादा मनुष्य. या कलंदर लोकांचे आयुष्य रोमांचक असते असे आपल्याला तरी किमान वाटते, असे अनेक मदमस्त लोक आपल्यला बाजूला हिंडणारे असतीलच.
पण लोकांना दिलेली कलंदर हि उपमा म्हणा अथवा काहींसाठीची शिवी कुठून आली असेल याचा विचार आपण कधी केलाय का ?
तर ह्याच कलंदर शब्दाचा इतिहास मात्र अजिबातच कलंदर नाही. भारतात एकदा बांगला देशाची एक प्रख्यात पोप सिंगर ‘रूना लैला’ भारताच्या दौर्यावर आली होती. तशी प्रचंड सुंदर दिसणारी हि गायिका अनेकांना मोहिनी घालणारी होती. तिच्या एका लायीव्ह गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन तेव्हा करण्यात आले होते. हा कार्यक्रम ७०-८० च्या दशकातला आणि तो दूरदर्शनवरून थेट दाखवण्यात आला होता. त्या वेळी तिने सिंधी भाषातले दमा दम मस्त कलंदर हि कवाली गायली होती. त्यानंतर नुसरत फतेह आली खा यांच्यापासून अनेक गायकांनी हि कवाली गायली आहे.
हि कवाली जरी धुडगूस घालणारी असली तरी तिचा इतिहास मात्र ६०० वर्ष जुना आहे. सुफी संत लाल शहाबाज कलंदर यांच्यावर हि कवाली आधारित आहे. १३ व्या शतकात पहिल्यांदा लिहली गेलेली हि कवली.
प्रसिद्ध सुफ्फी कवी अमीर खुशराव यांनी पहिल्यांदा ह्याचे लिखाण केले. त्यानंतर १८ व्या शतकाच्या दरम्यान बुल्लेह शहा यांनी या कवितेचे रुपांतर कवालीत केले. त्यानंतर हि कवाली अनेकांनी गायली आणि गाजवली देखील. याच गाण्यात सेह्वान नावाच्या गावाचा देखील उल्लेख आहे. या गावात हि कवली ज्यांच्यावर लिहली गेली त्या लाल शहाबाज कलंदर यांचा दर्गा आहे.
सिंध प्रांतात असणारे हे गाव आणि तेथील हा दर्गा हिंदू आणि मुस्लीम लोकांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे.
सेहवान हे गाव एके काळी शैव पंथीयांचे मुख्य ठिकाण असल्याची नोंद इतिहासात आढळते. या गावाचे या पूर्वीचे नाव शिवस्तान असल्याचे देखील काही इतिहास तज्ञांनी सांगितले आहे. 1970 पर्यंत या दर्ग्याच्या बाहेरच्या आवारात दगडी शिवलिंगही होते. नंतर ह्या शिवलिंगाची तोड फोड होण्याच्या भीतीने ते एका खोलीत बंदिस्त केले गेले.
या दर्ग्याच्या उरुसा दरम्यान आशीर्वाद घेण्यासाठी सिंध प्रांतातील हिंदू येथे मोठ्या प्रमाणात जमतात. लाल शाहबाज कलंदर हा पूर्वजन्मी संस्कृत कवी भर्तृहरी होता असे देखील सिंध प्रांतातील हिंदू लोक मानतात .
याच लाल शाहबाजला अनेक सिंधी हिंदू ‘झुलेलाल’ या नावानेसुद्धा ओळखतात. त्यंच्या मते झुलेलाल हा सिंधू नदीचा रक्षणकर्ता आहे.
मात्र मुस्लीम भक्तसाठी लाल शाहबाज कलंदरच सिंधू नदीचा नियंत्रक असतो.
एक प्रश्न मात्र यात अधोरेखीत होतो तो म्हणजे कलंदरी नावाचा एक सुफी पंथ आहे. हे झुलेला त्याच पंथातले होते. कलंदर शब्दा पाठीमागे ह्या पंथाच्या स्थापनेची देखील हि एक सुरस कहाणी आहे.
कलंदर ह्या शब्दाचे मूळ खरे म्हणजे फारसी किंवा इराणी आहे आणि त्याच्या जन्माबद्दल एक कथा आहे.
इ.स 1232 च्या आसपास इराणमधील ‘साव्हे’ या गांवात साधुवृत्तीचा व कडक ब्रम्हचर्य पाळणारा ‘जलाल्लुद्दिन’ नावाचा एक तरूण रहात होता. त्याच्याव भुलून एका तरूणीचे त्याच्यावर प्रेम जडले. तिने त्याला एकदा स्वत:चा घरी बोलावले व त्याला आपल्याशी लग्न करण्याची गळ घातली. बिचारा ‘जलाल्लुदिन’ मोठ्या संकटात सापडला. यावर उपाय म्हणून त्याने स्वच्छ्तागृहात जाण्याची परवानगी मागितली व तो जेंव्हा बाहेर आला तेंव्हा त्याने आपल्या शरिरावरचे सर्व केस काढून टाकत स्वताचे रूप विद्रूप करून घेतले होते. अश्या अवस्थेत त्या तरुणीने त्याला पहिले आणि ती घाबरून तिथून पळून गेली.
नंतर कालांतराने ‘कलंदरिया’ नवाचा सुफी पंथ चालू केला.
कुठल्याही जागेवर स्थिर न राहता काय फिरत राहणे आणि ऐश्वर्य, कपडे, अशा सुखांचा त्याग करत जीवन जगणे हेच या पंथाचे मुख्य उदिष्ट्य होते. सतत फिरतीवर असल्याने हा पंथ प्रचंड पसरला थेट इजिप्ट पर्यंत ह्या पंथाचा प्रचार आणि प्रसार झाला होता.
इ.स. 1360 पर्यंत या पंथियांचे प्रस्थ इतके वाढले होते कि इजिप्तच्या सुलतानाने त्यांना फटके मारून हाकलून लावण्याचे फर्मान काढले.
असा हि ह्या कलंदर शब्दाचा इतिहास आहे. त्यामुळे एखाद्याला कलंदर वृत्तीचा म्हणत त्याच्याकडे कुशीत नजरेने पाहताना हा इतिहास नक्कीच आठवला पाहिजे. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा ज्यांना मदमस्त जगणारे कलंदर असे म्हणतो ते कधीकाळी दारिद्र्य हेच ऐश्वर्य मानणारे देखील होते.
हे ही वाचा.
- बॉलीवूडने नुसरत फतेह अली खां साहेबांकडून चोरलेली गाणी !
- बेगम अख्तर यांनी सिगरेटच्या पाकीटसाठी अक्खी ट्रेन स्टेशनवर थांबवून ठेवली होती !
- खुदा ए सुखन अर्थात गालिबचा उस्ताद मीर तकी मीर.